whatsapp University मध्ये जगातील कोणत्याही ( अस्तित्वात असलेल्या व नसलेल्या ) रोगावर रामबाण जालीम इलाज क्षणार्धात उपलब्ध होतात.
"चांगली बातमी, वुहानच्या कोरोना विषाणूचे लसूण पाण्याच्या एका वाटीने बरे केले जाऊ शकते. जुन्या चिनी डॉक्टरांनी त्याची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. बर्याच रूग्णांनी हे देखील प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे. आठ चिरलेल्या लसूणच्या पाकळ्यामध्ये सात कप पाणी घाला आणि उकळवा.उकडलेले लसूण खा आणि पाणी पिणे, एका रात्रीत सुधारणा आणि उपचार."
// कृपया पास करा//
हा मेसेज वाचून मला खालील प्रश्न पडले...
1. हा व्हायरस चायना मध्ये आहे व इतरत्र तुरळक एखादा पेशंट आहे. मग ही लसणीची भानगड कुणी कुठं या पेशंट वर टेस्ट केली?
2. करोना व्हायरस उघडकीस येऊन जेमतेम 8/10 दिवस होत आहेत. इतक्या कालावधीत हे लसणीचे पाणी पाजून त्या पेशंट च्या पुन्हा टेस्ट करून करोना रोग नाहीसा झाला हे डॉक्टर नी कधी डिक्लेअर केले?
3. चायना तील सरकार मूर्ख आहे म्हणून 8 दिवसात 10000 बेड चे हॉस्पिटल तातडीने उभारले. त्याऐवजी लसूण पाणी घेऊन 1 वैद्य भारतातून चीन मध्ये नेला असता तर पुरेसा होता.
4. एअर इंडिया चे स्पेशल विमान पाठवून चायना मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याची काहीही गरज मोदी सरकारला नव्हती. त्याऐवजी 10 किलो लसूण पाठवली असती की काम तमाम!
असले मेसेज पाठवणारे कुठे भेटले तर हे प्रश्न त्यांना जरूर विचारा !!!
कुठली नवीन सिरीयल आहे का ????
कुठली नवीन सिरीयल आहे का ???? कोणत्या चॅनेलवर येते.
सर्व चायनीज पदार्थांमध्ये
सर्व चायनीज पदार्थांमध्ये लसणाचा मुबलक वापर होतो. मग मूळात हा विषाणू प्रभावशाली ठरलाच कसा?
चीनच्या वूहान येथील हुंआनान
चीनच्या वूहान येथील हुंआनान मासळी बाजारातून हा आजार पसरला आहे. या बाजाराला आम्ही मासळी बाजार म्हणत असलो तरी इथे हरतर्हेचे प्राणी अन्न म्हणून वाढले जातात. उदाहरणार्थ, लांडग्याची पिल्लं, वटवाघूळ, साप, कोल्हे, मगरी, सलाममेंडर (सरड्यासारखा प्राणी), उंदीर, कोअला, मोर इत्यादी. ही यादी मोठी आहे.
या बाजाराचा आकार हा अरुंद आहे
या बाजाराचा आकार हा अरुंद आहे आणि दुकानं एकमेकांना चिकटून आहेत. दुकानदार सगळ्यांसमोरच प्राण्यांची कत्तल करून अन्न शिजवतात. हे करत असताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. कोरोनाव्हायरस याच निष्काळजीपणामुळे पसरला. सुरुवातीचे रुग्ण हे या भागातील विक्रेते आणि ग्राहक होते. वूहान वरून कोरोनाव्हायरसला वूहान वायरस नाव देण्यात आलं आहे.
कोरोनाव्हायरस हा विषाणूंचा
कोरोनाव्हायरस हा विषाणूंचा मोठा गट असतो. हा आजार Severe Acute Respiratory Syndrome (SARS) या आजाराशी मिळताजुळता असल्याची माहिती मिळते आहे. SARS आणि कोरोनाव्हायरसच्या अनुवंशिक संरचनेत ८०% साम्य आढळून आलं आहे. हा आजार खरं तर प्राण्यांमध्ये आढळणारा आजार आहे, पण काही दुर्मिळ घटनांमध्ये तो माणसांमध्येही पसरू शकतो.
काहीतरी गडबड आहे. 'आठ
काहीतरी गडबड आहे. 'आठ चिरलेल्या लसूणच्या पाकळ्यामध्ये सात कप पाणी घाला आणि उकळवा'
लसूणच्या पाकळ्यामध्ये पाणी कसं घालणार? एक थेंब पण जाणार नाही, सात कप कस घालणार?
मला एक फॉरवर्ड आला होता की
मला एक फॉरवर्ड आला होता की घसा सतत ओला ठेवा आणि येता-जाता नेहमी थोडे थोडे पाणी प्या म्हणजे तुम्हाला करोना व्हायरसचा त्रास होणारच नाही.
मला एक फॉरवर्ड आला होता की
मला एक फॉरवर्ड आला होता की घसा सतत ओला ठेवा आणि येता-जाता नेहमी थोडे थोडे पाणी प्या म्हणजे तुम्हाला करोना व्हायरसचा त्रास होणारच नाही.>>
हा मेसेज सरकारकडून आला होता असे मला वाटते.
यात तर फक्त लसूण आहे.
यात तर फक्त लसूण आहे.
मला काही ग्रुप्स मध्ये , खालील मेसेज येतेय ...
*आरोग्य विभाग माहितीनुसार कोरोना व्हायरस वर उपचार सापडला आहे , 20 लसणाच्या कांड्या / पाकळ्या , 10 कडीपत्याची पाने , 5 चमचे गोमूत्र , 2 चमचे मध , याची पेस्ट करून ग्लास भर पाण्यात उकळून घ्यावी आणि ३ दिवस दिवसातून 4 वेला प्यावे.*
माणसाच्या पापाची फळ ही
माणसाच्या पापाची फळ ही मिळणारच आहेत.
निसर्गा च्या आणि बाकी जीव सृष्टीच्या जीवावर उठलेला माणसाला त्याची किँमत भोगाविच लागणार.
आधुनिक विज्ञान ,रोबोट,कृत्रिम बुद्धिमत्ता काही काही कामाला येणार नाही.
अग्निपंख
अग्निपंख
इति संतश्री राजेश महाराज १८८
माणसाच्या पापाची फळ ही मिळणारच आहेत.
>>इति संतश्री राजेश महाराज १८८ ( १००८)
पूर्वी देवी रोग, पटकी, पोलियो, प्लेग माणसांच्या पापामुळेच येत होते. आता थोडे पापं कमी झाले म्हणून हे रोग येत नाहीत...
अजून 'साजूक तूप' हा घटक औषधात
अजून 'साजूक तूप' हा घटक औषधात आला नाही, ह्याचं आश्र्चर्य वाटतंय. नाहीतर व्हॉट्स ॲप विद्यापीठात कुठल्याही रोगांवर 'घरी कढवलेलं तूप' हा उपाय असतोच.
{{{ 2. करोना व्हायरस उघडकीस
{{{ 2. करोना व्हायरस उघडकीस येऊन जेमतेम 8/10 दिवस होत आहेत. इतक्या कालावधीत हे लसणीचे पाणी पाजून त्या पेशंट च्या पुन्हा टेस्ट करून करोना रोग नाहीसा झाला हे डॉक्टर नी कधी डिक्लेअर केले? }}}
करोना व्हायरस १९६० पासून ज्ञात आहे.
एअर इंडिया चे स्पेशल विमान
एअर इंडिया चे स्पेशल विमान पाठवून चायना मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याची काहीही गरज मोदी सरकारला नव्हती. त्याऐवजी 10 किलो लसूण पाठवली असती की काम तमाम!
<<
माय वं!
पारटी बदलल्ली का काय तुम्ही?
करोना व्हायरस १९६० पासून
करोना व्हायरस १९६० पासून ज्ञात आहे.
<<
करोना व्हायरस हे एका व्हायरस ग्रूपचे नांव आहे. जसे "हरिण" म्हटले, की त्यात अनेक जाती जसे चितळ, सांबर इ. येतात तसे. या व्हायरस "स्ट्रेन"चे नांव 2019 n-CoV असे आहे.
तो जनेरिकली ज्ञात आहे म्हणून तुमच्या लसणाने मरतो असे नव्हे. इन फॅक्ट लसणाने व्हायरस मरतो असे कोणतेही संशोधन उपलब्ध नाही.
इन फॅक्ट SARS नामक आजारही याच करोना व्हायरसमुळे होतो.
डिस्क्लेमर : अर्धवट माहिती दिल्याने गावठीपणाच सिद्ध होतो. गोमूत्राने मूढमती सोडल्यास इतर सर्वकाही बरे होते.
लसूण व्यापाराने फिरवलेला
लसूण व्यापाराने फिरवलेला मेसेज आहे.
पण यंदा मजा नाही...
कोंबड्या स्वस्त झाल्या नाहीत