नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूच्या आजाराची जागतिक साथ आल्याचे जाहीर केले आहे. ती साथ आटोक्यात राहावी म्हणून आपण सर्वजण योग्य ते प्रयत्न करीतच आहोत. आजाराच्या एखाद्या जागतिक साथीमुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघते. तसेच त्याचे अर्थकारण आणि समाजकारणावर गंभीर परिणाम होतात.
या निमिताने जागतिक साथींच्या इतिहासात डोकावत आहे. त्याची थोडक्यात माहिती देतो. त्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करूयात. इ.स. १३०० ते २०१२ या कालावधीतील साथींचा हा आढावा आहे.
.......
१. इ.स. १३४६ -५३
प्लेग अर्थात काळ्या मृत्यूची महासाथ
हा आजार Yersinia pestis या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू निसर्गतः उंदीर आणि तत्सम प्राण्यांत आढळतो. उंदरांना विशिष्ट पिसवा चावत असतात आणि त्याच या रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात. मुळात अशी रोगट पिसू उंदीर आणि माणूस या दोघानाही चावते. या मानवी आजारात शरीरातील लिम्फग्रंथी मोठाल्या सुजतात, त्यांच्यात रक्तस्त्राव होतो आणि मग त्या मरतात. पुढे संपूर्ण शरीरात विषबाधा होते, अंगावर काळेनिळे चट्टे पडतात आणि अखेर रुग्ण दगावतो.
या साथीचा उगम आशियात झाला आणि मग ती फैलावली. त्याकाळी जागतिक दळणवळण आणि व्यापार समुद्रमार्गे असायचे. त्यामुळे विविध जहाजे आणि बंदरांवर उंदीर आणि त्यांना चावणाऱ्या पिसवा खूप पैदा होत. तसेच बंदराच्या मर्यादित जागेत मानवी समूह दाटीवाटीने वावरत. हे घटक या जागतिक साथीस कारणीभूत ठरले. या महासाथीत सुमारे १५ कोटी माणसे मृत्यू पावली.
२. इ.स. १८५२- ६०
कॉलराची महासाथ
हा आजार Vibrio cholerae या जिवाणूमुळे होतो आणि त्याचा प्रसार दूषित पाण्यातून होतो. हा आजार झालेल्या माणसाच्या विष्ठेतून हे जंतू समाजात पसरतात. घनदाट लोकसंख्या, सांडपाण्याची गलीच्छ व्यवस्था, दुष्काळी व युद्धकालीन परिस्थिती या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ही महासाथ फैलावली. कॉलरा झालेल्या रुग्णास प्रचंड जुलाब होऊन त्याच्या शरीरातील पाणी संपुष्टात येते. परिणामी मृत्यू होऊ शकतो. आतापर्यंत जगात या आजाराच्या ६ मोठ्या साथी येऊन गेलेल्या आहेत. त्यापैकी ही तिसरी साथ होती. तिचा उगम भारतात गंगा नदीच्या पट्ट्यात झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.
३. इ.स. १८८९-९०
फ्लूची महासाथ
या आजाराचे पूर्ण नाव ‘इन्फ्लूएन्झा’ असे आहे. तो एका विषाणूमुळे होतो आणि त्या विषाणूचे बरेच प्रकार असतात. ही साथ ‘‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N8) या प्रकारामुळे आली होती. या आजारात सुरवातीस ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे दिसतात. पण आजार बळावला की श्वसन, हृदयक्रिया, मेंदूकार्य आणि स्नायू या सर्वांवर गंभीर परिणाम होतात.
या साथीचा उगम आशियात झाला असा समज होता. परंतु, संशोधनानंतर वेगळी माहिती मिळाली. या आजाराची सुरवात जगात एकदम ३ ठिकाणी झाली – तुर्कस्तान, कॅनडा आणि ग्रीनलंड. या सुमारास जगभरात शहरे लोकसंख्येने फुगू लागली होती. त्यामुळे या आजाराचा फैलाव वेगाने झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.
४. इ.स. १९१०-११
कॉलराची महासाथ
हिचा उगम भारतात झाला आणि पुढे ती फैलावली. एव्हाना आरोग्यसुविधांमध्ये बरीच सुधारणा झालेली होती. त्यामुळे ही साथ तशी लवकर आटोक्यात आली. यावेळी सुमारे १ लाख लोक दगावले.
५. इ.स. १९१८
फ्लूची महासाथ
पुन्हा एकदा ‘इन्फ्लूएन्झा’ विषाणूने जगभर धुमाकूळ घातला. याखेपेस जगातील सुमारे १/३ लोक याने बाधित झाले होते. त्यापैकी सुमारे १५% मृत्युमुखी पडले. या साथीचे एक वैशिष्ट्य दखलपात्र आहे. यापूर्वी अशा साथींत बहुतांश लहान मुले, वृद्ध आणि दुबळे लोक आजारास बळी पडत. पण यावेळेस पूर्ण उलटे चित्र दिसून आले. बहुसंख्य रुग्ण हे तरुण आणि धडधाकट असे होते.
६. इ.स. १९५६-५८
आशियाई फ्लूची महासाथ
ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H2N2) मुळे आली. तिचा उगम चीनमध्ये झाला. मृत्यूसंख्या सुमारे २० लाख.
७. १९५८
हाँगकाँग फ्लूची साथ
ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N2) मुळे आली. तशी ती लवकर आटोक्यात आली. तरीसुद्धा त्यात १० लाख लोक मरण पावले. त्यापैकी निम्मे लोक हे हाँगकाँगचे रहिवासी होते.
आतापर्यंतच्या फ्लूच्या ४ साथी पाहता एक लक्षात येईल. ‘इन्फ्लूएन्झा’ या विषाणूचे विविध उपप्रकार हे आजार घडवत असतात. साधारणपणे एखाद्या साथीदरम्यान नवीन औषधे आणि लसींचा शोध लागतो. त्यातून विषाणूच्या एका प्रकाराचा मुकाबला करता येतो. आता माणसाला वाटते की आपण त्या जन्तूवर विजय मिळवला. पण तसे नसते. जंतू पण हुशार असतात ! ते उत्क्रांत होतात आणि त्यांची नवी प्रजाती आपल्या पूर्वीच्या औषधांना पुरून उरते.
८. २००५- २०१२
एड्सची महासाथ
हा आजार HIV या विषाणूने होतो. त्याचा प्रथम शोध १९७६मध्ये आफ्रिकेतील कोंगोमध्ये लागला. १९८१ पासून त्याचा वेगाने जागतिक फैलाव झाला. वरील काळात ही साथ उच्चतम बिंदूवर होती. आजपर्यंत या आजाराने ३.६ कोटी लोक मृत्यू पावले आहेत.
आजच्या घडीला या आजारावरील अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे. १९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे.
वरील जागतिक साथींच्यानंतर काही काळ ‘एबोला’ या विषाणूने धुमाकूळ घातला होता. पण आज तरी तो आजार पश्चिम आफ्रिकेपुरता मर्यादित झाला आहे.
...........
आणि लोकहो,
सध्या चालू असलेली ‘करोना’ची जागतिक साथ आपण अनुभवत आहोत. प्रगत वैद्यकीय संशोधन आणि सुविधांमुळे आपण आता ही साथ लवकर आटोक्यात आणू शकू असे वाटते. या साथीसंबंधी विपुल लेखन या संस्थळासह अनेक माध्यमांतून झालेले आहे. म्हणून पुनरुक्ती टाळतो.
या साथीत ....
जे मरण पावले आहेत, त्यांना आदरांजली,
जे आजारी आहेत, त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा,
आणि
ही जागतिक साथ लवकरात लवकर संपुष्टात येईल या आशेसह समारोप करतो.
**********************************************
अरेरे!
अरेरे!
फक्त तीन वर्षे! म्हणजे याही लशीला मागणी येईल की काय!
कुठेतरी देवीचा एक विषाणू साठवून ठेवला आहे ना?
होय,
होय,
या लेखात सविस्तर दिले आहे: https://www.maayboli.com/node/79298
"देवीच्या विषाणूचे नमुने अभ्यास-संदर्भ म्हणून अतिशीतगृहात कडेकोट बंदोबस्तात ठेवलेत.
अधिकृतपणे डब्ल्यूएचओची अशी दोनच केंद्रे आहेत. त्यातील एक अमेरिकेतील अटलांटामध्ये तर दुसरे रशियामध्ये आहे"
तुमच्याच लेखात वाचलं असेल.
तुमच्याच लेखात वाचलं असेल. लक्षात नव्हतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हरकत नाही
हरकत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Monkeypox लैंगिक संबंधांमधून
Monkeypox लैंगिक संबंधांमधून पसरतोय असं या बातमीत म्हटलंय
https://www.firstpost.com/health/how-prepared-is-india-for-a-monkeypox-o...
मंकीपॉक्स अद्ययावत माहिती (
मंकीपॉक्स अद्ययावत माहिती ( २५ मे अखेर) :
(** हे लिहिण्याचा हेतू निव्वळ अधिकृत माहिती देणे असून कोणीही घाबरून जायचे कारण नाही).
खात्रीने निदान झालेले रुग्ण : 219
त्यापैकी 118 युरोपमधील.
त्यापैकी बहुसंख्य समलैंगिक तरुण पुरुष आहेत.
पण याचा अर्थ हा आजार लैंगिकतेतून पसरतो असा नाही.
आजार झालेल्या व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीचा निकट संपर्क हे प्रसाराचे कारण आहे.
https://www.ecdc.europa.eu/en/news-events/epidemiological-update-monkeyp...
एका वृत्तपत्रातील खालील बातमी
एका वृत्तपत्रातील खालील बातमी पहा :
यामध्ये rt- PCR ही चुकीची माहिती आहे. मंकीपॉक्स हा मुळात डीएनए प्रकारचा विषाणू असल्याने त्याच्या निदानासाठी PCR ही चाचणी वापरतात.
( कोविडचा विषाणू RNA प्रकारचा असल्यामुळे त्याच्या चाचणीला rt-pcr म्हणतात.
R = Reverse. त्या चाचणीत प्रयोगशाळेत RNA चे DNA मध्ये रुपांतर करतात).
शीर्षकातील अक्षम्य चूक :
शीर्षकातील अक्षम्य चूक :
Put in isolation last week, Ghaziabad girl tests positive for monkeypox ..
https://timesofindia.indiatimes.com/city/ghaziabad/girl-isolated-last-wk...
खाली पूर्ण बातमी :
have tested negative for the zoonotic disease, officials sa ..
Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/92070871.cms?utm_source=c...
प्रयोगशाळेत खात्रीने निदान
प्रयोगशाळेत खात्रीने निदान झालेला मंकी पॉक्सचा भारतातील पहिला रुग्ण केरळमधील.
तीन दिवसांपूर्वी आखाती देशातून परत आलेली व्यक्ती
https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/india-news/indias-first-monkey...
https://www-thehindu-com.cdn.ampproject.org/v/s/www.thehindu.com/news/na...
मंकीपॉक्स : अद्यतन
मंकीपॉक्स : अद्यतन
एकूण जागतिक रुग्ण संख्या 14000
त्यापैकी 99 टक्के बाधित पुरुष आहेत
रोगाचा प्रसार 78 देशांमध्ये
एकूण मृत्यू ५: आफ्रिका खंडात
जागतिक आरोग्य संघटनेकडून आरोग्य आणीबाणी जाहीर
अमेरिकेत न्यूयॉर्क जवळील
अमेरिकेत न्यूयॉर्क जवळील Rockland County या ठिकाणी पोलिओचा एक रुग्ण आढळला आहे. या प्रौढ व्यक्तीने पोलिओ प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती. गेल्या दहा वर्षातील ही पहिली घटना आहे.
आजूबाजूच्या परिसरातील सांडपाण्याच्या साठ्यांमध्ये जंतू संदर्भात तपासणी चालू आहे.
अमेरिकेत न्यूयॉर्क जवळील
दु प्र
न्यूयॉर्कमध्ये पोलिओ संदर्भात
न्यूयॉर्कमध्ये पोलिओ संदर्भात आरोग्य आणीबाणी जाहीर.
लसीकरण वेगाने करण्याची गरज.
https://www.bbc.com/news/world-us-canada-62857112
हवामान बदलाचे परिणाम दिसू
हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत.
अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे
मध्ये वाचनात आले कर्करोग चे प्रमाण नवीन पिढी मध्ये वाढत आहे.
1950 चा ह्यांचा जन्म आहे त्या पेक्षा 1960 मध्ये ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना कमी वयात कर्क रोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.
तसेच ते 1960,1970 असे वाढत आहे.
झिंबाब्वे मध्ये अलीकडे गोवर
झिंबाब्वे मध्ये अलीकडे गोवर या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक झाला आणि त्यात ७०० मुलांचा मृत्यू झालेला आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2022-09-05/zimbabwe-says-measles...
काल 27 डिसेंबर रोजी लुई
काल 27 डिसेंबर रोजी लुई पाश्चर यांची दोनशेवी जयंती साजरी झाली.
या महान वैज्ञानिकाने लसीकरणातील मूलभूत संशोधन केले तसेच निर्जंतुकीकरण संशोधनात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
H3N2 या influenza
H3N2 या influenza विषाणूमुळे होणारा आजार गेल्या काही महिन्यात भारतात बऱ्यापैकी वाढला आहे. त्या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची विशेष बैठक झाली.
गरजेनुसार मास्कचा वापर आणि नेहमीची काळजी घेण्याची सूचना.
https://health.economictimes.indiatimes.com/news/policy/union-health-min...
Influenza साथ : 9 मार्च
Influenza साथ : 9 मार्च अखेरीस भारतातील स्थिती :
*खात्रीशीर निदान झालेले रुग्ण : 3,038
* मृत्यू : दोन ( वय 82 आणि 56; दोघांनाही मोठ्या सहव्याधी)
स्रोत : IDSP-IHIP
https://www.rediff.com/news/report/karnataka-records-first-h3n2-death/20...
Marburg विषाणूचा 21 मार्च
Marburg विषाणूचा 21 मार्च 2023 रोजी टांझानियात उद्रेक झालेला आहे.
ठळक घटना:
सुरुवातीलाच ८ बाधित झाले व त्यातील ५ मृत्युमुखी.
Ebola च्या जातीचा विषाणू
वटवाघळांच्या गुहांमधून आजाराचा उगम
मानवी प्रसार (रुग्ण आणि मृताच्या शरीरातून) रक्त आणि इतर द्रवांच्या द्वारा
रुग्णाला मोठा ताप, जुलाब आणि विविध ठिकाणाहून प्रचंड रक्तस्त्राव
विषाणू-विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत
डब्ल्यूएचओचे सर्वेक्षण चालू.
https://www.who.int/emergencies/disease-outbreak-news/item/2023-DON451
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात प्लेगचा एक रुग्ण आढळल्याची बातमी काही वृत्तपत्रांनी ठळकपणे दिलेली आहे. त्या रुग्णावर व्यवस्थित उपचार झालेले आहेत आणि काळजीचे कारण नाही.
गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेत वर्षाकाठी पाच ते दहा प्लेगचे रुग्ण आढळतात परंतु त्याची साथ होत नाही. (https://www.usatoday.com/story/news/health/2024/02/16/bubonic-plague-ore...)
वृत्तपत्रांनी उगाचच असा भडकपणा करायची गरज नाही :
“महाभयंकर ‘ब्यूबॉनिक प्लेग’ परततोय? हा रोग नेमका आहे तरी काय?”
https://www.loksatta.com/explained/bubonic-plague-is-back-rac-97-4216251/
गेल्या काही दिवसात जपानमध्ये
गेल्या काही दिवसात जपानमध्ये टॉक्सिक शॉक सिंड्रोम या गंभीर जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. आतापर्यंत तिथे याचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले आहेत. गेल्या २ दिवसात अनेक वृत्तपत्रांनी याची ठळक मथळ्यांमध्ये बातमी दिलेली असल्याने (https://www.indiatoday.in/health/story/flesh-eating-bacteria-infection-s...) त्याची ही नोंद आणि आजारासंबंधी थोडक्यात माहिती.
हा आजार दोन प्रकारच्या जंतूंमुळे होतो ( streptococci व staphylococci). बऱ्याच वेळा हे जंतू शरीरावर झालेल्या जखमामधून आत शिरतात. काही वेळेला एखाद्या व्यक्तीला influenza किंवा अन्य प्रकारचा विषाणू संसर्ग झाला असेल तर तिच्या बाबतीतही या जंतूंचा शिरकाव सोपा असतो.
संसर्ग झाल्यानंतर एक ते दोन आठवड्याच्या कालावधीत हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. सुरुवातीस ताप येऊन अंगावर पुरळ येतात. पुढे रक्तदाब खूप कमी होतो आणि अनेक महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा होते. बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण 30 ते 70 टक्के असते.
आजाराच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने, आपल्या हातांचे आरोग्य आणि शरीरावरील कुठल्याही जखमांची व्यवस्थित काळजी घेणे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
1980- 90 च्या दशकांमध्ये स्त्रियांमध्ये मासिक पाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट tampons मुळे हा आजार व्हायचा. कालांतराने तसले अतिशोषक गुणधर्म असणारे tampons वापरणे बंद झाल्यावर त्याचे प्रमाण कमी झाले.
डॉ कुमार, धन्यवाद. ही बातमी
डॉ कुमार, धन्यवाद. ही बातमी कालच वाचली होती.
सिलिकॉन मेन्स्ट्रुअल कप्स वापरणाऱ्या लोकांना या शॉक सिंड्रोम चा काही धोका/शक्यता आहे का?
सिलिकॉन मेन्स्ट्रुअल कप्स
सिलिकॉन मेन्स्ट्रुअल कप्स
>>> याच्या वापराने होणारा धोका अगदी कमी आहे.
मुळात हे वापरताना खालील गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे :
. कप एकदा योनीत ठेवल्यानंतर सुमारे दहा तासांनी तो काढला पाहिजे. जर का तो याहून जास्त काळ ठेवला तर मग जिवाणूंची वाढ व्हायची शक्यता राहते.
. कप बसवताना आजूबाजूला इजा होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे.
https://my.clevelandclinic.org/health/diseases/15437-toxic-shock-syndrome
धन्यवाद.
धन्यवाद.
Mpox ची जागतिक साथ
Mpox ची जागतिक साथ
2022 पासून 31 जुलै 2024 पर्यंत जगातील एकूण रुग्णांची संख्या 1,02, 977 इतकी झालेली आहे.
https://www.ecdc.europa.eu/en/news-events/mpox-epidemiological-update-mo...,(shinyapps.io)%20).
नुकताच भारतात याचा पहिला रुग्ण आढळला असून त्याचे विलगीकरण केलेले आहे. अलिकडेच एमपॉक्सची साथ असलेल्या देशातून परतलेल्या या व्यक्तीला ‘वेस्ट आफ्रिकन क्लॅड -२’ या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने ‘साथ’ जाहीर केलेला ‘क्लॅड १’ विषाणू आढळून आला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
https://www.loksatta.com/desh-videsh/monkeypox-case-confirmed-in-delhi-c...
(खालील मजकूर साथरोगासंबंधी
(खालील मजकूर साथरोगासंबंधी नाही परंतु कुष्ठरोगासाठी वेगळा धागा नसल्यामुळे येथे लिहीत आहे. कोणत्याही आजारासंबंधीच्या जागतिक घडामोडी यापुढे इथेच लिहिण्याचा विचार आहे).
कुष्ठरोगाचे संपूर्ण निर्मूलन झालेला जॉर्डन हा जगातील पहिला देश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.
त्या देशात गेल्या वीस वर्षात कुष्ठरोगाचा एकही स्थानिक रुग्ण आढळलेला नाही.
https://www.who.int/news/item/19-09-2024-jordan-becomes-first-country-to...
कुमार सर, काल
कुमार सर, काल चिकुनगुनियासंदर्भात हे फॉरवर्ड वाचलं.
*काळजी घ्या !!!*
*चिकुनगुनियाच्या या धोकादायक अवतारामुळे डाॅक्टरदेखील गोंधळले आहेत.*
चिकुनगुनिया विषाणूच्या नवीन प्रकाराने संपूर्ण शहरात कहर केला आहे. हा आजार इतिहासात पहिल्यांदाच भयावह, जीवघेणी लक्षणे दाखवत आहे. चिंतेची बाब म्हणजे, यात अर्धांगवायूसारख्या गंभीर आजाराचाही समावेश आहे.
चिकुनगुनियाच्या या धोकादायक अवतारामुळे डाॅक्टरदेखील गोंधळले आहेत.
संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी तातडीने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) या प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच चिकुनगुनियाच्या विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.
पुण्यातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञांच्या मते, एकेकाळी सांधेदुखी आणि ताप यासाठी ओळखला जाणारा चिकुनगुनिया आता मोठी आणि धोकादायक लक्षणे दाखवत आहे. यापूर्वी दोन हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवलेल्या शहरात यापूर्वी कधीही न पाहिलेली लक्षणे आता या आजारात दिसत आहेत. हा विषाणू डेंगीची नक्कल करत असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या विचित्र लक्षणांमुळे आता डॉक्टरदेखील गोंधळले आहेत.
राष्ट्रीय डेंगीतज्ज्ञ आणि केईएम हॉस्पिटलमधील आयसीयू आणि डेंगी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गादिया यांनी या संदर्भात 'सीविक मिरर'सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "या लक्षणांपैकी सर्वात धक्कादायक लक्षण म्हणजे नाक काळे पडणे. भूतकाळातील चिकुनगुनियाचा या वैशिष्ट्याशी कधीही संबंध नाही. हे पाहता आताचा चिकुनगुनिया अधिक चिंताजनक आहे. या लक्षणामुळे रुग्णांना सुमारे दोन आठवडे चालणे-फिरणेदेखील कठीण होत आहे.याची लागण झालेल्यांपैकी सुमारे २० टक्के रुग्णांचे नाक काळे झालेले आढळले. हे यापूर्वी कधीही दिसून आले नव्हते. यामुळे रुग्णांना घराबाहेर पडण्यास संकोच वाटत आहे.''
*अर्धांगवायूची लक्षणे*
गादिया यांच्या म्हणण्यानुसार, सर्वात धक्कादायक आणि धोकादायक लक्षण म्हणजे अनेक चिकुनगुनिया रुग्णांमध्ये अर्धांगवायूची लक्षणे दिसत आहेत. चिकुनगुनियामुळे इतकी गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
"रुग्णांच्या मज्जातंतूचे नुकसान होत आहे आणि अनेकांना अर्धांगवायू होत आहे. माझ्या ओपीडीमध्ये याच्या दररोज सरासरी ३० नवीन केसेस येत आहेत. गेल्या सहा ते आठ आठवड्यात एक हजाराहून अधिक चिकुनगुनियाचे रुग्ण मी तपासले आहेत. यापूर्वी कधीच अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. चिकुनगुनियाच्या या नव्या गंभीर प्रकाराचे रुग्ण इतक्या जास्त प्रमाणावर आहेत की, त्यामुळे डॉक्टर मेटाकुटीस आले आहेत. *वाघोली, प्रभात रोड, चंदननगर, हडपसर, बीटी कवडे रोड, कल्याणीनगर, आळंदी, मोशी, चाकण आणि भोसरी यासारख्या भागात अनेक कुटुंबांमध्ये याची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे,''* असे सांगताना शहरावरील चिकुनगुनियाची पकड दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे गंभीर वास्तव डाॅ. गादिया यांनी निदर्शनास आणून दिले.
चिकुनगुनिया नियंत्रणाबाहेर जाऊन संभाव्य प्राणघातक महामारीत रूपांतरित होत असताना, पुण्यातील शीर्ष संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी आता 'एनआयव्ही'ची मदत घेतली आहे.
डाॅ. गादिया आणि त्यांच्या निरीक्षणांशी सहमत असलेले नोबल हॉस्पिटलचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी या प्रकरणी 'एनआयव्ही'ने त्वरित हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, यावर जोर दिला. ते म्हणाले, *''या वेळचा ताण अत्यंत धोकादायक आहे. हे लहान मुलांवर आणि कॉमोरबिडीटी असलेल्या लोकांवर गंभीरपणे परिणाम करत आहे, ज्यामुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि अगदी क्वाड्रिप्लेजिया सारख्या मोठ्या गुंतागुंत निर्माण होऊ शकतात.* म्हणून या नवीन स्ट्रेनमध्ये काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी आम्हाला 'एनआयव्ही'ची मदत आवश्यक आहे.''
हे भयंकर परिवर्तन कशामुळे झाले हे निर्धारित करण्यासाठी गादिया आणि द्रविड यांनी सध्याच्या चिकुनगुनियाच्या स्ट्रेनच्या अधिकृत क्रमवारीची विनंती केली आहे. 'एनआयव्ही'च्या हस्तक्षेपाशिवाय परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि हिवाळा सुरू होईपर्यंत चालू राहू शकते, असा इशारा देतानाच या डॉक्टरांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि चिकुनगुनिया आणि डेंग्यूमधील फरक ओळखण्यासाठी लवकर तपासण्याचे आवाहन केले आहे. डेंगीची शंका दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी 'एनएस वन' चाचणीची शिफारस केली. त्यानंतर चिकुनगुनियाची तीव्रता वाढण्यापूर्वी पहिल्या पाच दिवसात पीसीआर चाचण्या करण्यास सुचवले आहे.
*डेंगीच्या लक्षणांशी साधर्म्य*
चिकुनगुनियाची लक्षणे आता डेंगीच्या लक्षणांशी साधर्म्य साधणारी आहेत. लक्षणांच्या या नकलेमुळे वैद्यकीय तज्ज्ञांचा गोंधळ उडत असल्याचा दावादेखील डाॅ. गादिया यांनी केला.
"रुग्णांच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी होण्यासारख्या गुंतागुंत निर्माण होत आहेत. ही डेंगीची लक्षणे आता चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. प्लेटलेटची संख्या अचानक कमी होणे, हे तर अधिकच भयावह आहे. कारण हे पूर्वी कधीही चिकुनगुनियाचे लक्षण नव्हते. प्लेटलेट्स आता पाच हजारांच्या धोकादायक पातळीपर्यंत घसरत आहेत. यामुळे चिकुनगुनियाचा नवा विषाणू जीवघेणा बनला आहे. पूर्वी चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स ८०,००० ते ९०,००० च्या खाली गेल्याचे आम्हाला कधीच दिसले नाही. यामुळे रुग्णाला डेंगीची लागण झाली आहे की चिकुनगुनियाची, याचे निदान करताना डॉक्टरांचा गोंधळ उडतअसल्याकडे राष्ट्रीय डेंगीतज्ज्ञ आणि केईएम हॉस्पिटलमधील आयसीयू आणि डेंगी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गादिया यांनी लक्ष वेधले.
अर्धांगवायूसोबतच आणखी धक्कादायक लक्षण म्हणजे नाक काळे पडणे. भूतकाळातील चिकुनगुनियाचा या वैशिष्ट्याशी कधीही संबंध नाही. *चिकुनगुनियाचे सुमारे ३० टक्के रुग्ण आता उलट्या आणि गॅस्ट्रोच्या लक्षणांसह येत आहेत.* हे कधीच झाले नव्हते. हा व्हायरस सतत नवनवीन लक्षणे दाखवत आहे. याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. चिकुनगुनियाचा हा नवीन प्रकार म्हणजे आणखी एक ताप नाही, तर तो जीवघेणा ठरत आहे.
- डॉ. राजेश गादिया, राष्ट्रीय डेंगीतज्ज्ञ आणि आयसीयू आणि डेंगी विभागप्रमुख, केईएम हॉस्पिटल
वावे,
वावे,
वरील मजकूर असलेली बातमी काही दिवसांपूर्वी इंग्लिश वृत्तपत्रांमधून आलेली मी देखील वाचली होती. त्यानंतर मी मोठ्या शासकीय रुग्णालयातील माझ्या काही सहकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडे तरी बातमीत ज्या पद्धतीने वर्णन केलेले आहेत तसे गंभीर रुग्ण नव्हते.
त्या बातमीमध्ये जरा सनसनाटीपणा आहे. अर्थात त्यामध्ये दिलेली रुग्णांची लक्षणे वगैरे गोष्टी खऱ्या आहेत. पण या वेळेच्या आजारात त्या प्रथमच दिसत आहेत हा भाग अतिशयोक्तीचा म्हणता येईल. कारण 2005 -06 मध्ये जेव्हा भारतात हा आजार मोठ्या प्रमाणात झाला होता तेव्हा सुद्धा काही रुग्णांमध्ये चेतासंस्थेच्या बिघाडाची लक्षणे दिसलेली होती. त्यामध्ये डोकेदुखी, फिटस येणे, स्नायूंच्या हालचालीवर परिणाम आणि संवेदनाशक्ती कमी होणे या गोष्टी आढळलेल्या होत्या.
या आजाराचे जे पुरळ उठतात त्याचे कालांतराने चट्टे होणे, कोरडे पडणे किंवा काळे पडण्यात रूपांतर होत असते. ही देखील पूर्वी लक्षात आलेलीच बाब आहे.
तसेच चिकुनगुनिया व डेंगी या दोन आजारांमध्ये लक्षणसाधर्म्य असतेच. चिकुनगुनियाच्या खात्रीशीर निदानासाठी RT-PCR ही चाचणी करणे आवश्यक आहे. अनेकदा ती चाचणी न करताच काही विधाने केलेली आढळतात. या सगळ्याची खातरजमा झाली पाहिजे.
सारांश : वरील मजकुरात चुकीचे किंवा खोटे काही नसावे कारण डॉक्टरांच्या नावाने सगळे लिहिलेले आहे. ती निरीक्षणे त्यांच्या रुग्णांची असू शकतात. परंतु एकंदरीत त्या बातमीला सनसनाटी मुलामा चढवलेला आहे.
अच्छा, आलं लक्षात.
अच्छा, आलं लक्षात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही नक्की योग्य माहिती द्याल अशी खात्री होती म्हणूनच इथे विचारलं
>>> नवीन Submitted by कुमार१
>>> नवीन Submitted by कुमार१ on 20 September, 2024 - 12:19
वाचून बरे वाटले. ती बातमी वाचली होती. भीती वाटत होती कारण एक दोन परिचितांना नुकताच हा रोग झाल्याचे ऐकले.
=====
माबोगुनिया झाला तर नाकाच्या ऐवजी अख्खे तोंड काळे होते. येथील सदस्यांनी चिकन गुनियाची भीती बाळगण्याचे त्यामुळे कारण नाही.
Pages