यंगीस्तान.com

Submitted by Silent Banker on 8 February, 2020 - 00:08

सध्या सगळीकडे क्रिकेट वर्ल्डकपचे वारे वाहत आहेत। बरेच वर्षानंतर ही स्पर्धा "राउंड रॉबिन " पद्धतीने खेळविली जात असल्यामुळे सर्व सहभागी देशांना एकमेकांशी लढण्याची संधी आहे। मागच्याच आठवड्यामध्ये " भारत Vs पाकिस्तान " या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना रंगला। अपेक्षेप्रमाणे भारताने तो अगदी आरामात जिंकला। " वर्ल्डकप मधील भारताचा सामना " अणि " वर्ल्डकप मधील भारताची पाकिस्तानशी लढत " यातला फरक हा " साड़ी सेल " अणि " पैठणीचे प्रदर्शन " यात जसा असतो तसाच आहे। साड़ी सेल मधून चार पाच साडया घेऊन देखील एखादी सुन्दर पैठणी पदरात पाडुन घेतल्यावर महिला वर्गाला जसा आनंद होतो , तोच आनंद , तोच उत्साह भारतीय क्रीड़ारसिक पकिस्तानवरील विजयानंतर अनुभवत असतो। अर्थातच भारताच्या विजयानंतर सामन्याच्या निकालाचे जे विश्लेषण झाले त्यामध्ये भारतीय खेळाडूंची तयारी( Preparation ) , तंदुरुस्ती ( Fitness ) , आक्रमकता ( Aggression ), मानसिकता ( Temperament) या घटकांचा खूप उहापोह केला गेला। एका अर्थाने हा " हिंदुस्तानचा " नसून " यंगीस्तानचा " विजय आहे असे सर्टिफिकेट पण काही लोकांनी देऊन टाकले।

कुतूहलापोटी ही "यंगीस्तान" नावाची काय भानगड़ आहे हे तपासले तर असे लक्षात आले की सध्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ५०% लोक हे २0 ते ३० वयोगटातले आहेत। आकड्याच्या भाषेत बोलायचे तर सुमारे ६० कोटी लोक या वयोगटातील असून ते "तरुणाई / Millennials / Generation Z " अशा विविध संज्ञांनी ओळखले जातात। ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट( २ times ) आहे ( अमेरिकन लोकसंख्या ३० कोटी ) अणि ग्रेट ब्रिटेनच्या ( आता लिटिल इंग्लंड ?) एकूण लोकसंख्येच्या दसपट ( १० times ) आहे (ग्रेट ब्रिटेन लोकसंख्या ६ कोटी). या तुलनेतून या संकल्पनेची व्यापकता आपल्या नजरेत भरते।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता असल्यानंतर संख्या ( Stats ) & विदा( Data ) शास्त्राच्या नियमानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते। ते करताना त्याला समूहामध्ये( Cohort ) कैद केले जाते। तसे करताना या समूहाकड़े एक तर ग्राहक म्हणून बघितले जाते किंवा मतदार म्हणून अमिष दाखविले जाते। बाजारपेठ अणि निवडणूक प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) मग या यंगीस्तानला आचार -विचार , आवडी -निवडी , आशा -आकांक्षा , खान-पान या सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करतात। यातून बाजारपेठेत आपले उत्पादन योग्य व्यक्तीपर्यंत पोहचविणे व निवडणुकीत आपला विचार आपल्या मतदात्यापर्यंत पोहचविणे कदाचित सोपे जात असेल पण खरोखरच त्यांना समजून घेण्याचा किंवा त्यांच्या भावविश्वात डोकविण्याचा प्रयत्न होतो का , याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच द्यावे लागेल।

आधीच्या पिढ्या अणि यंगीस्तान ( "तरुणाई / Millennials / Generation Z")यांच्यातील प्रमुख फरक हा समर्पकपणे कुसुमाग्रजांच्या " कोलम्बसचे गर्वगीत " या कवितेत वर्णन केला आहे

" कोट्यावधी जगतात जिवाणु जगती अन मरती

जशी ती गवताची पाती

नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली

निर्मितो नवक्षितिजे पुढती। "

जन्माला आलो म्हणून रडत कुंठत जगण्यापेक्षा नवक्षितिज निर्मितीची आस बाळगून सर्व जगात संचार करण्याची स्वप्ने पाहणे अणि ती पूर्ण करण्यासाठी सात नभांखाली धडपडणे हा तो फरक आहे। अशी ही तरुण नाविक मंडळी "Global Citizen" चा झेंडा घेऊन आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत।

साहजिकच जुने लोक संसाधने (Resources) &तंत्रज्ञान (Technology), संधी (Opportunities ) यांची असणारी मुबलक उपलब्धता याकडे हात दाखवून मोकळे होतात। ते काही अंशी खरे असले तरी हे सर्व समोर असताना त्याचा वापर आपण कसा करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। पूर्वी तंत्रज्ञान हे आयुष्य सुखकर करण्यासाठीची कुबड़ी ( Enablers ) होती, आता तो जगण्याचा मंच( Platform ) झाला आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यन्त हा तरुण या तंत्रज्ञानाच्या रंगमंचावर मुक्त संचार करत असतो। सकाळच्या चहा बरोबर "स्ट्रीम " केलेली गाणी असोत , सकाळी ऑफिस ला जाण्यासाठी केलेले "कैब बुकिंग " असो , ऑफिस मध्ये डबा विसरल्यावर "आर्डर केलेली पावभाजी किंवा पराठा असो " , संध्याकाळी घरी पोचल्यावर "आपल्या सवड़ीनुसार पाहिलेल्या "वेब सीरीज "असोत वा "वीकेंड "साठी ऑनलाइन बुक केलेली पिक्चरची तिकीटे असोत ", तंत्रज्ञान रूपी वामनाने सगळे जीवनच पादाक्रांत केले आहे।

नवरे लोक किती सुखावले असतील ते पहा " पूर्वी ताज्या भाज्या आणि नविन साड्या घेण्यासाठी गल्लोगल्ली अणि दारोदारी फिरणारा हा बिचारा (?) इसम आता चक्क बायको बरोबर बसून ऑनलाइन शॉपिंग ची मजा लुटू लागला। " आमच्या याला किंवा यांना या सर्व प्रकारात रसच नाही " या तक्रारीला सरवलेला त्याचा कान आता कौतुकाचे बोल पण झेलू लागला। हे सगळे आता इतके अंगवळणी पडले आहे की दसरा -दिवाळी या सणांप्रमाणे किंबहुना थोड़े जास्तच "ऑनलाइन शॉपिंग चे महोत्सव " आपण एन्जॉय करू लागलो आहे। यालाच यंगीस्तानच्या भाषेत जीवन अनुभव ( Life Experience) म्हणतात।

या सगळ्यामागची भावना "अवघेचि संसार सुखाचा करीन" ही नक्कीच आहे। पण संसाधने (Resources) &तंत्रज्ञान (Technology), संधी (Opportunities ) यांची असणारी मुबलक उपलब्धता, जगण्याची स्पर्धा (Competition) पण तितकीच तीव्र करत आहे. या मध्ये गतिशीलता (Pace of life) ठेवताना होणारी दमछाक प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला विसावा शोधायला भाग पाडते। अशी जागा जिथे मनाचा हळवा कोपरा उलगडता येईल। काळ बदलतो किंवा संदर्भ जुने होतात पण अत्यंत मूलभूत अशी एक भावना कायम राहते ती म्हणजे " मला काहीतरी सांगायचे आहे " किंवा " माझेही कुणीतरी ऐका। " ती ओढ़ मग " Facebook अपडेट " किंवा "Instagram पोस्ट " किंवा " Whatsapp स्टेटस ", "Twits " अश्या रुपात व्यक्त होते। आपले अंगभूत कौशल्य सादर करण्याची संधी किंवा हौस मग " Tiktok Videos " किंवा " Bigo Live Performance" , " Youtube video sharing " या मंचावर मांडली जाते। त्याला मिळणारे अंगठे (Likes) , प्रतिसाद (Comments ) त्या प्रक्रियेला सुंदर बनवितात।

वरील उदाहरणावरून हा शहरी उच्च मध्यमवर्गाच्या स्वप्नांचा लेखाजोखा वाटेल पण जीवनाला भिडण्याची , त्याचा आस्वाद घेण्याची , आयुष्य आपल्या अटींवर जगण्याची , चाकोरी बाहेरील संधी निवडण्याची ओढ़ जितकी तीव्र उच्च मध्यमवर्गाच्या " बेबी/ सोन्या " मध्ये आहे तितकीच ती " ग्रामीण शेतकऱ्याच्या लेकरामध्ये " आहे। व "आदिवासी पाडयामधल्या पिल्लामध्ये" आहे। स्वप्नांची फुटपट्टी वेगळी असेल देखील पण अंतिम भावना समान आहे ती म्हणजे बोरकरांची खालील कविता

"तुला कसे कळत नाही। फुलत्या वेलिस वय नाही।

क्षितिज ज्याचे सरले नाही। त्याला कसलेच भय नाही। "

थोडक्यात चित्त भयमुक्त झाल्या शिवाय रसरशित ,निखळ जीवन जगता येत नाही। या साठीच पूर्वी जसे घरा घरात " अन्न संस्कार " , " भाषासंस्कार " किंवा " आचरणसूचिता " असायचे तसे काहीसे "तंत्रज्ञान संस्कार " असणे ही काळाची गरज आहे। कारण या तंत्रज्ञानाने सर्व जीवन नव्हे तर अत्यंत नाजूक असे भावविश्व पण व्यापले आहे। " जोड़ीदार निवडण्यापासून " ते " लग्न सोहळा " पार पडेपर्यंत सर्व काही आपल्या कवेत ठेवले आहे। "चहा पोहे " अणि " मुलगी पाहणे " हा कार्यक्रम आता मागे पडून " Tinder dating App " किंवा " Coffe विथ जीवनसाथी " वैगरेचा जमाना आलेला आहे। लग्नामध्ये " नवरदेवाकडच्या लोकांच्या मागण्या , शेवटच्या क्षणाचे रूसवे फुगवे , मानापमान नाट्य " आता कमी होऊन " Gift Registry " नावाची भन्नाट कल्पना उदयाला येत आहे। यामध्ये नवरा नवरीने आपल्याला काय आवडते किंवा आपल्याला पुढील आयुष्यात बस्तान बसविण्यासाठी काय लागणार आहे त्याप्रमाणे सरळ सूचि( List ) बनवून समस्त परिवाराला सांगून टाकावे।

अश्या या "दुधारी तलवार " असणाऱ्या तंत्रज्ञाना च्या वापरासाठी संस्कार प्रणाली किंवा सध्याच्या भाषेत SOP ( स्टैण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) असणे क्रमप्राप्त आहे। या तंत्रज्ञानाने आपल्याला मुक्त जगण्याची जाणीव अणि संधी उपलब्ध करुन दिली। कुसुमाग्रजांची "स्वर " नावाची एक कविता आहे

"सर्वात मधुर स्वर

ना मैफिलितल्या गा ण्याचा। ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा।

ना सागराचा। ना कूजनाचा

ना आमंत्रक ओ ठां नीच हसण्याचा।

सर्वात मधुर स्वर। कोठेतरी।

कुणाच्या तरी। मन गटांवरील श्रृंखला

खळाखळा तुटण्याचा। "

ती बंदमुक्तता तंत्रज्ञानाने दिलेली असताना श्रृंखला तुटताना ईजा होणार नाही याची खबरदारी घेणे पण तितकेच महत्वाचे म्हणजे (जीवन )रूपी स्वर खरेच मधूर होईल।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults