Submitted by mrsbarve on 30 January, 2020 - 01:27
आत्ता आत्ताच ,
उन्हे उबदारशी होताहेत !
अन फुटलीय पालवी,! त्यात लपलेली चिमणी
चिवचिवतेय अखंड !
आत्ता आत्ताशी उन्हे उबदारशी होताहेत !
कळ्यांनी बहरलेली,अन पालवीने लगडलेली
चमकत्या प्रकाशात ,नाहताहेत झाडे !
आत्ता आत्ताशीच उन्हे उबदारशी होताहेत !
गोल गोल घिरट्या घालत वारा
गवतातून पिंगा घालतोय
रानफुले उमलायला लागलीत आणि
आत्ता आत्ताशीच उन्हे उबदारशी होताहेत!
आता नको पुन्हा ,काळ्या अंधाराचे काटेरी क्षण ...
ओंजळीत पकडूदेत मला उबदार उन्हाचे कण !
आत्ता आत्ताशीच उन्हे उबदारशी होताहेत !
माझे हात अन स्वप्नांचे आकाश
थोडे रंग त्यात
भरीन म्हणताहेत....
आत्ता आत्ताशीच उन्हे उबदारशी होताहेत ....!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा