Submitted by सुप्रिया जाधव. on 23 January, 2020 - 12:56
श्वास संपले खात्यावरचे
मास्क काढले नात्यावरचे
मंगळ काबिज केला आम्ही
दळण सरेना जात्यावरचे
साक्षिदार तर सर्व फिरवले
रक्त निघेना पात्यावरचे
प्राण त्यागुनी निष्ठा जपल्या
कर्ज फिटेना दात्यावरचे
मान ताठच्या ताठ राहिली
बाण संपले भात्यावरचे
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुरेख!
खुप सुरेख!
मंगळ काबिज केला आम्ही
दळण सरेना जात्यावरचे
साक्षिदार तर सर्व फिरवले
रक्त निघेना पात्यावरचे>>>>> मस्तच.
पहिल्या तीन द्विपदी आवडल्या.
पहिल्या तीन द्विपदी आवडल्या.
चौथ्यामध्ये अगदी उलटा अर्थ जाणवतो.
पाचव्या द्विपदी मध्ये 'भात्यावरचे' हा शब्द समजत नाही.
जबरदस्त जमुन आली आहे. छानच !
जबरदस्त जमुन आली आहे.
छानच !
भारीच ! आवडली !
भारीच ! आवडली !
छान!
छान!
व्यक्तिश: मला असा इंग्रजी शब्दांचा वापर खटकतो.
चूभुद्याघ्या
आभार सगळ्यांचे
आभार सगळ्यांचे
आभार सगळ्यांचे
आभार सगळ्यांचे
छान, भारी आहे
छान, भारी आहे