उकडलेले बटाटे - २
कांदा- १
दही- अर्धी ते एक वाटी
ओलं खोबरं- अर्धी ते एक वाटी
हिरवी मिरची - १ किंवा २ ( तिखटपणा हवा असेल त्याप्रमाणे)
कोथिंबीर - अर्धी वाटी
मीठ २ चिमूट
बटाटे उकडण्याचा आणि नारळ खोवण्याचा वेळ धरलेला नाही
योकुनी लाल भोपळ्याच्या भरितात बटाटा घातलेला बघितल्यावर मला हे बटाट्याचं भरीत आठवलं मला खूप आवडतं पण कितीतरी दिवसांत केलंच नव्हतं. रविवारी केलं आणि फोटोही काढून ठेवले. करायला एकदम सोपं आहे आणि उकडलेले बटाटे असतील तर पटकन होतं.
कृती अशी काही फारशी नाहीच.
मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. कांदा थोडा जाडसर चिरायचा. उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घ्यायचे. त्यात कांदा, मिरची घालून कालवायचं. मीठ, दही, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून चमच्याने मिसळायचं की झालं. हे असंच छान लागतं. वरून फोडणी वगैरे घालायची नाही. पोळीसोबत झकास लागतं.
दही नसेल/ आवडत नसेल तर घातलं नाही तरी चालेल. खोबरं मात्र हवं.
मस्त दिसतेय. छान लागेल. दही
मस्त दिसतेय. छान लागेल. दही हवेच.
बटाट्याची सर्वात उत्तम रेस्पी म्हणजे तुप लावून बटाटा निखाऱ्यावर भाजने व मिठ मिरपुड लावून खाणे. भारी लागतो.
आम्ही उपासाला बिन-कांद्याचे
आम्ही उपासाला बिन-कांद्याचे करतो, मस्त लागतं. छान दिसतंय तुम्ही केलेलं भरीत!
मस्त दिसतय भरीत.
मस्त दिसतय भरीत.
माझं पण फार आवडतं , मस्तच लागत. दही पाहिजेच आणि ते ही भरपूर आणि चांगल्या क्वालिटीचे.
छान
छान
बटाट्याची सर्वात उत्तम रेस्पी
बटाट्याची सर्वात उत्तम रेस्पी म्हणजे तुप लावून बटाटा निखाऱ्यावर भाजने व मिठ मिरपुड लावून खाणे. भारी लागतो.>>
अगदी माझा लहानपणीचा आवडीचा खाऊ. अजुनीही आवडीने खातो! फक्त मिरपूड ऐवजी लाल तिखट लावायचे.
ओले खोबरे वगळता आमच्याकडे
.ओले खोबरे वगळता आमच्याकडे अशीच करतात.फक्त चिमटीभर साखर घालतो.
सुटसुटीत रेसिपी...
सुटसुटीत रेसिपी...
मला जमेल अशी...ट्राय करायला हवी...
तसा भाजका बटाटा नुसतं लाल तिखट, मीठ घालून आवडायचा.
मस्तय पाकृ
मस्तय पाकृ
अरे वा ! मस्त सोप्पी पाकृ !
अरे वा ! मस्त सोप्पी पाकृ ! चक्क आज माझ्याकडे उकडलेले बटाटे पण आहेत
सगळ्यांना धन्यवाद! अंजली,
सगळ्यांना धन्यवाद! अंजली, लगेच करून टाक भरीत आणि सांग कसं झालं ते
यम्मी.
यम्मी.
मस्त आहे.
मस्त आहे.
उपासाचं करते मी. हे माहीती नव्हतं.
उकडलेल्या बटाट्यापेक्षा
उकडलेल्या बटाट्यापेक्षा भाजलेल्या बटाट्याचं छान लागेल असं वाटतंय.
मस्त
मस्त
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
सगळ्यांंना धन्यवाद. बटाटा
सगळ्यांंना धन्यवाद. बटाटा भाजून करून बघितलं पाहिजे एकदा. आयडिया छान आहे. जास्त खमंग होईल. वांगं भाजतो तसा गॅसवर थेट भाजायचा ना? जास्त वेळ लागेल का वांग्यापेक्षा?
Foil wrap and bake?
Foil wrap and bake?
Slice and grill?
MI KANDA NAHI GHATLA.. KANDA
MI KANDA NAHI GHATLA.. KANDA KHUP MAHAG ZHALAY NA. THODA HINGA GHATLA.. PAN MAST ZHALE HOTE..
कांद्या ऐवजी लसूण,
कांद्या ऐवजी लसूण, बटाट्याऐवजी रताळे, हिरव्या मिरची ऐवजी ढब्बू मिरची, मिठा ऐवजी साखर वगैरे घालून बघा... नवीन पाककृती होतील..
हे लहानपणापासून खातोय भरीत
हे लहानपणापासून खातोय भरीत .दही नसलेले.
मस्त रेसीपी.
वरील रेसीपीनुसार केले. मस्त
वरील रेसीपीनुसार केले. मस्त लागले. परत परत करेन