घराला दक्षिण दरवाजा नसावा का?

Submitted by Cuty on 8 March, 2020 - 07:11

रेंटवर फ्लॅट बघत आहोत. दोन फ्लॅट पसंत पडले आहेत. मला जो जास्त आवडला तो फ्लॅट नवरोबांना नकोय. कारण त्याचा दरवाजा दक्षिणेला आहे. दोन्ही फ्लॅटचे किचन उत्तरेला आहे. कोणी मार्गदर्शन करू शकेल काय? बरं फ्लॅट अर्जंट हवा आहे. दोन्हीपैकी कोणता घ्यावा?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> बाई कमावणारी नसेल किंवा खर्चात भागीदार नसेल तर तिचं मत विचारात घेऊ नये असं म्हणायचं असणार अॅमीला. > हो हेच म्हणायचं आहे.

बादवे जिज्ञासा, राजसी, टिपापावासी, इतर कोणी असतील ते, या सगळ्यांनी माझ्या प्रतिसादना irrelevant अलर्ट द्यायचा असं ठरलं होतं ना? की माझं मतच 'इथे' मांडायला आक्षेप घेताय? आणि हे ट्रोलिंग मधे येत की नाही?

माझं असं काही ठरलं नव्हतं ब्वा. मी इथे सकाळी लिहायला विसरले म्हणून आत्ता आले, राजसीचा प्रतिसाद दिसला. तुमची मतं काय आहेत हे वाचून माहित आहे म्हणून लिहिलं. हल्ली सगळ्यालाच ट्रोलिंग म्हणतात त्यामुळे ह्यालापण म्हणत असल्यास कल्पना नाही. डेफिनिशन माहित नाही आणि शोधायला जाणार नाही.

आभा, >> दक्षिणेला घराचं दार असेल तर दारावर आतील बाजूस गणपतीचा फोटो आणि समोरच्या बाजुस मारुतीचा फोटो लावावा असा सल्ला एका ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील एका सदस्याला दिला होता. ते त्या घरात गेली 20 वर्षे रहात आहेत आणि काही प्रॉब्लेम झाला नाही. बेसिकली दारातुन आत येणाऱ्या सो कॉल्ड नेगेटिव्हिटी / आजारपण इत्यादींना मारुतीच्या फोटोनी अटकाव होतो असा विचार त्यामागे होता.>> हा उपाय केल्यावर त्यांच्या मनातून दक्षिणमुखी घर घ्यायला नको होतं वगैरे विचार निघून गेले का?
ह्यावर आणखीन काही उपाय कुणाला माहित आहेत का?

प्रतिसादाबद्द् सर्वांचे आभार. खरी गंमत अशी आहे की आम्ही नवराबायको यापैकी कोणीच फार हट्टी किंवा दुराग्रही नाही. पण आमच्याकडे दोन फ्लॅटसचा ऑप्शन असल्याने हा घोळ झाला आहे. जर त्यापैकी एकच फ्लॅट शिल्लक असता तर आम्ही एकमताने लगेच तो घेतला असता. ' कुठे कायम रहायचेय. रेंटवर तर घ्यायचाय, असे म्हणून सहज तडजोड केलीच असती. आता एक फ्लॅट मला सोयीचा वाटतोय. तर नवर्याल दुसरा वास्तुशास्त्राप्रमाणे वाटतोय. अशी गंमत आहे.

तुम्ही/पतीने स्वतः कंपासने दिशा तपासली आहे का? नाहीतर काही एजंट इतके बेरकी असतात की मिळणार्‍या दक्षिणेनुसार त्यांची दक्षिण बदलते.... Happy
(मालकानेच लिहीले/सांगितले असेल तरी तपासून बघणे बरे.)

बेसिकली दारातुन आत येणाऱ्या सो कॉल्ड नेगेटिव्हिटी / आजारपण इत्यादींना मारुतीच्या फोटोनी अटकाव होतो असा विचार त्यामागे होता.>>>
चांगला उपाय. एयरपोर्ट / सिपोर्ट्सवर अंमलात आणला तर करोना विषाणु भारतात आला नसता.

आमचा एक कलीग होता. कुलकर्णी. कोथरुडात रहायचा. नोकरी हिंजवडी फेज २. २००७साली घर (विकत घ्यायला) शोधत होता. पिंपळे सौदागरात कुणाल आयकनपाशी एक फ्लॅट आवडलेला, बजेटमध्ये होता. सुगृहिणी बायको आणि आई किटकीटू लागल्या. कुठे जंगलात नेऊन ठेवतो, इथे आजूबाजूला काही फारशी दुकानं नाहीयत, वस्ती नाहीय, आम्ही तिकडे येणार नाही वगैरे... त्याने घर घेतलं नाही.
एक् वर्षाने परत त्याच सोसायटीत दुसरा फ्लॅट घेतला.
आणि मग पुढची ४-५ वर्ष (मी त्या कंपनीत होते तोपर्यंत) कधीही घराचा विषय निघाला की रडत होता - मला १४ लाख जास्त द्यावे लागले आई आणि बायकोच ऐकल्याने Sad Sad

आजूबाजूला काही फारशी दुकानं नाहीयत, वस्ती नाहीय, आम्ही तिकडे येणार नाही वगैरे.
>>>

आई बायको बरोबर होत्या. हे जास्त महत्वाचे आहे. त्याने चांगल्या लोकॅलिटीमध्ये कमी क्षेत्रफळ असलेला फ्लॅट घेतला असता तर जास्तीचे १४ लाख बॅलन्स झाले असते.

किंवा भूताटकीचा शिक्का बसलेला, अपघाती मृत्यु झालेला,
आधीच्या मालकाला पनवती ठरलेला फ्लॅट शोधला असता तर कदाचित आणखी १४ लाख कमी पडले असते.
डेअरींग हवी.नाहीतर रडणे आहेच.

इतर +१ करणार्यांना) 'बऱ्याचशा लेखांवर' माझे प्रश्न हे 'irrelevant, चांगल्या लेखाचा रसभंग करणारे, add no value but rather digress the topic' वगैरे वाटत असतील तर ते त्या त्या वेळी तिथेच पॉईंट आउट केले तर मला स्वपरिक्षणाला मदत होईल.

वर लिहिल्याप्रमाणे Point out करते आहे.

मला स्वपरिक्षणाला मदत होईल----  हे ट्रोलिंग मधे येत की नाही? --- स्व परीक्षणाला मदत झालेली दिसत नाही (गळा काढणं शब्द मनात येतोय.)

भूतकाळाच खोदकाम करायचं असेल तर गेल्या आठवड्यात, पंधरवड्यात, महिनाभरात मी दिलेले टॅजन्ट प्रतिसाद कोणते हे हे विपुत कळवले तर बरं होईल. आगाऊ आभार. --- मला तेव्हा हे जमलं असतं पण म्हटले एक-दोन दिवस वाट बघू नक्की हवा तो प्रतिसाद येणार, आणि तसंच झालेलं आहे.
आभार मानले तरी चालेल.

<< > बाई कमावणारी नसेल किंवा खर्चात भागीदार नसेल तर तिचं मत विचारात घेऊ नये असं म्हणायचं असणार अॅमीला. > हो हेच म्हणायचं आहे. >>
अ‍ॅमीतै, हॅपी बड्डे !!

> आई बायको बरोबर होत्या. हे जास्त महत्वाचे आहे. > नाही. त्या बरोबर नव्हत्या. डेव्हलप्ड कोथरुडला डेव्हलपिंग पिंपळे सौंदागरशी तोलत होत्या.
आणि एका वर्षात परत तिथेच रहायला आल्या म्हणजे वर्षभरात अपटू स्टॅन्डर्ड आली जागा की स्टॅन्डर्डच कमी झालं?
===

असो. आजचा प्रतिसाद कोटा सम्पला.
इतर रिकामटेकड्या ट्रोलना टाटा. तुमचं चालू द्या.

ॲमी, तुमच्याशी वाद घालण्याची आजिबात इच्छा नाही. स्वाती ताईंच्या मेपल सिरप च्या धाग्यावर
तुम्हीच म्हणालात की यापुढे जर तुमच्या पोस्ट्स भेदाच्या आणि धाग्याच्या विषयाशी टँजंट वाटल्या तर तुम्हाला सांगावे.
मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या टँजंट जाणाऱ्या पोस्ट्स जर दिसल्या (मी मुद्दाम शोधायला जाणार नाहीये. मी असं काही करत नाही) तर तुम्हाला विपू मधे कळवेन. त्यावर तुम्ही विपू न करता त्याच धाग्यावर कळवावे असे सांगितले. त्याप्रमाणे राजसी आणि मी इथे सांगितले आहे. मात्र एकूणच तुमचा दृष्टिकोन बघता यापुढे तुम्हाला काही सांगावे असे मला वाटत नाही. शिवाय दुसऱ्याच्या धाग्यांवर असे अवांतर करणे मला योग्य वाटत नाही. तुम्हाला किंवा कोणालाच ट्रोल करण्यात मला बिलकुल रस नाही. Please do not feel inhibited by any of my comments. You have the right to express your opinions in your own words. I respect your freedom of expression. शुभेच्छा!

ॲमी, अगदीच राहवलं नाही म्हणून लिहीत आहे. नवरा रेंट/EMI देणार आहे कारण बायको नोकरी करत नाही, म्हणून तिच्यापेक्षा नवऱ्याचं मत महत्त्वाचं, असंच म्हणायचंय. ना तुला?
बाकी सगळं (सहजीवन, निर्णयात सहभाग, इत्यादी इत्यादी) जाऊदे, पण बायको नोकरी/व्यवसाय करत नाही म्हणजे ती जास्त काळ घरात असते, मग तिला जास्त सोयीस्कर असलेलं घर बघायला नको का?
Cuty, तुमचा निर्णय झालेला असेल तर अभिनंदन. झाला नसेल तर शुभेच्छा Happy

वावे अजून निर्णय नाही झाला. नवराही तेच म्हणतोय. जे तुला सोयीस्कर असेल ते बघू ( किचन मोठे वगैरे.) कारण तो कामानिमित्त दिवसभर बाहेरच असतो. उद्या तिथे जाणार आहोत तर पुन्हा एकदा सकाळच्या प्रकाशात दोन्ही फ्लॅट पाहून निर्णय घेऊ. वर एका प्रतिसादात उल्लेख आहे त्याप्रमाणे दिशाही मालक सांगतो नेमकी तशीच आहे का हेही पहावे लागेल. कारण सर्व ईमारती काही अगदी बरोबर पूर्वपश्चिम नसणार. नवर्याने दिशेचा मुद्दा उपस्थित केला असला तरी त्याला मी कोणताही फ्लॅट घेतला तरी चालेल.

नवराही तेच म्हणतोय. जे तुला सोयीस्कर असेल ते बघू ( किचन मोठे वगैरे.) कारण तो कामानिमित्त दिवसभर बाहेरच असतो. >>>
चांगले आहे. नविन घराकरता तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

किंवा भूताटकीचा शिक्का बसलेला, अपघाती मृत्यु झालेला,
आधीच्या मालकाला पनवती ठरलेला फ्लॅट शोधला असता तर कदाचित आणखी १४ लाख कमी पडले असते.>>> हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. पछाडलेले घर घ्या आणि एके संध्याकाळी मला फक्त चहा पिण्यासाठी बोलवा.

नाही. त्या बरोबर नव्हत्या. डेव्हलप्ड कोथरुडला डेव्हलपिंग पिंपळे सौंदागरशी तोलत होत्या
>>>>

त्या तोलत नव्हत्या तर त्या आपली सोय बघत होत्या. जी जागा डेव्हलप व्हायची आहे अश्या निर्जन जागी एका मोठ्या घरात भुतासारखे एकटे राहणे नाही जमत बरेच लोकांना..
मी हे चांगले समजू शकतो कारण मी मुंबईचा आमचा गजबजलेला भाग सोडून नवी मुंबईत सेटल होतोय. त्यामुळे आवर्जून डेव्हलप झालेल्या भागातच घर बघत होतो. याऊलट माझ्या बायकोचे बालपण डेव्हलपिंग भागात गेल्याने तिला पुन्हा नव्याने अश्या एखाद्या जागी घर घेण्यात काही प्रॉब्लेम नव्हता. मी जेव्हा गजबजलेल्या परीसराचा हट्ट धरायचो तेव्हा तिलाही मी असाच समजायचो नाही.

मॉरल ऑफ द स्टोरी - घर बघताना कोणाला काय हवेय हे ज्याचे तो योग्य ठरवू शकतो. आपल्या निकषांवर समोरच्याला मुर्ख घोषित करण्यात अर्थ नाही.
अर्थात न कमावणारया बायकांनी आपले मत ठेऊच नये असे आपले मत असल्याने विषयच संपला ती गोष्ट वेगळी.

हो जवळपास घरं, दुकानं फारशी नाहीत अशा ठिकाणी रहाणे अनेकांना जमत नाही, तिथे अंधार पडल्यावर जाता येताना भीती वाटणारेही असतात. सध्या मी ज्या भागात घर घेतलंय ते अशाच शांत ठिकाणी. ही जागा तशी माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांना आवडते पण त्यातील बहुतेकांना रात्री भीती वाटते.


मॉरल ऑफ द स्टोरी - घर बघताना कोणाला काय हवेय हे ज्याचे तो योग्य ठरवू शकतो
>>> असे असते तर या विषयावर धागे निघाले नसते, चर्चा झाल्या नसत्या.

बोकलत, तुम्हाला चहाला बोलवायची काय गरज. तुम्ही हवे तेव्हा हवेतून तरंगत, भिंतीतून आरपार येऊन माझ्या घरातला चहा माझ्या नकळत कधीही संपवू शकता. मला पण थोडा शिल्लक ठेवत जा. ( हसरी बाहुली)

बोकलत, तुम्हाला चहाला बोलवायची काय गरज. तुम्ही हवे तेव्हा हवेतून तरंगत, भिंतीतून आरपार येऊन माझ्या घरातला चहा माझ्या नकळत कधीही संपवू शकता. मला पण थोडा शिल्लक ठेवत जा. ( हसरी बाहुली) >>> झाले म्हणजे, बघा हं बोकलतांना तुम्हीच आमंत्रण दिलेय, आता काही अमानविय घडलेच घरी तर ....

<<< अर्थात न कमावणारया बायकांनी आपले मत ठेऊच नये >>> मला मुळात हेच कळत नाही की जर संसार दोघांचा तर दोघांच्या मताला समान किंमत्/मान असायला हवा. न कमावणारी बायको असो वा नवरा, त्यांच्यापरीने काहीतरी नक्कीच करत असतील ना घरासाठी. गृहिणींचे आयुष्यही काही अगदीच सोपे सुरळीत नसते.

क्युटी, आपल्या मानण्या न मानण्यावर असते सगळे.
बाकी इथेही घरी बसलेल्या बायका/ गृहिणी जी कामं करतात ते सगळं फुकट मिळणार्‍या अन्न वस्त्र निवार्‍याच्या बदल्यात करतात यापुढचं म्हणजे त्या कुठलंही मत प्रदर्शन करायला लायक नाहीत आणि त्या कमावत नसल्याने/ घराचं भाडं भरणार नसल्याने त्यांचं मत कुणी विचारात घेत नसेल आणि घेउ नये इथवर आलं का?

एक जोक

बॉयफ्रेंड - तुझ्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे?

गर्लफ्रेंड - पूर्वेला

बॉयफ्रेंड - तरीही तुझ्या डोक्यात का प्रकाश पडत नाही?

मी हा जोक वाचला होता आधी पण थोड्या फरकाने

गर्लफ्रेंड - तुझ्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे?

बॉयफ्रेंड - पूर्वेला

गर्लफ्रेंड - तरीही तुझ्या डोक्यात का प्रकाश पडत नाही?

हे ट्रोलिंग मधे येत की नाही? >>>> विनोदी आहे हे! ट्रोल उलट त्यांना कन्फ्रन्ट करणार्‍यांनाच म्हणातायत तुम्ही मला ट्रोल करता म्हणून? Lol ट्रोल कोण आहे इथे? a troll is a person who starts quarrels or upsets people on the Internet to distract and sow discord by posting inflammatory and digressive, extraneous, or off-topic messages in an online community (such as a newsgroup, forum, chat room, or blog) with the intent of provoking readers into displaying emotional responses[2] and normalizing tangential discussion, whether for the troll's amusement or a specific gain.
असो. चालू द्या. अतिप्रेडिक्टेबल करमणूक आहे ही.

वरची डेफिनिशन विकी वरून घेतली आहे ते स्पष्ट करा बुवा. विकी वरून घेणं महत्त्वाचे आहे. (शक्यतो अनुवाद करून टाकला असता तर अजुन बरे झाले असते)

Pages