त्याग भाग ६
अनिकेतची नजर भिरभिरत होती . आता त्याने प्रत्येक घरात जावून पाहायचं ठरवलं व तो एका बिल्डिंग मध्ये गेला.तिथे उभ्या असलेल्या एका दलालाने अनिकेतला अडवले व त्याला गिऱ्हाईक समजून वरच्या मजल्यावर घेवून गेला तिथे एक वयाची पन्नाशी पार केलेली बाई बसली होती .तिने त्याचे हसून स्वागत केले. त्याला बळे-बळे स्वतः जवळ बसवून घेतले .
“ बोलो साहब कैसा माल चाहीए ,पुराना या नया ? हमारे पास दोनों हैं। बतावो बतावो शर्मावो मत ।
अनिकेतला काय बोलावे ते सुचेना .तो शांतच होता . मग ती बाईच म्हणाली
“ ठीक हैं साहब मैं माल दिखती हु ।आप पसंद करलो फिर किमत बताउंगी; ठीक हैं।
अनिकेतने मानेनेच होकार दिला . ती बाई जोरात ओरडली
“ अरे मुनीर , लडकीयो को बुलाओ बाहर कस्टमर आया हैं।“
मुनीर , “ठीक हैं अम्मा”
आणि एका रूम मधून पटा -पट मुली बाहेर येऊ लागल्या . भडक मेकअप आणि विचित्र कपडे घातलेल्या . अनिकेत त्या मुलींन मध्ये अन्विकाला शोधत होता . पाहता – पाहता त्याच्या समोर दहा -बारा मुली येऊन उभ्या राहिल्या.आता अनिकेत त्यांना निहाळू लागला . त्या मुलींना पैकी काही त्याला इशारे करत होत्या . त्यात त्याला एक मुलगी खाली मान घालून उभारलेली दिसली .तो तिला निहाळू लागला . अनिकेतचा तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ती अन्विकाच होती .अगदी भडक मेकअप आणि जिथे -तिथे अंग दिसेल अशी मुद्दाम नेसलेली साडी ,त्यावर अगदीच तोकडा स्लीवलेस ब्लाउज व साडीचा पदर घेऊन देखील न घेतल्या सारखा .अनिकेत तिला न्याहळत होता पण अन्विकाचे त्याच्या कडे लक्ष नव्हते .ती खाली मान घालून उभारली होती .
अम्मी , “ साहब सिर्फ आँखे सेखने आए हो , या कुछ करने भी आए हो ।” असे म्हणून ती मोठयाने हसली .तिच्या बोलण्याने अनिकेत भानावर आला. त्याने अन्विकाकडे बोट केले व तो बोलला
“ मुझे ये लड़की चाहिए”
अन्विकाच्या कानांवर हे शब्द पडले .ओळखीचा आवाज ऐकून ती वर पाहू लागली . तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . तो अनिकेत होता . अन्विकाने इकडे -तिकडे पाहिले आणि ती भानावर आली .तिने स्वतः ला सावरले आणि अनिकेत अनोळखी असल्या सारखे पाहून पुन्हा खाली मान घातली . अम्माने अनिकेत कडे हसत -हसत पाहिले व त्याला म्हणाली , “ साहब आपकी पसंद तो जबरदस्त है ।इस अँनी को आज कल बहोत से मर्द पसंद करते
हैं । लेकीने इसका रेट आपकी जेब ......”
अनिकेतने तिला हाताने थांबवले आणि म्हणाला , ” जिताने चाहीए उतने रुपये दूँगा पर आज ये ही लड़की चाहिए ।”
अम्मा ,” ठिक है , ये अँनी साहब को खुश कर दे और हा कोई शिकायत नही आनी चाहिए। जाओ साहब आज की रात ये
आपकी ; ज्या अँनी रूम में साहब के साथ बैठ ”
अन्विकाने नुसती होकारार्थी मान हलवली आणि अनिकेतला घेऊन ती एका रूम मध्ये गेली . तिने दार लावले . आता रूम मध्ये अन्विका आणि अनिकेत दोघेच होते . अनिकेत फक्त अन्विकाकडे पाहतच होता.
अन्विका अनिकेतकडे रागाने पाहत बोलू लागली , “ अनिकेत तू इथे का आलास ? तुला इथला पत्ता कसा मिळाला ? जर इथे या लोकांना कळलं की तू आणि मी एकमेकांना ओळखतो तर ते तुला जीवे मारतील ,खूप खतरनाक लोक आहेत हे ” एका श्वासात ती हे सगळं बोलली व रडू लागली .
अनिकेतने तिचे डोळे पुसले व तिला मिठी मारली . अन्विका ही त्याच्या मिठीत सगळं विसरून विसावली व रडू लागली .दहा मिनिटे अशीच गेली . मग अनिकेत बोलू लागला
अनिकेत , “ अन्विका काय हा तुझा अवतार आणि गेल्या सात – आठ महिन्यां पासून आम्ही तुला शोधतोय; तू आज
सापडलीस आणि ती ही या एरियात आणि अशा अवस्थेत ! तू इथे कशी पोहचलीस ? सेमिनारला निघाली होती
ना ? “
अन्विकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती सांगू लागली,
“ मी सेमिनारसाठी नाशिकला जायला निघाले स्टँड वर पोहोचले आणि नाशिकला जाणाऱ्या बस मध्ये बसले माझी सीट रिजर्व होतीच ,तिकीट वरचा नंबर पाहून मी माझ्या सीट नंबर वर बसले .बस मध्ये बरेचसे प्रवासी होते . माझ्या शेजारी एक पन्नास वर्षांच्या बाईचं सीट रिजर्व झाल होत .ती येऊन माझ्या शेजारी बसली . मला मनात जरा बरं वाटलं होतं .कारण तिच्या बरोबर प्रवास मला सुरक्षित वाटत होता . थोड्या वेळाने बस निघाली आणि माझा प्रवास सुरु झाला पण एका वेगळ्याच दिशेने. ती बाई माझ्याशी बोलू लागली .थोड्याच वेळात आमची चांगली मैत्री झाली . आम्ही सकाळी अकरा वाजता बस मध्ये बसलो होतो आणि आता दोन वाजले होते . दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती . मला ही आईने डबा दिला होता .त्या बाईनें सुद्धा डबा आणला होता . जेवणासाठी बस एका धाब्यावर थांबली. आम्ही प्रवासी जेवणासाठी धाब्यावर उतरलो . मी एका खाटवजा बाजल्यावर जाऊन बसले आणि माझा डबा उघडला .ती बाई माझ्या जवळ येऊन बसली . तिने ही तिचा डबा उघडून जेवायला सुरुवात केली .आम्ही गप्पा मारत मस्त जेवलो . त्या बाईने जेवल्यानंतर गोड म्हणून लाडू आणले होते. ती मला लाडू खाण्याचा आग्रह करू लागली . मी तिला संकोचून नको -नको म्हणत असताना ही तिने मला एक लाडू दिला ; मी तो लाडू खाल्ला आणि दोनच मिनिटात मला चक्कर येऊ लागली .मला जागेवरून उठता येईना .आणि मी बेशुद्ध झाले .त्या नंतर काय झाले ते मला माहित नाही पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी अम्माच्या कोठ्यावर होते. मला एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं होतं .मी रडत होते ,ओरडत होते ,मला घरी जाऊ द्या पण इथे कोणीच माझे ऐकणार नव्हते .मी रडत असताना अम्मा आली आणि तिने मला सांगीतले की त्या बाईने मला पाच लाख रूपयांसाठी अम्माला विकल. त्या बाईचा तो व्यवसायच होता .तरुण मुलींना गळ घालून येथे आणून विकते .हे सगळे ऐकून माझ्या पाया खालची जमीनच सरकली .मी एका अनोळखी बाईवर विश्वास ठेवून माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली होती .पण आता या सगळ्यांचा विचार करून उपयोग नव्हता .”
पुढे अन्विका बरोबर काय झालं? अनिकेत तिला या दलदलीतून बाहेर काढू शकेल का?
(तुम्हांला या लिखाणात काही आक्षेपार्ह आढळल्यास जरूर सांगा )
त्याग भाग ७
अन्विका तिच्या बरोबर कोठ्यावर नंतर काय- काय घडले ते पुढे अनिकेतला सांगू लागली;.
अन्विका, “ अम्माने मला पहिल्यांदा गोडीत देह विक्रेय करण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न केला पण मी तिला दाद लागू दिली नाही.नंतर मला तिची मानसे मार- झोड करू लागली . पण मी तयार होत नव्हते . तेंव्हा मला आठ – आठ दिवस उपाशी ठेवू लागले तरी मी देह विक्रीसाठी तयार होईना .त्यातून ही मी दोनदा पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अपयशी झाले .अम्माच्या माणसांनी मला पकडले .
जस -जसे दिवस जाऊ लागले तस -तसे हे लोक मला जास्तच छळू लागले . मला रात्र -रात्र पाण्याखाली बांधून ठेवत जेणे करून मी झोपू नये आणि मानसिक दृष्ट्या खचून जावे . मला सिगारेटचे चटके ही देत . तरी मी तयार होत नाही म्हणल्यावर अम्माने तिच्या एका माणसाला माझ्या बरोबर जबरदस्ती करायला सांगीतले . मी ही माणूसच आहे ना शेवटी या सगळ्या त्रासाला कंटाळून मी तयार झाले माझा देह आणि शील दोन्ही विकायला .
हे बघ अनिकेत तू आल्या पावली परत जा आणि मला विसर ; आता मी तुझ्या लायकीची नाही राहिले.”
अनिकेत , “ काय बोलतेस हे अन्विका तू ? हेच ओळखलेस मला? मी तुझ्या शरीरावर नाही तर मनावर ,आत्म्यावर प्रेम केलय. मला या गोष्टींचा काही फरक पडत नाही अग तुझे आई- बाबा ,भाऊ तुझी वाट पाहतायत .ते तुझ्या काळजीने रोज झुरतातं आणि तू मला निघून जा म्हणतेस ? ते शक्य नाही . मी तुला घेऊनच जाणार इथून ” (अनिकेत ठाम निर्धाराने म्हणाला )
अन्विका ,” हे पहा अनिकेत मला इथून घेऊन जाणं सोपं नाही . आणि अस ही मला घेऊन जाऊन काही उपयोग नाही . मी पूर्णपणे बरबाद झाले आहे. आई – बाबांना अन्विका मेली म्हणून सांग . तू ओळखत असलेली अन्विका केंव्हाच मेली ; तू पहातोस ती अँनी आहे .जी रोज एका नवीन पुरुषा बरोबर संग करते .जी फक्त जिवंत प्रेत आहे . जिला इथे येणाऱ्या वासनांध पुरुषांनी भावना शून्य केलय . जिच्या शरीरात प्राण आहे पण आत्मा केंव्हाच मेलाय. ”हे सर्व बोलून अन्विका रडू लागली.
अनिकेत ,” या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही .अन्विका तू माझ्यासाठी आज ही तीच अन्विका आहे.जी पहिली होती . पवित्र सोज्वळ आणि निर्मळ .मी तुला येथून या आठ दिवसांत घेऊन जाणार पहाच तू” असे बोलून अनिकेत दार उघडून रूमच्या बाहेर पडला .त्याने अम्माला तिने पैसे मागायच्या आधीच पन्नास हजार तिच्या हातावर ठेवले आणि निघाला.
अम्मा ,” क्या साहेब इतनी पसंद आयी .हमारी अँनी आपको फिर आना आप “ ती त्याला हसत म्हणाली .
अनिकेत ,” ठिक हैं “ एवढंच म्हणून निघला.
अम्मा , “ अँनी क्या बात हैं ! तुने तो आज ग्राहक को बहुत खुश किया ऐसे ही धंदा करती रेहना; जा अभी सो जा आज तेरे लिए एक ही ग्राहक काफी हैं ।
अनिकेतने त्या एरिआची पूर्ण टेहळणी आणि निरीक्षण केले होते . त्याने त्या एरिआचा नकाशा तयार केला आणि पोलिसांना सगळी माहिती पुरवली .त्याला आता अन्विकाला त्या नरकात राहू द्यायचे नव्हते .पण पोलिसांना व त्याला प्लॅन करून अन्विकाला सोडवण्यासाठी आठ दिवस लागणार होते .कारण तो रेड लाईट एरिआ होता . आणि ते लोक अन्विकाला जिवे मारण्याची शक्यता नाकारता येत नव्हती . म्हणून अनिकेत व पोलीस काळजी पूर्वक प्लॅन बनवत होते.
इकडे अन्विका अनिकेत येऊन गेल्या पासून बेचैन होती तरी तिला देहविक्रीय करण्याचं काम करावचं लागत होते. तिला आता खात्री वाटत होती की अनिकेत तिला या नरकातून घेऊन जाईल .
अन्विकाच्या बरोबर तिथे बऱ्याच मुली होत्या. ज्या तिच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या . त्या सगळ्या सम दुःखी होत्या . अन्विकाकडे बरेच पुरुष नियमित येत असत. त्यात एक विचित्र माणूस होता .त्याच नाव महेश ,त्याच वय चाळीस च्या आसपास होत. तो अन्विकाकडे आठवड्यातून किमान एक वेळा येत असे . तो अन्विकाशी एक शब्द ही बोलत नसे ; बस तिच्या बरोबर संभोग करून न बोलताच निघून जात असे . महेशच्या अशा विचित्र वागण्याने तो अन्विकाच्या चांगलाच लक्षात होता . पण गेल्या एक -दोन महिन्यांत तो तिच्याकडे आला नव्हता . याच अन्विकाला आश्चर्य वाटत होतं .
महेश बरोबर त्याचा एक मित्र तिची मैत्रिण रुकसारकडे येत असे म्हणून तिने रुकसारला महेश बद्दल त्याच्या मित्राकडे विचारायला सांगितले होते . महेशचा मित्र ही दोन आठवड्या पासून रुकसारकडे आला नव्हता पण तो आज रुकसारकडे आलेला अन्विकाने पाहीले .आता तिला महेश बद्दल नक्कीच कळणार होते . या विचारात ती असताना तिला अनिकेत पायऱ्या चढताना दिसला . अन्विकाला माहिती होत की तो तिलाच भेटायला आलाय . तो अम्माला भेटून अन्विकाच्या रूमकडे वळला . अन्विका रूमच्या दारातच होती . त्याला पाहून ती रूमच्या आत गेली .अनिकेत तिच्या रूम मध्ये गेला आणि त्याने दार लावले . अन्विका त्याला रागातच म्हणाली , “ तू का आलास पुन्हा इथे ? तुला कस समजावू तेच कळत नाही ”
अन्विका त्याच्यावर रागवत होती पण मनोमन ती सुखावली होती की कदाचित अनिकेत आपल्याला या दलदलीतून बाहेर काढेल .
https://www.swamini85.tk/2019
https://www.swamini85.tk/2019/12/blog-post_5.html