एक काळ होता - जेव्हा सुंदर स्त्रीला "विधुमुखी" म्हटले जायचे, तो काळ उलटला. कविंच्या हृदयाला प्रेयसी ही "माहताब", "शशीमुखी" वाटायची. तिचे प्रेमात तेजाळणे या वेड्या कविंना नभोदीपाची, चंद्राची आठवण करुन द्यायचे. चंद्रावर कलंक आहे डाग आहे जो तुझ्या मुखावर नाही असे काव्य रचले जायचे.
.
तो काळ होता जेव्हा चंद्र हा लहान मुलांचा "मामा" होता.
"चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !" गाणे प्रत्येक मराठी लहान मुलाने एके काळी ऐकलेले-गायलेले असायचे.
.
मग एकदा माणूसच चंद्रावरती उतरला, आणि सगळ्या जगाला कळले, अरे चंद्र काही तेजस्वी नभोदीपच नाही तर रखरखीत, खडकाळ भूभाग असलेला ग्रह आहे. Too much unnecessary information? निदान कविंकरता तरी होय.
.
एक काळ होता जेव्हा भावभावना या मनुष्याला कोड्यात टाकत असत. Pleasantly intrigue करत असत. आनंद-दु:ख-व्याकुळता-शोक-आर्तता-कडवटपणा-रुसवा किती किती रंगांच्या मोहक इंद्रधनु छटांच्या भावना, unending intrigue करत असत. या भावनांच्या आवेगात कवि, लेखक उत्तमोत्तम रचना लिहून टाकत. वाल्मिकींनी म्हणे क्रौंच पक्ष्यांच्या जोडीचा वियोग पाहीला आणि त्या दु:खातून, रामायणासारखा महाग्रंथ निर्माण झाला. रामचंद्र-सीतेच्या कहाणीत त्यांना या क्रौंच वियोगाचे साधर्म्य आढळले.
.
मग शोध लागला, अरे या सर्व भावभावना प्रेमाचा उन्माद खोल खोल गर्तेमध्ये घेउन जाणारा प्रेमभंग, या सर्वाचे विच्छेदन करता येते. या electrochemical घटना आहेत. अगदी गोळ्या-औषधांनी काबूत रहाणार्या.
.
परत Too much unnecessary information? निदान कविं-लेखकांकरता तरी होय. सायन्स ला "फुलपाखराचे पंख" डिसेक्ट करण्याचा हा परवाना कोणी दिला? एक थंड, व्यावहारीक, शास्त्रिय चिरफाड. मोजून मापून,रुक्ष तर्काने काढलेले निष्कर्ष. आम्ही कविमनाच्या लोकांनी ही परवनगी कधीच दिली नव्हती. हा अन्याय आहे. रांगड्या, रगेल, रुक्ष, माजोरी सायन्सने हळूवार, कोमल, अलवार काव्यवृत्तीवर केलेला अन्याय . आम्ही याचा निषेध करतो.
अन्याय
Submitted by सामो on 12 December, 2019 - 15:52
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे लेखन ऑफेन्सिव्ह आहे,
..
https://www.huffpost.com
..
हे लेखन ऑफेन्सिव्ह आहे,
हे लेखन ऑफेन्सिव्ह आहे, विशेषतः शेवटचा परिच्छेद. विनोदी मध्ये टाकले असते तर ठीक होतं...>>>
Agreed. Except the vinodi part. Yat kahihi vinodi nahi
विनोदी मध्ये असतं तर
..
मला ऑफेन्सिव्ह वाटत नाही.
ऑन अ सेकंड थॉट, बलात्कार हा शब्द विखारी आहे हे सत्य आहे. मी तो बदलून, अन्याय हा अधिक समर्पक शब्द घातला आहे. इन फॅक्ट बरोबर, अन्यायच म्हणा यचे आहे. बलात्कार म्हणायचे नाहीये.
बलात्कार हा शब्द या ठिकाणी
सायन्सला किंवा सत्यशोधकांना म्हणू द्या काहीही.
त्याने कवीमनाला किंवा रसिकाला काय फरक पडतो?
लहानमुलांसोबत खेळताना आपण नाही का परत त्यांच्याच विश्वात रमत, रुक्ष सत्य आपल्याला कळले असतानाही.
होय मानव, बरोबर ऑफेन्सिव्ह
होय मानव, बरोबर ऑफेन्सिव्ह आहे तो शब्द. मी बदलला आहे. सीमंतिनी व 'आपले ते हे' व मानव सर्वांचे आभार.
अॅडमिनला सांगणे शक्य आहे पण
धन्यवाद..
सीमंतिनी आपला सल्ला योग्यच
सीमंतिनी आपला सल्ला योग्यच होता. बलात्कार नव्हते म्हणायचे मला. अन्यायच म्हणायचे होते.