कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़
दुर जाणार्या पावलांच्या आवाजात, हळुच मुकेशच्या धीरगंभिर आवाजात गाणे सुरु होते.ती पाऊल वाटेवर अंधाराकडे जाताना हळुच आवाजाची चाहुल लागुन मागे पहाते...
कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
तो दुरवरुन कँमेर्याच्या दिशेने येत गेट चा एक दरवाजा उघडतो...वळतो कँमेरा त्याच्यावरुन तिच्याकडे ..ती मागे फिरुन दरवाजातुन त्याच्या दिशेला येताना ते दार लाऊन घेते
मेरा दर खुला है खुला हि रहेगा, तुम्हारे लिए,
कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
एका युनिवर्सिटीच्या विस्तिर्ण प्रांगणात त्याला मध्यभागी ठेऊन कँमेरा गोल फ़िरतो..तो लांब जातो हळुहळु..कँमेराहि त्याच्यासोबत जातो..
अभी तुम को मेरी जरुरत नहीं,
क्षणभर कँमेरा स्थिर होतो त्याच्या चेहर्यावर आणि परत फिरायला लागतो
बहुत चाहने वाले मिल जायेंगे
तिचा क्लोज अप आणि कँमेरा तिच्याडोळ्यांवरुन,केसांवरुन फिरतो..ती मान मागे वळवते..
अभी रूप का एक सागर हो तुम, कँवल जितने चाहोगी खिल जायेंगे
पुन्हा एकदा कँमेर्यात दोघेहि ...ती कँमेर्याच्या दिशेने येते आणि तो मागेच समांतर कँमेर्याच्या कक्षेत काहि पावले टाकतो व कँमेरा नंतर परत त्याच्यावर..
दर्पण तुम्हें जब डराने लगे, जवानी भी दामन छुड़ाने लगे
परत तिचा क्लोज अप..चेहर्यावर जराशी निर्विकार किंचित बेदरकारीची छटा,खर तर पुर्ण गाण्यात दिसते ती..थोडीशी विरुद्ध बाजुला चालत परत मागे वळुन त्याच्याकडे पहाते.
तब तुम मेरे पास आना प्रिये...
त्याच्यावर लाँन्ग शाँट अणि डावीकडुन उजवी कडे कँमेरा फिरतो आणि तिच्यावर स्थिरावतो.
मेरा सर झुका है झुकाहि रहेगा
तुम्हारे लिये..कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
झाडांच्या फांद्यांच्या सावलीत उभा राहुन तो सांगतोय तिला..
कोई शर्त होती नहीं प्यार में, मगर प्यार शर्तों पे तुमने किया
कँमेरा स्तब्ध..तिच्या चेहेर्यावर चाललेला छायाप्रकाशाचा खेळ..
नजर में सितारे जो चमके ज़रा
पुन्हा त्याच्यावर फोकस..
बुझाने लगीं आरती का दीया
ती परत फिरते आणि अंधाराच्या दिशेने चालु लागते..अचनक मागे वळुन पहाते आणि तशीच मागे मागे जात अंधारात नाहिशी होते
जब अपनी नजर में ही गिरने लगो, अंधेरो में अपने ही घिरने लगो
तो बाहेर हिरवळीवर आणि ती आत..दोन खिड्क्यामध्ये दिसणारे दोघे जण,,मधे काचेच्या तावदानांचे अंतर..दोघे आपापल्या जगात जणु. ती पहात असते त्याच्याकडे आणि पुढच्या क्षणी कँमेरा तिला तिथुन जाताना फक्त दाखवतो..तिच्या मागे जात नाही..
तब तुम मेरे पास आना प्रिये..
ती परत कुठल्याश्या वर्गात शिरते... कँमेर्यात फ्रेम मधे फक्त दाटुन राहिलेला फक्त अंधार.आणि कुठेतरी थोडासा उजेड..
कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
उंच वर असलेल्या दोन मिनारांच्या मधुन कँमेर्याला ती जाताना दिसते
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
उंच लांबवर पसरलेल्या तीन मिनारांच्या सावल्या आणि ती एका कोपर्यातुन त्या सावल्यांच्या दिशेनेच त्यांच्यातिलच एक सावली बनुन येते..आणि तशीच पुढे चालत रहाते..कालांतराने क्षणभर चार वाटणार्या सावल्यांपैकी तिन कायम स्थिर तिथेच रहातात..तिची एकच सावली पुढे चालत रहाते..तुटुन निघाल्यासारखी.
ती चालत रहाते आणि फक्त धुन ऐकु येत रहाते
मनोगत
हिन्दि सिने गीतांशिवाय आयुष्याची कल्पना करणे कठिण आहे. अनेक ग़ीतानी आपल्याला कळत नकळत भुरळ घातलेली असते. त्यातिल काहि आवडत्या गाण्यांवर आपल्याला भावतं ते लिहावं असं मनात आलं.आणि हे गाणं मला आठवलं.
काळ1970 चा...पाश्चिमात्य विचारांचे आकर्षण तेव्हाही होतेच समाजात.तिकडचे कसे सगळे चांगले यावर लोक भरभरुन बोलु लागले होते. अशा परिस्थितीत हा सिनेमा आला.पाश्चिमात्य देशात वाढलेली पण मुळची भारतिय असलेली ती आणि तिच्यावर प्रेम करणारा पण भारतिय मुल्ये जपणारा तो यांच्यातली हि खुप छान गोष्ट आहे.आणि त्यातले हे गाणे खुप सुन्दर जमुन आलेले आहे. आपण खुपदा ऐकले असेलच म्हणा. शब्द,संगित,गायन सगळे उत्कृष्ट.
पण हे सगळे आत पर्यंत झिरपायला या गाण्याचा कँमेरा हा एखाद्य पात्राप्रमाणे आपल्याला सर्व काहि उलगडुन दाखवतो. शब्दाला योग्य न्याय देणार्या प्रतिकात्मक गोष्टी खरोखरच ती गोष्ट मनात घर करुन बसायला नकळत पणे मदत करतात.
परवा मनोजकुमारला कुणितरी विचारले रेडिओ वर मुलाखतीत...कि तुमच्या गाण्यांचे टेकिंग इतक़े खास कसे असते..तुम्हाला कसे सुचले तेव्हा? त्याचे उत्तर खुप छान होते.तो म्हणाला कि माझ्या सिनेमात ग़ाणी नव्हतीच्..गोष्ट पुढे नेणारा तो एक प्रभावी भागच असतो गोष्टिचाच...नव्हे ती गोष्ट्च असते.
हे गाणे सार्वकालिक आहे. आजच्या पिढिला हि हे गाणे खुप काहि देऊ शकते. कारण असं वाटतं कधिकधि कि आपले म्हणुन असलेले काहितरी हरवत चाललेले आहे.
केवळ मनोज सायरा यांच्यातली हि गोष्ट उरत नाहि..तर दोन पिढ्यांमधली,दोन संस्कृतींमधली, दोन जगांमधली..एक पुढारलेले "समजले" जाणारे दुसरे मागासलेले "समजले" जाणारे, दोन वास्तवांमधली..एक ज्याला हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आणि तरीही वाट शोधणार्या समाजाची आणि दुसरे कुठ्लाहि इतका प्राचीन् इतिहास,मुल्ये नसलेल्या प्रदेशातील व्यवहारी माणसांची....म्हटल तर दोघांची वैयक्तिक गोष्ट किवा म्हटल तर फार मोठ्या कँनव्हासवर चितारलेला मोठा प्रश्न.
छायाप्रकाशाचा खेळ, अंधाराचा खुप सुन्दर उपयोग, शब्दामागुन उघडले जाणारे दार,लांबलेल्या सावल्या अणि सावलीची फारकत घेणारी तिची सावली..सर्व काहि त्या गाण्याचा मुड संभाळणारी आणि हे सर्व तटस्थपणे टिपणारा कँमेरा या गाण्याला अधिक उंचीवर घेऊन जातो.
"दिग्दर्शक्" मनोज कुमारच्या चित्रपटांच्या गाण्यांबद्दल बोलावेच लागेल..बोलेनही..एकेकाची वेळ येईल तेव्हा.
सध्यापुरती एकच विनंती...हे वाचुन झालय ना... आता मनसोक्त त्या गाण्याचा आस्वाद घ्या..यु ट्युबवर जाऊन हे गाणं शोधा आणि पहा,ऐका. पहा पटतय का मी काय म्हणतोय ते.
Movie/Album: पूरब और पश्चिम (1970)
Music By: कल्याणजी-आनंदजी
Lyrics By: इन्दीवर
Performed By: मुकेश
Cinematographer: वी एन रेड्डी
लेखन : मुकुंद इंगळे
छानच.
छानच.
मस्त गाणे... पूर ब पश्चिम
मस्त गाणे... पूर ब पश्चिम आवडता चित्रपट आहे. सगळीच गाणी छान आहेत त्यातली... सायराबनो फरशी आवडत नसली तरी यात छान दिसली आहे ..छान लेख.