Corona हा तसा एक सामान्य इंग्लीश शब्द. त्याचे मूळ लॅटिनमधले crown, अर्थात मुकुट. सध्या जगभर धुमाकूळ घालून एका महासाथीला कारण ठरलेला विषाणू त्याचा मुकुट मिरवतोय.
सहज उत्सुकता म्हणून ‘करोना’ शब्दाचे अनेकविध अर्थ पाहिले आणि ते रोचक वाटले. जगात जवळपास एक डझनभर प्रकारचे करोना आहेत. ते आपल्या परिचयाच्या अनेक क्षेत्रांत आहेत. जरा त्यांची यादी तर बघा:
आकाश, वनस्पती, शरीर, विद्युतक्षेत्र, वास्तुकला, धार्मिक वेश आणि अर्थात सूक्ष्मजीव .
सध्याच्या जमावबंदीमुळे आपण घरांत काहीसे जखडले गेलो आहोत. करोनाच्या ‘कोविद’ बद्दल सतत वाचतोय, ऐकतोय आणि इथे व्यक्तही होतोय. या माहितीच्या भडीमाराने डोके अगदी भंजाळून जातेय. साथीच्या बातम्यांनी आपली चिंताही वाढते आहे. म्हणून घटकाभर हा विरंगुळा.
विश्वातील विविध करोनांची काही चित्रे सादर करतोय. अर्थात ती सर्व जालावरून साभार !
१. सुरवात करूया सूर्याच्या करोना अर्थात त्याचे प्रभामंडलापासून. माझ्याप्रमाणे ज्यांनी खग्रास सूर्यग्रहण पाहिले आहे त्यांनी हे दृश्य अगदी जिवापाड डोळ्यांत साठवले असेलच. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले नसेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी खग्रास पहायची संधी घ्याच !
२. एखाद्या फुलाचा शास्त्रीय अभ्यास करताना आपल्याला ‘करोला’ आणि करोना भेटतात. हे पाहा:
३. विद्युत प्रकाशाची अनेक रूपे आपल्याला परिचित आहेत. या चित्रात जो लखलखाट दिसतोय तोही एक करोनाच.
४. आता वास्तुकलेत देखील करोना असतो तो पाहू. इमारतीच्या शीर्षकावरील हे देखणे शिल्प :
५. आणि हा आहे घराच्या सजावटीतील करोना. अशी बरीच झुंबरे आपल्याला परिचित असतात.
६. विशिष्ट धार्मिक केशभूषेत केलेला हा बघा डोक्यावरील करोना:
७. मानवी मेंदूचा शास्त्रीय अभ्यास करताना हे दृश्य दिसते. त्याला म्हणतात करोना रेडीएटा:
८. करोना हे नाव विविध वस्तू-उत्पादकांनाही आकर्षित करते. धूम्रपानासंबंधी देखील एक करोना आहे आणि त्या प्रकाराला म्हणतात ‘करोना सिगार’. यात ‘फुल’ आणि ‘हाफ’ करोनाही असतात म्हणे !.
(धूम्रपान हे आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे , हेवेसांनल . केवळ विरंगुळा म्हणून हे उदा.)
आणि वाचकहो,
सरतेशेवटी आपणा सर्वांना अतिपरिचित झालेल्या करोना विषाणूचा उल्लेख करतो. त्याचे चित्र आपण सतत अनेक ठिकाणी पाहतोच आहोत. म्हणून पुनरुक्ती टाळतोय.
.....या व्यतिरिक्तही काही करोना असू शकतील. माहिती असल्यास तुम्हीही भर घाला.
धन्यवाद !
मला एकच करोना माहीतीये.
मला एकच करोना माहीतीये.
गुजरातेतल्या एका कंपनीच नाव
गुजरातेतल्या एका कंपनीच नाव कोरोना आहे.
आणि बाबांच्या एका गोळीचसुद्धा!!
कुमार सर ,
कुमार सर ,
मस्तच. पहिले ३ ठाऊक होते आणि आपला कोरोना विषाणू.
५ ते ८ प्रचि दिसत नाहीत मला
*गुजरातेतल्या एका कंपनीच नाव
*गुजरातेतल्या एका कंपनीच नाव कोरोना >>>
वा ! कॅलिफोर्निआ मध्ये पण एक करोना शहर आहे.
* ५ ते ८ प्रचि दिसत नाहीत मला >>>
मला दिसताहेत हो. २ टप्प्यांत चढवली चित्रे.
असो.
करोना- साहू म्हणून एक चप्पल
करोना- साहू म्हणून एक चप्पल बुटांची कंपनी होती.
हीरा,
हीरा,
अगदी ! CSC असे लिहिलेले असायचे त्या पादत्राणांवर.
कुमारदा क्र ५,६,७आणि ८ प्रचि
कुमारदा क्र ५,६,७आणि ८ प्रचि दिसत नाहीयेत मला..
माझ्या लॅपटॉपवर सगळी
माझ्या लॅपटॉपवर सगळी दिसताहेत.
कोणी तंत्रज्ञाने मत द्यावे.
त्याचे मूळ लॅटिनमधले crown,
त्याचे मूळ लॅटिनमधले crown, अर्थात मुकुट. >>>>> अरे वा!
चप्पल बुटांची कंपनी होती.>>>>>> हेच लिहायला आले होते.
मलाही कोरोना पादत्राणांची कं
मलाही कोरोना पादत्राणांची कं आठवली.
या नावाच्या सिनेमाची नोंदणी
या नावाच्या सिनेमाची नोंदणी झाली देखील .
https://www.loksatta.com/blogs-news/corona-pyar-hai-movie-name-registere...
कुमार सर खुप छान माहिती.
कुमार सर खुप छान माहिती. आमच्या कडून अजून एक कोरोना..

मस्त माहिती.
मस्त माहिती.
ते वास्तुशास्त्र उदाहरण पारशी धर्माशी संबंधित आहे का?त्यांच्या वास्तूंवर तो तसा पक्षी असतो ना?
बुन्नु
बुन्नु

वा ! पण ती दुकाने बंद असतील ना सगळीकडे ?
अनु,
अनु,
ते इजिप्त मधले आहे.
हा विकी दुवा : https://en.wikipedia.org/wiki/Cornice
साद, खरे की काय!
साद, खरे की काय!
>>>साद, खरे की काय! >>>>
>>>साद, खरे की काय! >>>>
एकदम खरे ! दिलीप ठाकूर यांचा लेख आहे तो.
अजून एक सिनेमा 'डेडली करोना' पण नोंदलाय.
छान
छान
ओके,
ओके,

मला हे आठवलं म्हणून पारसी वाटलं.
Button polyps
Button polyps
वा ! वरील दोन्ही छानच.
वा ! वरील दोन्ही छानच.
अजून एक करोना.
ही आहे हवामानशास्त्रातील एक घटना.
यात चंद्र वा सूर्यप्रकाशाचे जलबिंदू किंवा ढगांमुळे विघटन होते.
हा पहा चांद्रीय करोना परिणाम :
छान लेख
छान लेख
आता दिसू लागली सगळी चित्रे
आता दिसू लागली सगळी चित्रे
आता दिसू लागली सगळी चित्रे >>
आता दिसू लागली सगळी चित्रे >> अरेच्चा मला तर अजूनही क्र. 5 ते 8 ची चित्र दिसत नाहीयेत. मी फोन आणि लॅपटॉप वरून ही चेक केलं.
धाग्याची कल्पना छानेय.. मघाशी
धाग्याची कल्पना छानेय.. मघाशी फोटोज बघायच्या नादात सांगायलाच विसरले होते.
बुन्नु मलाही दिसत नाहीयेत 5ते8 प्रचि..
एक प्रयत्न म्हणून इथे ५ व ६
एक प्रयत्न म्हणून इथे ५ व ६ क्र ची चित्रे पुन्हा चढवतो.
५.
६.
छान लेख.
छान लेख.
५ ते ८ क्रमांकाची छायाचित्रे अजूनही दिसत नाहीत, वर ५ आणि ६ पण.
उ बो,
उ बो,

धन्यवाद. मला सगळी दिसतात. या तांत्रिक समस्येवर माझ्याकडे उत्तर नाही.
(No subject)
Corona in eye
अतुल,
अतुल,
मस्तच !
अजून एक भर घालतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना ‘करोनरी’ म्हणतात. याचे कारण त्या हृदयावर विळखा घालून असतात.
हे पहा :
Pages