बटाट्याचं भरीत

Submitted by वावे on 3 December, 2019 - 22:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उकडलेले बटाटे - २
कांदा- १
दही- अर्धी ते एक वाटी
ओलं खोबरं- अर्धी ते एक वाटी
हिरवी मिरची - १ किंवा २ ( तिखटपणा हवा असेल त्याप्रमाणे)
कोथिंबीर - अर्धी वाटी
मीठ २ चिमूट

IMG-20191204-WA0003.jpg

बटाटे उकडण्याचा आणि नारळ खोवण्याचा वेळ धरलेला नाही Happy

क्रमवार पाककृती: 

योकुनी लाल भोपळ्याच्या भरितात बटाटा घातलेला बघितल्यावर मला हे बटाट्याचं भरीत आठवलं Happy मला खूप आवडतं पण कितीतरी दिवसांत केलंच नव्हतं. रविवारी केलं आणि फोटोही काढून ठेवले. करायला एकदम सोपं आहे आणि उकडलेले बटाटे असतील तर पटकन होतं.
कृती अशी काही फारशी नाहीच.

मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. कांदा थोडा जाडसर चिरायचा. उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घ्यायचे. त्यात कांदा, मिरची घालून कालवायचं. मीठ, दही, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून चमच्याने मिसळायचं की झालं. हे असंच छान लागतं. वरून फोडणी वगैरे घालायची नाही. पोळीसोबत झकास लागतं.

IMG-20191204-WA0004.jpg

वाढणी/प्रमाण: 
भरितासारखं खाल्लं तर चौघांना पुरेल, भाजीसारखं खाल्लं तर दोघांना
अधिक टिपा: 

दही नसेल/ आवडत नसेल तर घातलं नाही तरी चालेल. खोबरं मात्र हवं.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय. छान लागेल. दही हवेच.
बटाट्याची सर्वात उत्तम रेस्पी म्हणजे तुप लावून बटाटा निखाऱ्यावर भाजने व मिठ मिरपुड लावून खाणे. भारी लागतो.

मस्त दिसतय भरीत.

माझं पण फार आवडतं , मस्तच लागत. दही पाहिजेच आणि ते ही भरपूर आणि चांगल्या क्वालिटीचे.

बटाट्याची सर्वात उत्तम रेस्पी म्हणजे तुप लावून बटाटा निखाऱ्यावर भाजने व मिठ मिरपुड लावून खाणे. भारी लागतो.>>

अगदी माझा लहानपणीचा आवडीचा खाऊ. अजुनीही आवडीने खातो! Happy फक्त मिरपूड ऐवजी लाल तिखट लावायचे.

सुटसुटीत रेसिपी...
मला जमेल अशी...ट्राय करायला हवी...
तसा भाजका बटाटा नुसतं लाल तिखट, मीठ घालून आवडायचा.

मस्त आहे.

उपासाचं करते मी. हे माहीती नव्हतं.

सगळ्यांंना धन्यवाद. बटाटा भाजून करून बघितलं पाहिजे एकदा. आयडिया छान आहे. जास्त खमंग होईल. वांगं भाजतो तसा गॅसवर थेट भाजायचा ना? जास्त वेळ लागेल का वांग्यापेक्षा?

MI KANDA NAHI GHATLA.. KANDA KHUP MAHAG ZHALAY NA. THODA HINGA GHATLA.. PAN MAST ZHALE HOTE..

कांद्या ऐवजी लसूण, बटाट्याऐवजी रताळे, हिरव्या मिरची ऐवजी ढब्बू मिरची, मिठा ऐवजी साखर वगैरे घालून बघा... नवीन पाककृती होतील.. Happy