नमस्कार मायबोलीकर!
मराठी भाषा दिवस २०२०च्या समारोपाची वेळ येऊन ठेपली आहे. गेले दहाबारा दिवस चालू असलेले विविध उपक्रम आणि तीन दिवस सुरु असलेले शब्दखेळ यांमुळे मराठी भाषेचा हा उत्सव खरंच खूप रंगतदार झाला.
आनंदछंद ऐसा या उपक्रमाला मायबोलीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अर्थात, विविध कलाकौशल्यांमध्ये निपुण असलेल्या मायबोलीकरांना आपल्या छंदांबद्दल लिहायला आवडेल याची आम्हाला खात्री होतीच आणि ती खात्री सार्थ ठरवल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
डॉ. अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या विनंतीवरून डॉ. अनिल अवचटांवर उत्कृष्ट असा विशेष लेख लिहून देऊन मभादि २०२० ची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही डॉ. अतुल ठाकूर यांचे अत्यंत आभारी आहोत.
स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा आणि अक्षरचित्रे या उपक्रमांना मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. विशेषतः लहान मुलांना हमखास आवडेलसा चित्रं रंगवण्याचा उपक्रम असूनही अक्षरचित्रांना प्रतिसाद न मिळाल्याबद्दल आम्हाला सखेद आश्चर्य वाटत आहे. अत्यल्प प्रतिसादामागे नेमकी काय कारणं होती हे कळलं तर त्यातून यापुढच्या उपक्रमांच्या संयोजकांना शिकायला मिळेल.
स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा हा उपक्रम इथेच बंद न करता यापुढेही चालू ठेवूया असं आम्हाला वाटतं. मायबोलीवरच्या कुशल सुगरणी आणि बल्लवाचार्यांच्या, विज्ञानावर आधारलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या वाचायला आपल्या सर्वांनाच आवडतील याची खात्री आहे. तो धागा आता पाककृती आणि आहारशास्त्र या ग्रुपमध्ये हलवत आहोत.
संयोजक म्हणून काम करताना आम्हाला नक्कीच खूप आनंद मिळाला आणि अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या. मभादि २०२० वरच्या मायबोलीकरांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचे मनोधैर्य वाढवत होत्या. त्याबरोबरच मराठी भाषा दिवस अधिकाधिक चांगला होण्याच्या दृष्टीने तुमच्या काही विधायक सूचना असतील तर त्याही आवर्जून येथे लिहा.
असाच लोभ राहू द्यावा ही विनंती.
मराठी भाषा दिवस २०२० संयोजन मंडळ
( वावे, विनिता.झक्कास, अज्ञानी, यतीन, कुंतल, किल्ली)
छान झाला उपक्रम. कौतुक.
छान झाला उपक्रम. कौतुक.
कमी वेळात छान उपक्रमांचं
कमी वेळात छान उपक्रमांचं आयोजन करून मायबोली मराठी दिन साजरा केल्याबद्दल संयोजकांचे आभार आणि कौतुक.
प्रवेशिका वेळ मिळेल तशा वाचून/पाहून अभिप्राय देईनच.
उपक्रम खरच छान झाला.. विषेश
उपक्रम खरच छान झाला.. विषेश आवडले ते "आनंद छंद ऐसा" सदर .. अनेक छुप्या कलाकारांची ओळख झाली त्यामुळे!
धन्यवाद संयोजक!
संयोउजकांचे आभार ! त्यानी
संयोजकांचे आभार ! त्यानी लेखकाना लिहिते केले आणि वाचकाना चांगले काही वाचायला मिळाले !
सर्व नवीन प्रतिसाददात्यांचे
सर्व नवीन प्रतिसाददात्यांचे आभार!
काही आयडींनी सूचना केल्यानुसार अक्षरचित्रांंमध्ये लपलेली अक्षरे देत आहे.
मा
य
बो
कदाचित अक्षरं ओळखायला मुलांना थोडी कठीणच गेली असतील. हरकत नाही. पुढच्या वेळी हे लक्षात ठेवून सुधारणा करता येईल.
धन्यवाद.
छान कार्यक्रम होते.
छान कार्यक्रम होते. संयोजकांचे अभिनंदन!
वाचतेय सारं हळूहळू.
Pages