Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 December, 2019 - 12:46
मनाच्या भ्रमरा
**********
मनाच्या भुंग्याला
फार भुणभुण
थांबते सुमन
पाहूनिया
.
मनाचा हा भुंगा
करे वणवण
मधाचे सेवन
करण्याला
.
मनाचा भुंगा रे
बहु मिरवतो
सुखाला कष्टतो
रात्रंदिन
.
मनाचा भुंगा न
जुमाने कुंजर
मद गंडस्थळ
चाखायला
.
मनाचा भुंगा
मरे कमळात
थोर आसक्तीत
दबूनिया
.
मनाच्या भ्रमरा
जाय दत्त पदी
काय तू ते अंती
कळण्यास
.
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कवितेतल्या काही उपमा खुपच
कवितेतल्या काही उपमा खुपच सुंदर दिल्या आहेत.. आवडली कविता..
मन्या ऽ खुप धन्यवाद
मन्या ऽ खुप धन्यवाद
क्या बात है !!
क्या बात है !!
शशांक धन्यवाद
शशांक धन्यवाद