Submitted by १८तन्वी on 22 March, 2020 - 18:15
घाबरणारा सूर्य!
सूर्याला घाबरवायला फारसं काही लागत नाही
वेदनांनी भरलेल्या मनाच्या वाटेला तो जात नाही
तो ही घाबरतो त्या गर्द काळ्या डोहाला...
अर्थात कधीतरी पडतात त्याचे कवडसे मनाच्या दारात...
वेदनांचे डोळे किलकिले होतात...
अन त्या कवडश्यांवर दु:खवेली आरूढ होतात...
सूर्य मग तयारी करतो
क्षितिजावरच अस्ताला जाण्याची...
तयारी नसते त्याचीही
मनाच्या काळोखात बुडण्याची...
--- तन्वी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली
आवडली
खूपच मस्त!!!
खूपच मस्त!!!
छानेय.. आवडली कविता..
छानेय.. आवडली कविता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ग्रुप चेंज करुन कवितेच्या ग्रुपवर हलवाल का?
प्रत्ययकारी कविता आहे! लिहीत
प्रत्ययकारी कविता आहे! लिहीत राहा...
खूपच जास्त भारी! आतवर पोचली.
खूपच जास्त भारी! आतवर पोचली.