त्याग भाग ९

Submitted by Swamini Chougule on 7 December, 2019 - 13:23

रात्री अन्विका व रुकसार नेहमी प्रमाणे तयार झाल्या .अम्मा व तिचे दलाल त्यांच्या कामात मग्न होते .आज काय होणार आहे या गोष्टी पासून ते अनभिज्ञ होते .ठरल्या प्रमाणे अनिकेत व जवळ -जवळ शंभर पोलीसांचा साध्या वेषातील फौजफाटा घेऊन ,कोणाला संशय येऊ नये म्हणून ग्राहक बनून रात्री आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजे पर्यंत दाखल झाला होता . ते पूर्ण एरिआ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरले होते . अनिकेत ठरल्या प्रमाणे अम्माच्या कोठ्यावर अन्विकाकडे गेला . रात्री दिड वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी छापा मारला व सगळ्या मुलींना व ग्राहकांना ताब्यात घेतले . कोठ्यावर एकच गोंधळ उडाला . कोणालाच कोणाचा ताळमेळ लागत नव्हता . अम्मा व तिचे पंटर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले .

ठरल्या प्रमाणे अनिकेत त्या गोंधळात अन्विका म्हणजेच बुरखा घातलेल्या मुलीला घेऊन तेथून सटकला .

तो बस स्टॉपवर पोहचला. अनिकेत अन्विकाला म्हणाला ( बुरखा घातलेल्या मुलीला )

अनिकेत , “ अन्विका बुरका काढ आता आपन सुरक्षित आहोत ! “

असं म्हणून तो स्टॉप वरील बाकावर बसला . बुरखा घातलेल्या मुलीने बुरखा काढला तेंव्हा अनिकेत चक्रावला क्षण भर , स्तब्ध झाला . थोड्या वेळातच तो सावरला .

अनिकेत , “ तू कोण आहेस ? आणि माझी अन्विका कुठे आहे ?”

अस म्हणून त्याने रागाने त्या मुलीला ढकलले व तो पुन्हा त्या एरियात जाण्यासाठी निघला.बुरखा घातलेली मुलगी खाली पडली होती.ती उठली व तिने अनिकेतला पुढे जाऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण अनिकेत काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता . ती मुलगी ओरडली ., “ थांब अनिकेत ,आता तिथे जाऊन काही उपयोग नाही अन्विका केव्हाच तिथून निघून गेली आहे.”(ती बुरखाधारी मुलगी म्हणजे रुकसार होती अन्विकाची मैत्रिण )

अनिकेत ,“ काय ? कुठे गेली मग ती ?जिच्यासाठी मी एवढे सगळे केले; ती मला सोडून गेली! कुठे आणि का ? (अनिकेत खाली बसला त्याच्या डोळ्यांतून अश्रु वाहत होते)

रुकसार, “ अनिकेत शांत हो,तुझ्या प्रश्नांची उत्तरं या चिठ्ठीत आहेत अन्विकाचे ही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे पण तिची मजबुरी आहे .तुझ्या सारख्या प्रेम करणाऱ्या मुलाला सोडून गेली या मागे नक्कीच मोठं कारण आहे “ अस म्हणून तिने अनिकेतच्या हातात चिठ्ठी दिली.

अनिकेतने चिठ्ठी उघडली व तो वाचू लागला .

प्रिय अनिकेत ,

मला माहिती आहे जेव्हा तुला ही चिठ्ठी मिळेल तेंव्हा तुला माझा खूप राग आला असणार ,पण मला समजून घे ;मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही .मी तुझ्या पासून खूप दूर जातेय कारण मला तुझे आयुष्य उध्वस्त करायचे नाही .मी तुझ्या योग्यतेची नाही राहिले.

आता तर तुझ्या पासून लांब राहणेच तुझ्या हिताचे आहे .तरी तू मला विसरून नवीन आयुष्य सुरू कर.

तुझीच,

अन्विका

अनिकेत हे सगळं वाचून चक्रावला कारण त्याला काहीच स्पष्ट कळत नव्हते. रुकसारने अनिकेतला धीर दिला . ती जायला निघाली .तेव्हढ्यात अनिकेत उठला व त्याने रुकसारचा हात धरला व तिला ओढत स्टँडच्या मागे घेऊन गेला तिथे वर्दळ कमी होती .स्टँडच्या मागचा भाग झाडीने भरलेला होता . अनिकेत रुकसारला ओढतच झाडीत घेऊन गेला .अचानक केलेल्या या कृती मूळे रुकसार गांगरून गेली .ती काही न बोलता अनिकेतच्या पुढ्यात उभी होती अनिकेत आता बोलता झाला.

अनिकेत , “ रुकसार अन्विका कुठे गेली ?तुला माहिती असणार ती कुठे आहे ते; याची मला खात्री आहे ,सांग ती कुठे आहे ?( अनिकेत कठोर आवाजात रुकसारला विचार होता)

रुकसार ,“ अनिकेत अन्विकाला विसर ती तुला आता कधीच भेटणार नाही आणि तिला विसरण्यातच तुझे भले आहे. ”

अनिकेत , “ मी तुला शेवटचं विचारतोय रुकसार ,” अनिकेतच्या डोळ्यात आग दिसत होती .

रुकसार ,“ अनिकेत शांत हो प्लीज आणि अन्विकाला विसर हीच तिची इच्छा आहे.”

अनिकेतने त्याने संरक्षणासाठी घेतलेला चाकू खिशातून काढला व तो स्वतः च्याच नरड्याला लावला व बोलू लागला .

अनिकेत , “ रुकसार तू जर अन्विका कुठे आहे मला नाही सांगीतलेस तर मी स्वतः ला संपवेन असं ही अन्विका मा‍झ्या आयुष्यात नसेल तर मी जागून काय करू ?”

अनिकेत आता खूपच आक्रमक झाला होता .जर रुकसारने नाही सांगितले की अन्विका कुठे आहे तर तो खरंच स्वतः चे काही बरे वाईट करून घेऊ शकत होता.

रुकसार मात्र अनिकेतला अस पाहून खूपच घाबरली व त्याला अन्विका कुठे आहे हे सांगायला तयार झाली .

रुकसार ,” थांब अनिकेत ,तू हे काय करतोस आवर स्वतः ला तो चाकू आधी काढ; मी सांगते अन्विका कुठे आहे ते!” आणि ती बोलू लागली “ ती रेल्वे स्टेशनवर गेली आहे तिथून ती पुण्याला जाणार आहे कारण तिला असं वाटतंय की तिला एच .आय .व्ही झालाय ती तुझे आयुष्य बरबाद करू इच्छित नाही. मा‍झ्या व तिच्या जवळ चोरून ठेवलेले पैसे ती घेऊन गेली आहे.”

अनिकेत ,“काय ती रेल्वे स्टेशनवर आहे?”

असं म्हणून तो चाकू टाकून पळत सुटला त्याच्या मागे रुकसार होतीच . तो रोडवरती आला व रिक्षा थांबली त्याच्या मागोमाग रुकसार ही रिक्षात बसली .

क्रमशः

( अनिकेत अन्विकाला शोधू शकेल का? का त्याची व अन्विकाची परत ताटातूट होईल .अन्विकाला खरंच एच .आय .व्ही झाला असेल का हा तिचा भ्रम आहे ?)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users