माझा एक मित्र आहे जे सध्या नोकरीच्या शोधात आहे. या मित्राचे शिक्षण कलेच्या क्षेत्रात झालेले आहे. त्यांनी आर्ट स्कूल मधून पदवी घेतलेली असून काही वर्ष चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट साठी चे मार्गदर्शन क्लासेस चालवले. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेत कला शिक्षक म्हणून काम केले. म्हणजे शिकवण्याचा अनुभव आहे.
गेले काही वर्ष त्यांनी स्वतः चा इंटेरियर डिझाईन चा व्यवसाय सुरू केला होता.
सध्या काही दिवसांपासून त्या क्षेत्रात जास्त काम नसल्याने त्यांना तो व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. या कारणास्तव ते आता नोकरीच्या शोधत आहेत, आणि त्यांना त्यांच्या शिक्षण आणि अनुभवाशी संबंधित नोकरी हवी आहे. कृपया या क्षेत्रात काही संधी असतील तर सुचवा किंवा नोकरी संबंधी मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम. बाहेरील देशातही काही संधी मिळू शकतात का?
दुबई, सौदी अरेबिया, कतार या देशांमध्ये सध्या जॉब मार्केट कसे आहे आणि नोकरी साठी प्रयत्न कराचा झाल्यास काय करायला लागेल. या प्रोसेस साठी साधारण किती खर्च अपेक्षित आहे. मुंबई पुणे या शहरात जर काही कॉन्सुलटन्ट असतील तर त्याची माहिती दिल्यास उत्तम