स्वामींना केलेली एक छोटीशी प्रार्थना
स्वतःचे असे पसाभर (ज्ञान)
दुसऱ्याचे असे मूठभर
तरी नसे मान्य त्यासी
काय म्हणावे या वृत्ती
स्वामीराया
आदिमाया आदिशक्ती
हसतसे कैलासी
पाहूनी मानवाची मति
असे सर्व मायेची महती
स्वामीराया
कैसी प्रपंच्याची प्रगती
कैसा प्रपंच्याचा नाश
केवळ असे मायापाष
त्याचे कैसे सुख- दु:ख
स्वामीराया
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
लोकांना करुनी त्रस्त
स्वतःचे ज्ञान पाजळती
त्यांची काय गती होय
स्वामीराया
जैसे राजहंसाच्या वंशी
क्षीर तितुके प्राशुनी
उदक सांडूनिया देती
आम्हा तैसेची वागवी
स्वामीराया
आध्यात्म असे गूढ,प्रगाढ
त्याची कशी मोजावी गति
आम्ही केवळ अल्पमती
हे केवळ तुमच्याच हाती
स्वामीराया
शेवटी एकची प्रार्थना आता
पहावे लेकराकडे स्वामीनाथा
हे सकल जग पालन हारा
चरण प्रसाद मज द्यावा आता
स्वामीराया
(मागील धाग्यावर काही लोकांनी घाण केल्यामुळे ही प्रार्थना इथे हलवली आहे )