श्री नरेंद्र मोदी करणार सोशलमाध्यमांना टाटा बाय बाय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 March, 2020 - 11:37

भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठा निर्णय घेणार आहेत.

मोदी सोशलसाईटवरून अखेरचा निरोप घेणार आहेत.

मोदीजी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील अकाऊंट बंद करणार आहेत.

याची माहिती लवकरच देण्यात येईल असेही मोदींनी सांगितले आहे.

फेसबूक पेटून ऊठले आहे. पण मला वेगळाच संशय येत आहे....

कदाचित ते रिलायन्सला सोबत घेऊन स्वत:ची सोशलसाईट काढू शकतात. डबल्यू डबल्यू डबल्यू मोदी डॉट कॉम... तसे झाले तर आधी भक्त, पाठोपाठ द्वेष्टे, आणि नंतर पॉपकॉर्नप्रमी सारेच तिथे वळतील. मोदी फेसबूक व्हॉटसप ट्विटर ईन्स्टाचे दुकान एकहाती बंद करतील. त्यांचा ऑर्कुट करतील.. देव न करो पण अर्धी मायबोलीही थंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना व्हाईरस आधी या संकटाचा सामना करण्यास सज्ज राहणे गरजेचे.

जनहितार्थ जारी

धागा गंभीर आहे !
पण वातावरणातील तणाव हलका करायला अध्येमध्ये हलकेफुलके विनोदी प्रतिसाद देऊ शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages