Submitted by सुप्रिया जाधव. on 29 March, 2020 - 14:16
विधात्या दिले कर्ज तू खास होते
उधारीवरी चालले श्वास होते
मला भेटताना तुझी भेट घेते
नको वाटते तेच हमखास होते
कसे मुक्त-स्वच्छंद उडतात पक्षी ?
दिला जन्म त्याने दिले घास होते
तुला पाहिले त्याच वळणावरी मी
निरखल्यावरी जाणले भास होते
मिठाचा खडा टाकला नेमका तू
तसे वाढले अन्न सुग्रास होते
तुझ्या रुंद खांद्यावरी ती विसावे
जमान्यात शाबूत विश्वास होते
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा