इंदोरीकर महाराज नवा वाद

Submitted by आर्यन वाळुंज on 16 February, 2020 - 10:14

इंदोरीकर देशमुख महाराज हे किर्तनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मला तरी हा माणूस किर्तनकार कधीच वाटला नाही. माझ्या बालपणापासून मी हरिनाम सप्ताहात किर्तन, प्रवचन ऐकत आलो आहे. मला घडवण्यात या किर्तनांचा मोठा वाटा आहे.
बाबामहाराज असोत किंवा खेड्यातील प्रसिध्दी न मिळालेले किर्तनकार असोत. या पंथाची एक डिग्निटी सांभाळली होती या लोकांनी.
हा इंदोरीकर महाराज सासू सून भांडण, बेवडे, पोरींची लफडी याच्याशिवाय काही बोलतच नाही. किर्तनकारानं आपल्या प्रगल्भ आणि अहंकार रहित आचरणातून समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.
आता नवा वाद निर्माण केला आहे. काय तर म्हणे अमुक तमुक तिथीला अमकं काम केले तर तमकं होते.
त्यांच्या वक्तव्याला विरोध करणारांना सोशल मीडिया वर शिव्या दिल्या जात आहेत आणि बहुसंख्य लोक इंदोरीकर महाराज देशमुख यांना सपोर्ट करत आहेत. पण ते स्वत: बॅकफूटवर आले तरीही आपण चुकीचं बोललो नाही असे म्हणतात.
पुढे काय होते ते पाहणं आपल्या हाती आहे. महाराज लोक आपण सर्वज्ञ असल्याचं भासवत काहीही रेटून बोलत असतात. हे म्हणजे पृथ्वी सपाट आहे असं काही लोकांना वाटतं तसं आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@साधना

लोक ज्या आवेशाने सम विषम वर तुटून पडले तितक्या आवेशाने स्वतःच्या गावात/तालुक्यात/शहरात असलेल्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांवर तुटून पडले तर प्रबोधनापेक्षाही थेट काम होईल. पण प्रत्यक्ष हा धंदा करणाऱ्यांविरुद्ध समाज कायम गप्प बसतो हे बघितले आहे. माहीत सगळ्यांना असते पण कोणी बोलत नाहीत.

आपला प्रतिसाद अतिशय एकांगी आहे.

आता आता पर्यंत फीचरफोन भरपूर आणि स्वस्त उपलब्ध होते. परंतु स्मार्ट फोन आल्यावर त्यांची मागणी आणि त्यामुळे त्याचे उत्पादन एकदम रसातळाला गेले आहे. जर मागणीच नसेल तर किती डॉक्टर गर्भ लिंग चिकित्सा करू शकतील?

केवळ डॉक्टरांना पकडून त्यांच्यावर खटला भरल्याने काहीही होणार नाही किंवा होत नाही हे हा कायदा २६ वर्षे अस्तित्वात असूनही सिद्ध झालेले आहे. मला मुलगाच हवा आहे पण शेजार्याला मुलगी होऊ दे हिच समाजाची दांभिक वृत्ती आहे. आजवर गर्भलिंग चिकित्सा केली म्हणून किती जोडप्यांवर कार्यवाही करून त्यांना सज्जड शिक्षा झाली झाली. गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांइतकेच ते पण जबाबदार आहेत ना?

केवळ सवंग लोकप्रियतेसाठी डॉक्टरवर कारवाई करा पण समाजाला काही बोलायचे नाही हा राजकारण्यांचा खेळ चालू आहे. आणि समाजाला सुद्धा मलमपट्टीच हवी आहे

आपला समाज जास्तच दांभिक आहे.

मुंबईत गर्भलिंग चिकित्सा सहज होत नाही म्हणून कोल्हापुर निपाणी किंवा सोलापूरला करून घेतली असे सांगणारे महाभाग भेटतात. किंवा उच्चभ्रू लोक सिंगापूर बँकॉक ला जाऊन गर्भलिंग चिकित्सा करून येतात( तेथे ते कायदेशीर आहे) किंवा आता तर नुसतेच रक्त परदेशी पाठवून तेथे डी एन ए चाचणी करून गर्भलिंग चिकित्सा करून घेतात. यात भारतीय डॉक्टर कुठे आहेत?

स्त्री भ्रूण हत्येपेक्षा स्त्रीबालक हत्येचे प्रमाण कितीतरी जास्त आहे हि भयानक वस्तुस्थिती आहे . पण त्याविरुद्ध कोणी आवाज उठवताना दिसले नाही

The children's rights group CRY has estimated that of the 12 million females born yearly in India, 1 million will have died within their first year of life.

In 1990, Amartya Sen writing in the New York Review of Books estimated that there were 100 million fewer women in Asia than would be expected, and that this amount of "missing" women "tell[s] us, quietly, a terrible story of inequality and neglect leading to the excess mortality of women."

https://en.wikipedia.org/wiki/Female_infanticide

कुटुंब नियोजन करणे हे आताच्या घडीला खूप आवशक्या गोष्ट आहे.
मुलांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थित पालनपोषण होण्यासाठी खूप पैस्याची गरज लागते.
पैसा नसेल तर मुल हुशार असेल तरी उच्च शिक्षण पासून वंचित राहू शकते ही सत्य परिस्थिती आहे.
त्या नंतर भयंकर वाढली गेलेली लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेले पर्यावरण हानी सारखे प्रश्न,बेरोजगारी हे अंतिम टप्प्ापर्यंत आहेत आणि त्याचे गंभीर परिणाम अनेक देशांवर दिसत आहेत
पूर्वी मुलगा हवाच असा लोकांचा हट्ट हास असायचा कारण आपली पुरुष सत्तक कुटुंब पद्धती.
पण त्या हट्ट साठी स्त्री गर्भाची हत्या होत नसे मुलांची संख्या जास्त असल्यामुळे पाच मुलीत एक तरी मुलगा व्हायचं च.
तेव्हा कुटुंब मोठी होती.
पूर्वी कुटुंब बघितली तर 5 मुली 5 मुलगे असे दहा दहा मुल असायची.
आता ती स्थिती नाही.
आता मुलगाच हवा कशासाठी?
तर मुलगी ही लग्न झाल्यावर सासरी जाते त्या मुळे आई वडिलांची जबाबदारी घेवू शकत नाही.
संपत्ती चा वारस हा मुलगा असतो मुलगी असेल तरी काही हरकत नाही पण मुली च्या घरी येवुन राहण्यास किती पुरुष तयार होतील.
हा तर प्रॅक्टिकल प्रश्न आहेच ना.
दुसरे ह्यात तुम्हाला जास्त ऑप्शन नाही दोनच
मुलात एक मुलगा असला पाहिजे किंवा एकच दोन पेक्षा जास्त मुल जन्मास घालणे व्यवहारिक नाही.
मग त्या मुळे गर्भ चिकिस्त आणि स्त्री भ्रूण हत्या असे प्रसंग घडतात.
आणि ह्या कृती मध्ये स्त्री द्वेष बिलकुल नाही
कारण गर्भ chikista ही स्त्री आणि पुरुष दोघांच्या समंती ने होते फक्त पुरुष निर्णय घेत नाही

मग हे टाळायचे कसे?
काही तरी मार्ग सुचवा जनतेला जो प्रॅक्टिकल असेल भावनिक आव्हान करून प्रश्न सुटणार नाही

डॉक आणि साधना तुम्ही दोघेही बरोबरच सांगता आहात. फक्त समाजाचं वैचारिक परिवर्तन झाले तरच शक्य आहे.

मुळात मुलगी नको हेच मूळ आहे.
परदेशात चाचणी अवैध करायची गरज भासत नाही कारण त्याचा गैरवापर करण्याचा हेतू नसतो.

Srd
लोकांचे वैचारिक परिवर्तन भावनिक आव्हान करून होणार नाही.
त्यांच्या प्रश्नांना practicaly possible पर्याय दिला पाहिजे

मुलगी ही लग्न झाल्यावर सासरी जाते त्या मुळे आई वडिलांची जबाबदारी घेवू शकत नाही.
का?
हि केवळ पुरुषसत्ताक मनोवृत्ती आहे.
आणि ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत त्यांच्या आईवडिलांची जबादारी कुणी घ्यायची कि त्या मुलींनी लग्नच करायचे नाही?

संपत्ती चा वारस हा मुलगा असतो.
हे कुणी ठरवलं/ केवळ रूढी परंपरा आहे म्हणून

मुलगी असेल तरी काही हरकत नाही

हरकत घेणारे तुम्ही कोण?
हि तर पुरुष प्रधान मनोवृत्ती झाली.

गर्भ chikista ही स्त्री आणि पुरुष दोघांच्या समंती ने होते फक्त पुरुष निर्णय घेत नाही.

याला कोणताही आधार नाही.
असे (आणि बहुसंख्य महत्त्वाचे) निर्णय घेताना ९० टक्के वेळेस स्त्रीला विचारलेच जात नाही.

मला वाटतंय लग्न झाल्यावर मुला मुलीच्या आई वडिलांनी एकत्र येऊन मेंढी कोट खेळावा जेणेकरून भांडणं कमी होतील. धाग्याने शंभरी गाठल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन.

खरे sir
एकच मुलगी असणे किंवा दोन्ही मुलीचं असणे हा प्रश्न आता निर्माण झालंय.
आता अस्तित्वात असलेल्या कुटुंबात फक्त मुली असण्याला जास्त दिवस झालेले नाहीत.
जास्तीत जास्त ३० वर्ष झाली आहेत.
समस्या काय येतील आणि त्याला काय मार्ग निघेल हे अजुन दिसून आलेलं नाही.
अजुन ३० वर्षा नंतर रिझल्ट यायला suravat होईल.
समस्या येणारच नाही हे ठाम पने सांगता येणार आता सांगता येणार नाही.
परिवर्तन च घडवायचे असेल तर बऱ्याच गोष्टी बदलायला लागतील त्या साठी कायदे सुधा बदलावे लागतील.
नवीन यंत्रणा उभराव्या लागतील.
समाजातील फक्त एकाच घटकाचा विचार करून चालणार नाही तर सर्व घटकांना न्याय मिळणे गरजेचं आहे.
परदेश ची उद्दहरण आपण देतो पण त्यांनी तस्या यंत्रणा निर्माण केल्या आहेत.
आपल्या कडे स्वच्छता निर्माण झाली पाहिजे म्हणून थुंकण्यावर ,कचरा n टाकण्याचे आव्हान केले जाते पण कचरा कुंडी किंवा थुक दानीचा बंदोबस्त केला जात नाही त्या मुळे स्वच्छता कधीच निर्माण होत.नाही.
तसेच सर्व बाबतीत होत आहे.

इंदिराजी असतील किंवा सुप्रिया जी असतील ह्या दोन्ही व्यक्ती सधन कुटुंबातील आहेतच उलट सत्ताधारी कुटुंबातील सुद्धा आहेत .
त्या दोन्ही जनी सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत .
सर्व सामान्य कुटुंबातील प्रश्न वेगळे असतात.

आजुबाजुला 1 मुलगी असलेले हुशार बाप ढीगभर सापडतील

त्या यादीत आम्हीहि आहोत,

हिन्दू पुरुष , मुस्लिम पुरुष , सगळे वारस बोम्बलत बसले आणि ख्रिश्चन राणी ने राज्य गिळले,

तरी मूर्खाणां पुरुष वारस हवे असतात

आता आता पर्यंत फीचरफोन भरपूर आणि स्वस्त उपलब्ध होते. परंतु स्मार्ट फोन आल्यावर त्यांची मागणी आणि त्यामुळे त्याचे उत्पादन एकदम रसातळाला गेले आहे. जर मागणीच नसेल तर किती डॉक्टर गर्भ लिंग चिकित्सा करू शकतील?>>>>

तंत्त्विकदृष्ट्या योग्यच आहे हो. पण लोक कुठे सुधारताहेत? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे कसे वाईट हे प्रत्येकजण जाणतो, प्लास्टिक मध्ये अडकलेल्या प्राण्यांचे फोटो व्हात्सापवर फॉरवर्ड करतील आणि स्वतः हात हलवत बाजारात जातील. म्हणून सरकाराला अमुक एका मायक्रोनखालच्या प्लास्टिकवर बंदी घालावी लागते, थर्मोकोलवर बंदी घालावी लागते. स्त्रीच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी संग नीतीला धरून नाही हे सगळ्यांना माहीत आहे तरीही 3 महिन्याच्या मुलीपासून 70 वर्षाच्या वृद्धेपर्यंत बलात्कार होतात. म्हणून सरकारला कायदे करावे लागतात. गर्भलिंगपरिक्षेविरुद्धही कायदा आहेच. डॉक्टर शिक्षित व्यक्ती आहे तरी तो कायदा पाळत नाही हे एक आणि जीव वाचवणे हे त्याचे काम असूनही तो गर्भातील जीव तसेच काही कारण नसताना मारतो हे दुसरे. एक शिक्षित जबाबदार माणूस असे वर्तन करतो तर बाकी आम जनतेचे काय विचारता?

भारतीय लोक स्वतःहून शहाणे होतील ही शक्यता शून्य आहे. तुम्हाला माहीत असेलच स्वातंत्र्यलढ्यात जहाल व मवाळ असे दोन विचार प्रवाह होते. आधी जनता शहाणी करूया, स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याच्या जबाबदाऱ्या वगैरे लोकांना समजू दे, मग स्वातंत्र्य मिळवूया असा एक विचार होता. तर आधी स्वातंत्र्य मिळवायला हवे, ते एकदा मिळाले की शिक्षण मिळून लोक आपोआप शहाणे होतील हा दुसरा विचार होता. शेवटी स्वातंत्र्य मिळवले पण लोक जसे होते तसेच राहिले.

हिन्दू पुरुष , मुस्लिम पुरुष , सगळे वारस बोम्बलत बसले आणि ख्रिश्चन राणी ने राज्य गिळले,
>>> राज्य इस्ट इंडिया कंपनीने गिळले. राणीनं आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या.

प्रत्येक समस्येचा चहू बाजूंनी विचार करून जो पर्यंत त्या वर उपाय शोधला जात नाही तो पर्यंत समस्या सुटूच शकत नाही.
पण हा मार्ग लांबचा असतो ,कष्टाचा असतो आणि निरंतर प्रयत्न करण्याला इथे पर्याय नसतो.
त्या पेक्षा समस्येवर उथळ पने निष्कर्ष काढून उथळ मार्ग शोधणे हे खूप सोपं असतं पण त्या मधून हाती काहीच लागत नाही.
स्त्री आणि पुरुष समानता म्हणजे काय तर दोघांना सामान हक्क असाच घेतला पाहिजे पण आपण त्याचा अर्थ स्त्री ला झुकते माप असा घेतो म्हणजे स्त्री कमजोर आहे पुरुषां ची बरोबरी करू शकणार मग तिला पुरुषांची स्पर्धा करायची असेल तर सवलत दिली पाहिजे ह्या निर्णयावर येवून परत आपण भेदभावाचा मार्ग मोकळा ठेवतो.
स्त्री गर्भाची काही लोक हत्या का करतात
काही तर कारण असतील ना .
पण त्या वर कधी चर्चा होते का
गर्भ पाताचा हक्क मिळालाच पाहिजे अशी
सुद्धा लोकांची मागणी असते.
ऐकी कडे स्त्री गर्भाची गर्भात हत्या नको अशी मागणी असते तर दुसरीकडे गर्भाची हत्या (गर्भपात)करण्याची परवानगी असावी अशी पण मागणी असते.
आणि ह्या दोन्ही प्रसंगात स्त्री वर अन्याय होत आहे अशी झालर दिलेली असते आणि पुरुष चा इथे काहीच संबंध नाही हा स्त्री मुक्ती चा प्रश्न आहे असे पण ठासावले जाते पण बिना पुरुषाचा सहभाग शिवाय ही समस्या निर्माणच होत नाही त्याच्या मताला सुद्धा इथे कीमंत आहे..
पण त्या बाजूंनी विचार न केल्या मुळे समस्या जागेवरच राहते फक्त गोंगाट ऐकायला येतो.

चिवट
ज्या विषयावर चर्चा चालली आहे त्या विषयाला धरून पोस्ट टाका.
आपण एका चांगल्या दर्जाच्या web side var charcha karat ashot.
Darja rakha

>>भारतीय लोक स्वतःहून शहाणे होतील ही शक्यता शून्य आहे. >>
हो.
-------
हल्ली म्हाताऱ्या आईवडिलांना शेवटी मुलीच पाहतात.

पुणे | तमाशाने कोणी बिघडत नाही आणि कीर्तनाने कोणी सुधरत नाही, असं वक्तव्य प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलं आहे. निवृत्ती महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, तमाशाकडे गेलेला माणूस त्यांनी कीर्तानाकडे आणला, असं त्यांच्या समर्थकांनी म्हटलं होतं. यावर खेडकरांनी आपली बाजू मांडत इंदोरीकारांच्या समर्थकांना चपराक लगावली आहे.

काही खोडकर हिंदू धर्म विरोधी लोक सोडली तर प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज सुधारक indorikar महाराज ह्यांनी काही चुकीचं वक्तव्य केले नाही असेच सर्व समजतात आणि काही लोकांना केले आहे असा समज असेल तरी थयथयाट करण्या एवढे गंभीर नाही

कीर्तनाचा मूळ उद्देश हाच होता यात शंका नाही. पण मुळात अध्यात्माकडे वळण्यासाठी आधी वाईट व्यसने, कलह, दुर्बुद्धी नष्ट व्हायला हवी. त्यासाठीही प्रबोधन व्हायला हवे. ते कसे होणार? कीर्तन ही एक सोय आहे, तिथे चांगले विचार कानी पडले तर बरेच आहे.

इंदुरीकर महाराजांनी दारू पिऊ नका म्हटले ते किती जणांनी ऐकले? किती सासवा सुनांनीं भांडणे मिटवून गळ्यात गळे।घातले?
>>>>>>>>>>
साधनाजी वरच्या विधानात विरोधाभास दिसतो. समाजप्रबोधनासाठी कीर्तन सोय असेल आणि लोक प्रबोधन करून घेण्यासाठी गर्दी करत असतील तर मग इंदोरीकर महाराजांनी सांगितलेले फार कमी जणांनी ऐकले असे होणार नाही. असे होत असेल तर लोक फक्त समाजप्रबोधनाच्या नावाखाली जी विधाने केली जातात (जी बऱ्याचदा विनोदी, आक्षेपार्ह पण असतात) ती ऐकून करमणूक करून घेण्यासाठी गर्दी करत असावेत. मग प्रबोधनाचा उद्देश साध्य झाला असे कसे म्हणता येईल
दुर्दैवाने सध्या लोकांना फक्त करमणूक हवी आहे आणि इंदोरीकर महाराज ती देतात म्हणून गर्दी होते. ते खूप छान कीर्तन करतात असे नाही. तसेही त्यांच्या बोलण्यात कीर्तनविषय कमी आणि सांसारिक विषयच जास्त असतात आणि त्यामुळे कीर्तनाचा मूळ गाभाच हरवतो. म्हणूनच कीर्तनामध्ये कीर्तन कमी आणि समाजप्रबोधन जास्त हा प्रकार मला चुकीचा वाटतो कारण प्रबोधनाच्या नावावर आणि गर्दी खेचण्यासाठी बरेचदा काहीही बोलले जाते आणि कीर्तनाचा मूळ उद्देश मागे पडतो. तसेही कीर्तनामुळे ईश्वरप्रेम जागृत झाले की वाईट सवयी आपोआप सुटत जातात त्यामुळे कीर्तन जास्त आणि थोड्याफार प्रमाणात जसे आवश्यक असेल तसे योग्य वक्तव्ये करून समाजप्रबोधन करावे. परंतु इंदोरकर महाराज बरोबर उलटे करतात.

काही खोडकर हिंदू धर्म विरोधी लोक सोडली तर प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज सुधारक indorikar महाराज ह्यांनी काही चुकीचं वक्तव्य केले नाही असेच सर्व समजतात आणि काही लोकांना केले आहे असा समज असेल तरी थयथयाट करण्या एवढे गंभीर नाही
>>>>>>>>>

राजेशजी, इंदोरीकर महाराजांची अशी वक्तव्ये पहिलीच नाहीत. याआधीपण स्त्रियांवर अनेक वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी केलेली आहेत. एखाद्या कीर्तनकाराला शोभणारी ही वक्तव्ये नाहीत एवढेच.

https://www.youtube.com/watch?v=pK8nM0o7pdU

केवळ निवृत्ती देशमुख हि व्यक्ती काय बोलली हे पाहण्यापेक्षा जरा मोठ्या समस्येकडे बघू. कारण हि व्यक्ती बोलून माफी मागून रिकामी झाली आहे. पण हि वृत्ती काय आहे व किती भयंकर आहे हे पाहणे योग्य होईल.

निसर्गात मादी हीच प्रबळ असते. अनेक स्पेसीजमध्ये नर फक्त समागम करण्यापुरताच असतो. जन्म देण्यापासून ते पिलांची काळजी घेणे, त्यांचे पालनपोषण करणे आणि ती स्वत:चे खाणे स्वत: मिळवत नाहीत तोवर त्यांचे रक्षण करणे हि जबाबदारी निसर्गात माद्यांनीच घेतलेली दिसते. म्हणजेच पुढील पिढी निर्माण करून ती आपल्या पायावर उभी राहत नाही तोवर तिची सर्व जबाबदारी घेण्याचे काम निसर्गात बहुतांश प्राण्यांत मुख्यत्वे मादीच करते. मानवप्राणी सुद्धा याला अपवाद नाही. ह्या आर्टिकल मध्ये बघा:

https://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_sex_ratio

भारत, चीन आणि अरेबिक देश (व अजून एखादा देश असेल) वगळता इतर जगात स्त्रियांचे प्रमाण अधिक किंवा पुरुषांइतकेच आहे.

फक्त पुरुषप्रधान संस्कृती नावाची जी विकृत कीड तयार झाली (धार्मिक व अन्य कारणे आहेत) ती भारत, चीन आणि अरेबिक देशांत जास्त फोफावली आहे. एखादी व्यक्ती केवळ स्त्री/मुलगी आहे म्हणून तिचा दुस्वास करणारे महाभाग या देशांतच आढळून येतात. आपल्याकडे तर पावलोपावली हे महाभाग आढळून येतात. त्यामुळे एखादी व्यक्ती बोलते तेंव्हा तो अवतीभवतीचा समाज, जडणघडण, संस्कृतीच्या गोंडस नावाखाली जे प्रकार चालतात ते प्रश्नांकित न करता योग्य आणि योग्यच आहेत असे मानण्याची वृत्ती या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे एखादी प्रसिद्ध व्यक्ती बोलली तर निषेध, पण आजूबाजूला "मुलीच्या जातीने असे वागणे योग्य आहे का?" "बाईच्या जातीला हे बोलणे शोभते का?" असे उद्गार अगदी सहजगत्या बोलले जातात त्याचे काय? विशेष म्हणजे ब्रेनवॉश इतक्या प्रमाणात झालाय कि संस्कृतीच्या नावाखाली पिढ्यानपिढ्या सुरु असलेली पुरुषांची गुलामगिरी हि योग्यच आहे असे अनेक स्त्रिया/मुलीना सुद्धा वाटत आले आहे.

DkzzuPuW4AErIeC.jpg

परिणाम? या देशांत स्त्री-पुरुष संख्यात्मक गुणोत्तर निसर्गाचा समतोल ढासळेल इतके बिघडले आहे. येमेन व इतर अरेबिक देशांत तर स्त्रियांच्या दुप्पट पुरुष संख्या आहे. हि तोल गेलेली परिस्थिती भयंकर आहे. कालांतराने फक्त पुरुषच शिल्लक राहून अखेर हे पुरुषप्रधान प्राणी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेला धार्मिक पाठबळ असल्याने भारत सुद्धा त्याच वेगाने दिशेने वाटचाल करत आहे.

मला इंदुरीकर महाराजांच्या व्हिडीओजपेक्षा त्याची टिकटॉक व्हर्जन्स जास्त आवडतात!

बाकी चालू दे.... राजकीय आणि धार्मिक कुरघोडी वगैरे!

पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे नक्की काय?
पुरुष प्रधान संस्कृती ला कोणत्या धर्माचे पाठबळ नाही त्या धर्माचे नाव काय?

पाकिस्तान,भारत,बांगलादेश चे पंतप्रधान पद स्त्रियांनी भूषावल आहे पण अमेरिके चे
अध्यक्ष पद स्त्री ला कधीच मिळाले नाही ह्याचे काय कारण असावे..

तुम्ही म्हणता तसे स्त्रिया ची संख्या कमी होवून मानव जात नाहीस होईल ह्या वाक्याची सत्यता किती percent aahe.

Kiti टक्के घरात मुलगी चा जन्म च झाला नाही अशी किती टक्के घर असावीत असे तुम्हाला वाटत.

Pages