गुड न्यूज चा ट्रेलर बघून एकूण चित्रपट धमाल विनोदी असणार हा अंदाज होताच. थिएटरमध्ये जसं टेस्टी यम्मी जंक फूड मिळतं तसा हा मुव्ही टाईमपास आहे.
दीप्ती (करीना कपूर खान) आणि वरुण (अक्षय कुमार) बत्रा हे श्रीमंत, करियर माइंडेड जोडपं. मूल हवं म्हणून एका आयव्हीएफ क्लिनिकमध्ये जातात. तिथे दुसरं एक जोडपं असतं - दिलजीत (हनी) आणि कियारा (मोनिका) बत्रा. एकाच आडनावाच्या दोन जोडप्यांच्या आयुष्यात स्पर्मची अदलाबदल झाल्यामुळे जो काही गोंधळ होतो त्याला विनोदी ढंगाने दाखवलं आहे.
अक्षय कुमार आणि करीनाने चित्रपटात धुमाकूळ घातला आहे. त्या तुलनेत हनी आणि मोनिका तसे दुय्यमच ठरतात. यशस्वी , लग्नाला 7 वर्ष झालेल्या जोडप्याला मूल नसण्यावरून विचारले जाणारे प्रश्न, त्यांच्यावरचा दबाव आणि त्यातून नात्यावर येणारा ताण हे सर्व चित्रपटात नेमकं दाखवलं आहे आणि ते दाखवताना थोडा तिरकस ,sarcastic सूर पकडल्यामुळे विनोदाची भट्टी जमली आहे. चित्रपटाचा सुरुवातीचा भागच मला सर्वात जास्त आवडला. पंचेस भारी जमले आहेत.
पुढे शेवटाकडे सरकताना कथानक काहीसं awkward होतं. एकीकडे अक्षय कुमारची over acting दुसरीकडे दिलजीतची over acting. आणि शेवटच्या टप्प्यात इमोशनल मोडमध्ये जाऊन चित्रपट त्याच्या लॉजिकल एन्डकडे पोचतो.
ओव्हरऑल एक वेगळ्या विषयावरचा, बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह, आजच्या काळातील समस्या मांडणारा आणि मुख्य म्हणजे हसवणूक करणारा धमाल चित्रपट आहे.
करीना शाईन्स थ्रू द मुव्ही. कॉमेडी असो वा शेवटचे भावनिक क्षण असोत, तिने कमाल काम केलंय. तिचं स्टायलिंग, wardrobe एकूणच लुक आवडला. अक्षय कुमार परफेक्ट विनोदी टायमिंगच्या जोरावर भाव खाऊन जातो. अजूनही कसला फिट आणि देखणा दिसतो. कियारा आडवाणी आणि दिलजीत डोसांझ यांनीही त्यांच्या वाटयाला आलेल्या भूमिका चोख केल्या आहेत. मुख्य चारी कलाकार प्लस आयव्हीएफ डॉक्टर्स या सर्वांची कामं दमदार झाल्यामुळे चित्रपटाची भट्टी जमली आहे.
यात करीना एक मॉडर्न करियर वुमन आहे. तिला उगाच घरात स्वयंपाक करताना, सासरच्यांनी मर्जी सांभाळताना दाखवलेलं नाही. हे मला फार आवडलं. तिला नवरा हवा आहे पण एका मर्यादेपलीकडे ती त्याचं ना काही ऐकून घेते ना ती त्याच्यावर अवलंबून असते. अशी कॅरेक्टर आणखी लिहिली जायला हवीत.
अशा छान जमलेल्या मुव्हीला मध्येच रिग्रेसिव्हपणाचे मूड स्विंग येणं म्हणूनच खूप इरिटेट झालं. आई होण्यात बाईच्या लाईफचे सार्थक, गर्भपात म्हणजे पाप वगैरे ट्रॅकवर मध्येच मुव्ही जाऊ लागतो. मग परत खूप डिरेल व्हायच्या आत सीन बदलतो. पण तरी का? व्हाय- हा प्रश्न पडतोच.
याव्यतिरिक्त एकूणात एका हायली सेन्सिटिव्ह विषयाच्या जास्त खोलात न शिरता वरवरचाच विचार केल्यामुळे चित्रपट उथळही वाटू शकतो.
दिगदर्शक नवीन आहे राज मेहता म्हणून. पहिलाच प्रयत्न उल्लेखनीय आहे. गाणी काही खास लक्षात राहिली नाहीत.
का बघावा- डोकं बाजूला काढुन ठेवून चार घटका धमाल करमणूक, वेगळा विषय, प्रोग्रेसिव्ह मांडणी, करीना-अक्षय.
का टाळावा- वेब सिरीज किंवा मालिका टाईप घराच्या दिवाणखान्यात किंवा क्लिनिकमध्ये चित्रपट घडतो. भव्यदिव्य बाहुबली टाईप काही नाही. लहान मुलांना संवाद ऐकून बरेच प्रश्न पडू शकतात.
3.5 out of 5.
याचा ट्रेलर मागे पाहिलेला.
याचा ट्रेलर मागे पाहिलेला. तो बघून जे वाटलेले तेच आणि तेवढेच तुम्ही चित्रपट बघून लिहिले आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयुष्यात कधी फावला वेळ मिळाला तर नक्की बघेन हा चित्रपट. अक्षय कुमार आवडीचा
ट्रेलरच बोअर झालेला. पिक्चर
ट्रेलरच बोअर झालेला. पिक्चर बघेन असं वाटत नाही.
त्या तुलनेत हनी आणि मोनिका
त्या तुलनेत हनी आणि मोनिका तसे दुय्यमच ठरतात.
>>>>
ट्रेलरमध्ये चांगले वाटलेले
एडीटींग टेबलवर कापले गेले असतील
अक्षयकुमार कॉमेडीत आपल्यापेक्षा कोणाला वरचढ होऊ देत नाही. भागमभागमध्ये गोविंदालाही दुय्यम केले होते.
हनी मोनिका चे झुंबा सॉंग छान
हनी मोनिका चे झुंबा सॉंग छान आहे.
काय घोळ होतो नक्की?
काय घोळ होतो नक्की?
दीप्ती-हनी आणि वरूण-मोनिका अशी बाळं तयार होतात का?
आणि मग लॉजिकल एन्ड काये? जीवशास्त्रीयदृष्ट्या आपले नसलेले पण आपल्या बायकोचे असलेले मुल सांभाळायचं?
चित्रपट बघून आलो. टाईमपास
चित्रपट बघून आलो. टाईमपास म्हणून एकदा बघायला छान आहे. कार सेल्समनचे इतके सुंदर घर बघून आता माझापण तिथेच कार सेल्समनची नोकरी करायचा विचार आहे.
<<< मग लॉजिकल एन्ड काये? >>>
ते कळण्यासाठी चित्रपट बघा.
ट्रेलर पहिला होता काही
ट्रेलर पहिला होता काही दिवसांपूर्वी, खुप लाऊड वाटला. बघण्याचा विचार नाही..
कालच हा चित्रपट बघितला! एका
कालच हा चित्रपट बघितला! एका शब्दात "बकवास!"
बादवे लॉजिकल एन्ड काय झाला, हे कुणी सांगेन का? मला पामराला शेवट काय होतोय हेच समजलं नाही.
आज पाहून आले हा सिनेमा.
आज पाहून आले हा सिनेमा.
ठीक म्हणावा की चांगला काही कळत नाहीय.
ठीक आहे..
खरंतर मी विनोदी असेल म्हणून बघायला गेले होते पण एवढा काही कॉमेडी वाटला नाही.
शेवटचा अर्धा तास जास्त चांगला वाटला.
अक्षय कुमार नेहमीच आवडतो इथेही आवडला.
बाकी कुणी आवडलं नाही.
ती किआरा तिला तर फारसं कामच नाहीय.
पंजाबी गाणी बोर झाली.
काल बघितला. अक्षय अॅट हीज
काल बघितला. अक्षय अॅट हीज बेस्ट ऑल्वेज. दिलजीतचं पण काम आवडलं.
बादवे लॉजिकल एन्ड काय झाला, हे कुणी सांगेन का? मला पामराला शेवट काय होतोय हेच समजलं नाही.>>>>>>>>>>> ते आपापल्या बाळांसोबत खुश. शेवटाला एक वाक्य आलं खाली "स्पर्म कोणाचे का असेना, एकदा माणूस बाप झाला की सगळं काही बदलतं या अर्थाचं"
समजून घ्यायच<
चित्रपटात रामाचे नाव घेत एक
चित्रपटात रामाचे नाव घेत एक अश्लील विनोद आहे अशी न्यूज वाचली. एकीकडे अक्षयची देशभक्त ईमेज आणि एकीकडे असे देवतांच्या नावाने विनोद म्हणत अक्षय ट्रोल होत होता. कदाचित पब्लिकसिटी स्टण्ट असावा. पण शितावरून भाताची परीक्षा. असे कंबरेखाली विनोद मारावे लागले की चित्रपटाची ओवरऑल विनोदाची पातळी काय असते हे समजून येते. ती न्यूज वाचून माझा तर पास या पिक्चरला.
पहायचा आहे. परीक्षाण आवडले.
पहायचा आहे. परीक्षाण आवडले.
________
पण लॉजिकल एंड काय हा अॅमीना पडलेलपेप्रश्न मलाही विचारायचा आहे.
असे कंबरेखाली विनोद मारावे
असे कंबरेखाली विनोद मारावे लागले की चित्रपटाची ओवरऑल विनोदाची पातळी काय असते हे समजून येते. >>>
चित्रपटाला U/A रेटिंग आहे. त्यामुळे तो जर विनोदी असेल तर तिथे अश्लीलतेकडे झुकणारे विनोद असू शकतात.
कालच पाहिला. सनव, चांगले
कालच पाहिला. सनव, चांगले लिहिले आहे. मलाही तसेच वाटले. टाईमपास आहे. वेळ जात नसेल तर एकदा टीव्हीवरही पहायला हरकत नाही. अक्षयकुमार इज अक्षयकुमार... काय देखणा दिसतो हा माणुस! फक्त भसाभसा सिगारेट ओढताना दाखवलाय. आशा आहे ती खोट सिगारेट होती.
अॅमी, दीप्ती-हनी आणि वरूण-मोनिका अशी बाळं तयार होतात का? >>>
गोड वाक्य आहे
. उत्तर हो.
दुसरा प्रश्न >> असे झाल्यावर जे व्हायला हवे तेच होते सिनेमात.
'राम' जोक मला तर कळला नाही. पण नंतर सिनेमात वेगवान हालचाली होतात , गडबड गोंधळ होतात म्हणुन लक्षातही राहिला नाही. तेव्हा ते सोडुन द्यायला हरकत नाही.
>>>
>>>
चित्रपटाला U/A रेटिंग आहे. त्यामुळे तो जर विनोदी असेल तर तिथे अश्लीलतेकडे झुकणारे विनोद असू शकतात.
>>>>
यूह आर नॉट गेटींग माय पॉईण्ट !
मला ईथे अश्लीलतेशी प्रॉब्लेम नाही.
मला विनोदाच्या दर्जाबद्दल प्रॉब्लेम आहे.. एखादा टुकार विनोद जर अश्लील असेल तर तेवढ्यासाठीच म्हणून खालच्या दर्जाची अभिरुची असलेले प्रेक्षक खिदळायला सुरुवात होते. विनोद रचणारे यालाच यश समजत मग् अश्या विनोदाचा भडीमार करतात. मुळात असले डबल मिनींग. शब्द खेळ करत केलेले अश्लील विनोद रचायला फार विनोदबुद्धी लागत नाही.
अर्थात सगळेच अश्लील विनोद टुकारच असतात असेही नाही. पण ज्या विनोदावरून वाद झाला आहे तो मला तरी याच पठडीतला वाटला.
अक्षय कुमारला टॉलरेट करु शकत
अक्षय कुमारला टॉलरेट करु शकत नसल्याने पास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कै च्या कै वाटतोय एकंदर. बरं झालं परीक्षण आलं नाहीतर पाहीलाही असता
आणि मग $१५ उडवण्याचा पश्चात्ताप केला असता.
शिवाय भयानक आहे विषय. सिरीयसली हे असं घडलं तर काय भयानक होइल
रामावरचे फालतू जोक कसले
रामावरचे फालतू जोक कसले मारता त्या ऐवजी जिजझ किंवा अल्ला यांचे मारुन दाखवा की. तिथे **** दम नाही. असो!!!
वा!वा!! चान वळणाला लागेल हा
वा!वा!! छान वळणाला लागेल हा धागा आता.
खालच्या दर्जाची अभिरुची असलेले प्रेक्षक खिदळायला सुरुवात होते>>>>> हे कोण असतात रे भाऊ?
वा!वा!! छान वळणाला लागेल हा
वा!वा!! छान वळणाला लागेल हा धागा आता.>> अगदी अगदी. मी ऐकला तो जोक ट्रेलर मध्येच होता. जरा व्ह ल्गर आहे नो डाउट पण धार्मिक भावना दुखावण्याजोगा नाही आहे. हे मा वै म. व तो अक्षय कुमार खुद्द ह्याने क्रॅक केलेला आहे. म्हणजे अप्रुव्ड असावा.
ही स्पर्म एक्स्चेंज संकल्पना मेन एका स्पॅनिश सिरीअल मधून घेतली आहे. त्याचे भारतीयीकरण केले आहे. मी प्राइम वर आला की बघे न.
कलेक्षन चांगले कमवले आहे सिनेमाने. दबंग ३ पुढे सुद्धा.
सुनिधी
सुनिधी
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गोड लिहायचा विचार नव्हता खरंतर. मला हे जाणून घ्यायचं होतं की बीजांड तरी याच बायकांचं असतं की त्या अजून वेगळ्याच दोन बायका असतात. म्हणजे त्या तयार झालेल्या बाळांना तीन वेगवेगळे जैविक पालक असणार :-O अरे बापरे!
खरंतर अशा सिनारिओमधे काय करायचं याचे लॉजिकल पर्याय तसे बरेच आहेत
१. सनवने लेखातच लिहलंय तसं गर्भपात करायचा. या क्लिनिकला स्यू करायचं. दुसऱ्या क्लिनिकमधे जायचं.
२. क्लिनिकला स्यू करण्याएवजी दोन्ही बाळं सांभाळा तुम्हीच म्हणून देऊन टाकायची.
३. करिना-अक्षय अतीश्रीमंत कपल असतील तर त्यांनी दोन्ही बाळं सांभाळायची. आणि किएरा-दिलजीतला वेगळं त्यांचंत्यांचं बाळ क्लिनिकने फुकटात करून द्यायचं.
४. ग्रुप मॅरेज करून चौघांनी मिळून दोन्ही बाळं सांभाळायची.
५. अजूनकाही सुचतंय का कोणाला...
सनवने लेखातच लिहलंय तसं
सनवने लेखातच लिहलंय तसं गर्भपात करायचा. या क्लिनिकला स्यू करायचं. दुसऱ्या क्लिनिकमधे जायचं.>> आयव्ही एफ मध्ये आधीच सक्सेस रेट खूपच कमी असतो. व मूल गर्भ धारणा हा अतिशय संवेदनशील व भावनांशी निगडित विषय असल्याने एकदा गर्भ रुजल्यावर गर्भ पात करणे अश्या केसेस मध्ये जरा अवघ ड वाट्ते. हे रेगुलर शॉपिन्ग सारखे नाही. पटले नाहीतर दुसर्या दुकानी गेले.
मुले स्वतंत्र व्यक्तिमत्वेच असतात त्याना सक्षम पालकत्व द्यावे व व्यक्तिमत्व आहे त्यानुसार फुलू द्यावे हे बेस्ट. मूल हेल्दी असले तर बेस्टच.
मला पडलेला प्रश्न,आई वडील
मला पडलेला प्रश्न,आई वडील होणे महत्वाचे की मुल कुणाचे हा प्रश्न महत्वाचा, मातृत्व पितृत्व मिळावं म्हणून जर ट्रिटमेंट घ्यावी लागत असेल आणि सक्सेस रेट जर कमी असेल तर अशावेळेस गुड न्युज चा आनंदच घेतला जाईल.
अॅमी, सिनेमात या सर्व
अॅमी, सिनेमात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे
व अजुन एक मुद्दा जो तुमच्या मुद्द्यात आला नाही तो निर्णय घेतला गेलेला दाखवलाय जो योग्य आहे. हो, आया त्याच असतात. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>वा!वा!! छान वळणाला लागेल
>>>वा!वा!! छान वळणाला लागेल हा धागा आता.>>>> हे फियर माँगरिंग होते. तसे काहीही झाले नाही हे एक बरेच झाले. मलाही नसता वाद वाढविण्यात रस नव्हता. पण एक नी-जर्क रिअॅक्शन (प्रतिक्षिप्त क्रिया) म्हणुन तो प्रतिसाद दिला गेला होता.
जरा व्ह ल्गर आहे नो डाउट पण
जरा व्ह ल्गर आहे नो डाउट पण धार्मिक भावना दुखावण्याजोगा नाही आहे.
>>>
मी देवधर्मच मानत नाही. त्यामुळे त्या विनोदाने भावना दुखवण्याचा सुखावण्याचा प्रश्नच येत नाही. पण एक विनोद म्हणून तो फारच शक्ती कपूर दर्जाचा होता.
खालच्या दर्जाची अभिरुची
खालच्या दर्जाची अभिरुची असलेले प्रेक्षक खिदळायला सुरुवात होते>>>>> हे कोण असतात रे भाऊ?
>>>>
क्या कूल है हम, ग्राण्डमस्ती वगैरे चित्रप्ट आवडीने बघणारे...
तो अक्षय कुमार खुद्द ह्याने
तो अक्षय कुमार खुद्द ह्याने क्रॅक केलेला आहे. म्हणजे अप्रुव्ड असावा.
>>>>
अक्षय कुमार माझाही आवडीचा आहे पण् तो एक व्यावसायिक कलाकार आहे आणि त्याची जी ईमेज आहे ती जाणीवपूर्वक व्याव्सायिक दृष्टीकोन ठेऊन बनवलेली आहे.
कदाचित आपल्यालाही याची कल्पना असावी आणि वरचे वाक्य सर्कास्टीकली असावे असेही असू शकते.
>>>वा!वा!! छान वळणाला लागेल
>>>वा!वा!! छान वळणाला लागेल हा धागा आता.>>> अक्षयचे सिनेमे कितीही चालले तरी तो शाहरूख नाही. त्याच्या चित्रपटाचा धागा चालायला हा तडका गरजेचाच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
> मला पडलेला प्रश्न,आई वडील
> मला पडलेला प्रश्न,आई वडील होणे महत्वाचे की मुल कुणाचे हा प्रश्न महत्वाचा, > जर मुल कुणाचे हा प्रश्न त्या दोन्ही जोड्यांसाठी महत्वाचा नसता तर त्यांनी दत्तक पर्यायचा विचार केला असता.
Ivf साठी गेले आहेत म्हणजेच त्यांना जैविकदृष्टया स्वतःचं मुल हवं आहे, शक्यतो स्पाऊससोबत, शक्य नसेल तर इतर कोणातरीसोबत (मोनोगमी न मोडता).
===
जर विकीडोनर सारखी केस असती (बायको सर्व ठीक, नवऱ्याच्या स्पर्ममधे प्रॉब्लेम. स्पर्मडोनर वापरला, जो अज्ञात आहे आणि अज्ञातच रहाणार आहे) तर "जीवशास्त्रीयदृष्ट्या आपले नसलेले पण आपल्या बायकोचे असलेले मुल सांभाळायचं" हे ठीक आहे. जाणीवपूर्वक केलेली निवड.
इथे नवर्याचे स्पर्म ठीक आहेत and there is a living child, just around the corner somewhere... तरीही त्याने आपले मुल दुसऱ्याला सांभाळायला द्यायचे आणि दुसर्याचे मुल आपलेच मानायचे' हे नॉर्मल माणसाला इम्पलीमेन्ट करणे जमेल असे वाटत नाही. फार अवघड आहे.
क्या कूल है हम, ग्राण्डमस्ती>
क्या कूल है हम, ग्राण्डमस्ती>>>>>>>बास बास कळलंच मला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages