मी डिसेंबर १९८९ साली ओखा येथे नौदलाच्या आय एन एस द्वारका या स्थावर तळ (BASE) वर डॉक्टर म्हणून एक महिन्यासाठी तात्पुरता गेलो होता. त्यावेळी ओख्याला रेल्वे व नौदल सोडून काहीच नव्हते.नौदलाच्या मेस मध्ये राहत होतो. तेथे पाणी पूर्ण खारट होते.(मचूळ नव्हे अलिबाग नागाव रेवदंडा इथे मिळते तसे मचूळ नव्हे ). चहा किंवा कॉफी सुद्धा खारट होत असे. पहिले १० दिवस मी शीत पेयांवर काढली.(नमकीन चहा हा तिबेट किंवा लडाख मध्ये मिळतो ज्यात याकचे लोणी घालतात). अजून मी चहा कॉफी शिवाय दिवस काढू शकतो पण प्यायचे पाणी खारट म्हणजे फारच त्रासदायक.असो.
तेथे माझा दवाखाना परेड मैदानाच्या बाजूलाच होता.दुसर्या दिवशी दुपारी जेंव्हा मी दुपारी जेवणानंतर दवाखान्याच्या बाहेर आलो तेंव्हा एक सैनिक रायफल डोक्यावर धरून परेड करताना दिसला. थोड्यावेळाने ते दोघे विश्रांतीसाठी माझ्या दवाखान्याच्या सावलीत आले. त्याच्यावर देखरेख करणाऱ्या दुसर्या सैनिकाला मी विचारले कि हे केंव्हा पासून चालू आहे. तो म्हणाला साहेब याला ७ दिवस झाले.मी त्या दुसर्या सैनिकास विचारले कि याला का शिक्षा झाली आहे?.तेंव्हा तो म्हणाला कि साहेब हा "विनासुट्टी गैरहजर" राहिला.( absent without leave). शिक्षा झालेल्या सैनिकाचे नाव पहिले तर चव्हाण (किंवा मालुसरे, मला नीट आठवत नाही )दिसले. मी त्या दुसर्या सैनिकास जायला सांगितले आणि चव्हाण बरोबर बोलण्यास सुरवात केली.
एक गोष्ट मला खटकली होती कि ४०-४५ वयाचा सैनिक सुट्टी न घेत गैरहजर राहतो. हि गोष्ट साधी सोपी नाही. मी नौदलात मानसोपचार तज्ञा बरोबर काम केले असल्यामुळे अशा गोष्टींचा पाठपुरावा करण्याची मला सवय आहे.
चव्हाण यांना मी विचारले कि एवढी नोकरी झाल्यावर आपण असे का केले?त्यावर चव्हाण यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी सांगितले कि ते या वर्षाची उरलेली १ महीना सुट्टी घेऊन सांगली जवळ गावाला गेले होते. शेवटच्या पंधरा दिवसात त्यांची १७ वर्षाची मुलगी कावीळीने आजारी पडली. शेवटी तिला मिरजच्या सरकारी (वानलेस)रुग्णालयात दाखल केले.दुर्दैवाने सुटीच्या शेवटच्या दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे असलेले रिझर्वेशन सोडून देण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. या गडबडीत आपल्या युनिटला कळवायला ते विसरले.
१४ दिवस झाल्यानंतर(दहावा तेरावा दिवस आटपल्यानंतर) ते ओख्याला आपल्या युनिट मध्ये रुजू झाले.त्या वेळेपर्यंत त्यांच्या युनिटने वाट पाहून त्यांच्या रेकॉर्ड ऑफिस ला आणि आर्मी हेंड क्वार्टर्स ला "सिग्नल ने" कळविले होते. त्या काळात मोबाईल नव्हते. म्हणून परत आल्यावर त्यांचे कोर्ट मार्शल झाले आणि त्यांना ४८ दिवस DQ (detention in quarters) स्थानबद्धते ची शिक्षा झाली.चव्हाण यांनी सांगितले कि त्यांना पुढे नोकरीची गरज आहे. त्यांना एक १४ वर्षांचा मुलगा आहे त्याच्या व पत्नीच्या पालन पोषणासाठी हि नोकरी त्यांना आवश्यक होते.तेंव्हा जी काही शिक्षा मिळेल ती विनातक्रार भोगून ते नोकरी करणार होते.
मी चव्हाण यांना जाण्यास सांगितले.आणि त्यांच्या कंपनी कमांडर (एक्झिक्युटिव ऑफिसर EXO ) शी बोललो.EXO कमांडर दास हे अत्यंत सज्जन गृहस्थ होते.ते म्हणाले डॉक्टर सर्वत्र सिग्नल पाठवल्यामुळे आम्हाला चव्हाण यांच्यावर कारवाई करणे भागच होते. त्यांची परिस्थिती कितीही सत्य आणि कटू असली तरी प्राप्त परिस्थितीत मला सर्वात कमीत कमी देत येण्यासारखी शिक्षा मी त्यांना दिली आहे.त्यांना ४८ दिवस स्थानबद्धता आहे आणि रोज २ तास सक्त मजुरी.एवढी शिक्षा दिल्यावर त्यांची नोकरी चालू राहील आणि नोकरीत खंड सुद्धा पडणार नाही.हे १४ दिवस सुद्धा त्यांच्या पुढील वर्षाच्या रजेतून कापून जातील आणि त्याचा पूर्ण पगार सुद्धा त्यांना मिळेल.या पेक्षा कमी शिक्षा देणे अशक्य आहे.मी कमांडर दास यांना विचारले कि सक्त मजुरी हि फक्त "रायफल ड्रिलच" आहे का?
ते म्हणाले," असे जरूर नाही". यावर मी त्यांना विचारले "मी जर चव्हाणांना दुसरे काम दिले तर चालेल का?"
डॉक्टर असण्याचा हा "गैरफायदा" घेणे होते हे माहित असून मी हे प्रश्न मुद्दाम विचारला होता.
त्यांनी सांगितले डॉक्टर चव्हाण यांच्याकडून काम करून घेणे ही "जबाबदारी" मी तुमच्यावर सोपवितो. आणि माझा एक सैनिक त्यावर सुपर व्हिजन करतो, त्याला पण मी काढून घेतो.
दुसर्या दिवशी चव्हाण परत परेड मैदानावर आले असताना मी त्यांना म्हणालो कि मी कमांडर दास यांची परवानगी घेतली आहे आणि तुमचे रायफल ड्रिल माफ झाले आहे.त्या ऐवजी तुम्ही रोज २ तास दवाखान्यासमोर बागकाम करायचे आहे.मी तुमच्यावर लक्ष ठेवणार नाही. तुमच्या मुलीच्या आठवणीसाठी तुम्हाला जमेल तशी तुम्ही इथे बाग तयार करा.
पुढचही२५-३० दिवस त्यांनी कोणताही आळशी पण न करता काम करून एक फार सुंदर अशी बाग दवाखान्याच्या दर्शनी भागात तयार केली.
त्यानंतर मी ओखा सोडून परत मुंबईला आलो.
आज ती बाग आहे कि नाही हे मला माहित नाही, पण एका बापाचे दुख समजून घेऊन एका "अनुत्पादक कामा"चा विधायक कार्यात काही उपयोग करु शकलो असे वाटते.
( (इतरत्र प्रकाशित)
खुप छान वेगळा अनुभव वाचून बरं
खुप छान वेगळा अनुभव वाचून बरं वाटलं. असेच आणखीही अनुभव वाचायला आवडेल. >>> + १२३
लष्करात सर्वच नियमात चालत असे
लष्करात सर्वच नियमात चालत असे काही नाही.
ज्या सक्षम अधिकाऱ्याने त्याची शिक्षा ठरवण्याचा अधिकार डॉक्टर ना दिला .
ह्याचा अर्थ सरळ आहे तो सक्षम अधिकारी स्वतः प्रसंगाचे खर खोटं ठरवून शिक्षा माफ करणे किंवा सौम्य शिक्षा देणे,शिक्षेचा काळ कमी करणे .
हे सर्व अधिकार राखून होता.
पण जोपर्यंत डॉक्टर साहेबांनी ते त्यांच्या निदर्शनास आणले नाही तो पर्यंत त्या अधिकाऱ्याला आपण चुकीच्या व्यक्तीला शिक्षा केली आहे ह्याची जाणीव नव्हती
आणि त्यांनी तसदी पण घेतली नाही.
A I प्राप्त रोबोट सारखं काम केले हेच स्पष्ट होतंय .
नियमात न बसणाऱ्या गोष्टी bindast चालू असतात
जेवणाचा दर्जा ( कोणताच सक्षम अधिकारी गंभीर पने तपासात नाही)
हे प्रती निधिक उदाहरण आहे
<<<खूप हृदयस्पर्शी घटना...
<<<खूप हृदयस्पर्शी घटना...
डाॅ. तुमची सह्रदयता भावून गेली मनाला...>>>>+999
त्या अधिकाऱ्याला आपण चुकीच्या
त्या अधिकाऱ्याला आपण चुकीच्या व्यक्तीला शिक्षा केली आहे ह्याची जाणीव नव्हती
लेख नीट वाचा. त्यात आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत.
कमांडर दास यांनी स्पष्ट पणे म्हटले आहे कि प्राप्त परिस्थितीत कमीत कमी जी शिक्षा आहे तीच दिली आहे.
नियमात न बसणाऱ्या गोष्टी bindast चालू असतात
रायफल ड्रिल हे कोणत्याही नियमात लिहिलेले नाही. RIGOUROUS IMPRISONMENT (सक्त मजुरी) याचा आपण अर्थ कसा लावायचा हे सक्षम अधिकाऱ्याच्या तारतम्यावर सोडलेले आहे.
जेवणाचा दर्जा ( कोणताच सक्षम अधिकारी गंभीर पने तपासात नाही)
हा निष्कर्ष आपण कसा काढला आहे?
छान... शिक्षा नेहमी त्रासदायक
छान... शिक्षा नेहमी त्रासदायक च असावी हा विचार बदललात.... अर्थात गुन्हा व सर्व परिस्थिती पडताळून....
मी काही फोर्स मध्ये नोकरी
मी काही फोर्स मध्ये नोकरी केली नाही .
पण शाळेत एकत्र शिकलेले बरेच मित्र .
नीम लष्करी दल,लष्कर,नाविक दल मध्ये होते.
.
त्या सर्वांचा बोलण्यातून अस दिसले जेवणच दर्जा आपण जसा समजतो तसा नसतो.
रोटी झाडली तर पीठ पडत .
म्हणजे कच्ची असते आणि तेल वापरलं जातं नाही.
खरं तर जी शिक्षा केली होती ती
खरं तर जी शिक्षा केली होती ती योग्यच होती. म्हणजे मानसिक स्थिती वैगरे वाईट असेल त्यांची ती मान्य आहे पण त्या शिक्षेचा उपयोग प्रत्यक्षात लढताना झाला असता. पण यांनी त्यांना माळ्याचं काम दिलं वर आपण कसे अनुत्पादक काम वैगरे करून घेतले त्याचे गोडवे गताहेत. आणि वाचक पण मस्त केलंत बरं केलंत लिहिताहेत.
कोणत्याही सार्वजनिक
कोणत्याही सार्वजनिक अन्नछ्त्रात अन्नाचा दर्जा हा आपल्या घरच्या सारखा नसतो.
ज्यांनी हॉस्टेल मध्ये शिक्षण घेतलेले आहे त्यांना याची कल्पना असेलच.
एका रेजिमेंट मध्ये १२०० पर्यंत सैनिक असतात. हे सर्व १८ ते ३५ वयोगटातील धट्टेकट्टे तरुण असतात. एवढ्या लोकांना रोज किती फुलके लागत असतील अशी आपली कल्पना आहे? साधारण माणशी ५-६ फुलके लागतात हे गृहीत धरले तर ६ ते सात हजार फुलके एका वेळेस लागतात.
एवढ्या फुलक्यांना तेल लावणे शक्य आहे का? आणि तेल लावले तर ते चिकटतात.
शिवाय दुपारच्या जेवणासाठी हे फुलके सकाळी साडे आठला नाश्ता झाल्यावर करायला सुरुवात करतात. साजूक तूप लावलेल्या गरमा गरम फुलक्यांसारखा त्याचा दर्जा कसा राहील?
शिवाय अतिउंचीवर हवेचा दाब अतिशय कमी असतो त्यामुळे तेथे पाणी लवकर उकळते यामुळे फुलके फुगले कि ते काढावे लागतात अन्यथा त्याला काळे डाग पटकन पडतात. यामुळे फुलके शिजले कि लगेच काढले जातात.
देशाच्या सुदूर सीमाभागात पिठाच्या चक्क्या नसतात त्यामुळे लष्कराला नेहमी गव्हाचे पीठच (आटा) पुरवला जातो. हा आटा आपल्याला मिळतो तसा ताज्या सिहोर गव्हाचा दळलेला मिळत नाही. तो (गोडाउन) वखारीतून ट्रकने पुरवला जातो. तोवर तो ३-६ महिने जुना झालेला असतो.त्याच्या होणाऱ्या पोळ्या/ फुलक्यांची तुलना तुमच्या आईने केलेल्या मऊसूत पोळ्यांशी कशी होणार?
बहुसंख्य सैनिक हे गावाखेड्यातून आलेले असतात (आणि सुटीवर परत जातात तेंव्हा सुद्धा) जेथे त्यांना स्वतःच्या/ शेजारच्या शेतातील स्वतःच्या आईने केलेल्या ताज्या गव्हाच्या पोळ्या खायची सवय असते.
त्यातून लष्कराला पुरवल्या जाणाऱ्या गोष्टी या निविदा काढून एल १ (lowest quotation) (सर्वात स्वस्त जो पुरवेल) त्याच्याकडून घेतल्या जातात. यामुळे त्याचच दर्जा घरच्या आईने आपल्या मुलासाठी केलेल्या ताज्या गरमागरम सिहोर किंवा लोक १ या गव्हासारखा कसा येईल?
बाकी सैनिकांबरोबर लष्करी अधिकारी सुद्धा त्याच पोळ्या खात असतात (उपलब्ध असलेल्या शिध्याच्याच) त्यामुळे अधिकारी जेवणाच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत हा दावा चुकीचा आहे.
सरकार लष्कराला अजून अत्याधूनिक बंदुका पुरवू शकलं नाही तेथे साजूक तूप लावलेले गरम फुलके कुठून मिळतील?
छान... शिक्षा नेहमी त्रासदायक
छान... शिक्षा नेहमी त्रासदायक च असावी हा विचार बदललात.... अर्थात गुन्हा व सर्व परिस्थिती पडताळून....>>+१
छान लेख. अनुभव इथे शेअर
छान लेख. अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
स्वाती२ + १ >>> मामी, म्हणजे आता स्वाती३ झालं की
मामी, म्हणजे आता स्वाती३ झालं
मामी, म्हणजे आता स्वाती३ झालं की >>> हायला! हो की.
शिक्षा नेहमी त्रासदायक च
शिक्षा नेहमी त्रासदायक च असावी हा विचार बदललात
शिक्षेचा मूळ हेतू हा आहे कि असा गुन्हा दुसर्याने करण्याची हिम्मत करू नये.
आणि
गुन्हा करणाऱ्या माणसाला आपली चूक झाली आहे आपण ती परत करू नये यासाठी त्याची आठवण व्हावी असे कठीण कृत्य करावे लावावे.
जाणूनबुजून गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी आणि अनवधानाने किंवा चुकून गुन्हा झाला तर कमीत कमी शिक्षा द्यावी असे कायद्याचे मार्गदर्शक तत्व आहे.
जर गुन्हेगाराची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर न्यायालये पहिल्याच गुन्ह्यासाठी बऱ्याच वेळेस सक्त मजुरी ऐवजी समाजसेवा करण्याची शिक्षा देतात.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/hc-tells-youths-at-odds-...
https://www.thehindu.com/news/national/kerala/ragging-accused-told-to-jo...
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/clean-up-beach-prove-you...
मी केलं ते काही मोठं सत्कृत्य होतं असं नाही.
गुन्हा आहे हे माहिती असूनही अगतिक स्थिती झालेल्या सैनिकाला केवळ "परंपरा" आहे म्हणून एकाच तर्हेची शिक्षा द्यायची हे पटत नव्हते.सक्त मजुरी म्हणजे रायफल ड्रिल असे लष्करी कायद्यात कोठेही लिहिलेले नाही.
शिवाय त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अजून एका सैनिकाचे मनुष्य तास फुकट घालवायचे हा अपव्यय आहे.
छान अनूभव आणि आपली वर्तवणूक.
छान अनूभव आणि आपली वर्तवणूक.
माझे मत:
- दोन तासांच्या रायफल ड्रिलने सैनीकाला फारसे काही होत नसणार. तो त्यांच्या अंगमेहनतीच्या सवयीचा भाग असतो.
- कमांडर त्याच्या जागी योग्यच होता. ( पण त्याने अशी शिक्षा दिली अन ती योग्य रित्या राबवली जात आहे याचा काय पुरावा तो वरिष्ठांना देणार होता?)
- त्या सैनीकाच्या मुलीबद्दल वाईट वाटले. ईश्वर त्या मुलीच्या आत्माला शांती देवो.
- आपण केलेले योग्य आहे. आपण सैनीक असून त्यावर डॉक्टर आहात. तुमच्या भावना सैनीकांपेक्षा निराळ्या असतील.
- आपण प्रतिसादांत लिहीले आहे की कागदोपत्री नोंद होणे महत्वाचे असते. जर एखादा सैनीक (आजकाल मोबाईल बोकाळले असले तरी) काही कारणास्तव हेड ऑफीसला संपर्क साधू शकत नसेल तर तो जवळच्या पोलीस स्टेशनला जावून त्याचे म्हणणे नोंद करू शकत नाही का? याने कागदोपत्री पुरावा उपलब्ध होईल.
- त्या सैनीकावर देखभाल करण्यासाठी दुसरा सैनीक ठेवण्यापेक्षा इतर सैनीक परेड करत असतात त्याच वेळी मैदानावर या सैनीकाला शिक्षा दिली असती तर त्यावर त्या परेडच्या कमांडरची देखभालही झाली असती.
- कदाचीत इतर सर्व सैनीकांना या सैनीकाच्या परिस्थीतीची कल्पना असावी. ते त्याला सांभाळून घेत असावे. आपण अधिकारी असल्याने आपल्यापर्यंत आले नसावे.
छान अनुभव, आवडला.
छान अनुभव, आवडला.
पण सातारच्या पोष्टातून तार
पण सातारच्या पोष्टातून तार केली असती तर त्याने कळवायचा प्रयत्न केला हे सिद्ध झाले असते ना?
लेख आवडला.
लेख आवडला.
पोलीस स्टेशन वर जाऊन चिरीमिरी
पोलीस स्टेशन वर जाऊन चिरीमिरी देऊन कुणीही अशी नोंद करू शकतो किंवा तारही करू शकतो. बहुसंख्य सैनिक हे उत्तर भारतीय असल्याने तेथे अशा गोष्टी सहज करता येतात यामुळे या गोष्टींवर लष्करात अजिबात विश्वास ठेवत नाहीत. त्याने दिलेला मुलीच्या मृत्यूचा दाखला त्याच्या सत्यतेबद्दल पुरेसा होता. परंतु तो सैनिक वेळेत युनिट मध्ये पोहोचला नाही ही वस्तुस्थिती बदलत नाही. अशा तातडीच्या परिस्थिती युद्ध काळातही होतात परंतु कोणताही भेदभाव होऊ नये म्हणून एक प्रक्रिया असते ती पाळावीच लागते.
नियम बाह्य वर्तन म्हणजे
नियम बाह्य वर्तन म्हणजे गुन्हा केला.
मग ते नियम बाह्य वर्तन ठरवून केले की काही अपरिहार्य कारणामुळे तसे वर्तन झाले ह्याला काही किँमत नाही.
फौजेला शिस्त ही असावीच लागते .
बेशिस्त अफाट सेनेला शिस्तीत राहणारी मुठभर फौज सहज हरवू shakte.
त्या मुळे चुकीला माफी नाही हे धोरण योग्य च आहे.
ब्रिटिश नी भारतात आपली सत्ता स्थापित करण्याचे ते एक मोठं कारण आहे
अच्छा!
अच्छा!
सुबोधजी, तुमच्या लेखातून तर
सुबोधजी, तुमच्या लेखातून तर एक वेगळं विश्व उलगडतच, पण प्रतिसादातून सुद्धा अनेक वेगळे पैलू समोर येतात (तो पोळ्यांवर दिलेला प्रतिसाद). धन्यवाद! मिपावर तर तुम्ही लिहीताच, पण मायबोलीवर सुद्धा तुमचं लिखाण अधिकाधिक वाचायला मिळो ही आशा आहे.
सुबोध खरे नौदलातून कसे बाहेर
सुबोध खरे नौदलातून कसे बाहेर पडले हे ऐकायला आवडेल. आणि त्यामुळे नौदलातल्या इतर अधिकाऱ्यांवर आणि युनिट मधल्या इतर लोकांच्या मनोबलावर काय परिणाम झाला हे पण वाचायला आवडेल
.
अशी नोंद करू शकतो किंवा तारही
अशी नोंद करू शकतो किंवा तारही करू शकतो. बहुसंख्य सैनिक हे उत्तर भारतीय असल्याने तेथे अशा गोष्टी सहज करता येतात यामुळे
बहुसंख्य सैनिक उत्तर भारतीय असतात.
म्हणजे बाकी राज्यांनी जमा केलेली संपत्ती उत्तर भारतावर उधळली जात आहे
मी कसा महान हे सांगण्यासाठी
मी कसा महान हे सांगण्यासाठी हा लेख लिहिण्यात आला होता. लिहिण्याची एवढी हौस आहे तर नौदलातून बाहेर कसे पडला हे पण लिहावे.
अनु उत्पादक काम.
अनु उत्पादक काम.
हा काय प्रकार असतो.
कोणतेच काम अनु उत्पादक नसते.
त्या मधून काही तरी निर्माण होते.
खरे हे सशस्त्र दलात होते .
खरे हे सशस्त्र दलात होते .
हेच मला अजून तरी पटले नाही.
ते नक्की डॉक्टर आहेत का की टेक्निशियन आहेत ह्या मध्ये द्वंद आहे.
Xray, सोनोग्राफी, अशा प्रकारचे tech असतील.
उष्ण प्रदेशात covid वाढणार नाही कारण हा व्हायरस जास्त तापमानात तग धरणार नाही.
असला विचित्र युक्तिवाद त्यांनी केला होता.
तेव्हाच हैराण झालो होतो
छान अनुभव, आवडला.
छान अनुभव, आवडला.
हृदयस्पर्शी..
हृदयस्पर्शी..
किती बिकट परिस्थितीतून जावे
किती बिकट परिस्थितीतून जावे लागते सैनिकांना!
जुन्या माबोकरांनी श्री खरे
जुन्या माबोकरांनी श्री खरे यांना त्यांच्या प्रतिसादांवर सोडून द्यावे . जसे एखाद्याला त्याच्या नशिबावर सोडून देतात तसे.
जुन्या माबोकरांनी श्री खरे
जुन्या माबोकरांनी श्री खरे यांना त्यांच्या प्रतिसादांवर सोडून द्यावे . जसे एखाद्याला त्याच्या नशिबावर सोडून देतात तसे>>>
खिक
Pages