बोचरे वागणे

Submitted by यतीन on 25 January, 2020 - 03:45

तुझे हे बोचरे वागणे कळत नाही
धुंद ते, का हवा धुंद कळत नाही

निर्मोही बाबांच्या घरी नको ते छंद
धंद ते, का नाद खुळा कळत नाही

कपडे ऊंची, त्यांची ओळख नेत्यांची
धवल ते, का काळे धुके कळत नाही

साखरपेरणी ची केली गोडबतावणी
वाणी ती, का गाऱ्हाणी कळत नाही

अत्तराचा फाया मारू मदमस्त झाले
मस्त ते, का ते मस्तवाल कळत नाही

विचारांना सांगितले आहेत मळभ
मळ ते, का काळे ढग कळत नाही

कार्या करण्या अडकलो फेऱ्यात
फेरा तो, का फरफट कळत नाही

यशापयशच्या पायर्‍या मोजू कशा
तर्काधारितांनी कधीच गणले नाही

© यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults