त्याग भाग ५

Submitted by Swamini Chougule on 25 November, 2019 - 14:49

अन्विका गायब झाल्या पासून अनिकेतला ही अन्न गोड लागत नव्हते. तो त्याच्या परीने अन्विकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता . त्याने अन्विकचा फोटो फेसबुकवर अपलोड केला होता आणि तिचा पत्ता सांगणार्‍याला किंवा तिला घेऊन येणार्‍याला 50000 चे बक्षीस ठेवले होते .

एक दिवस त्याला फेसबुकवर एक मेसेज आला तो अन्विका बद्दलचा होता . एका व्यक्तीने नाशिक मधून त्याला मेसेज केला होता. त्याने लिहिले होते की त्याने अन्विकाला रेड लाईट एरिआ मध्ये पाहीले होते . तिचा फोटो ही त्याने अनिकेतला पाठवला होता . ती जिथे होती ,तिथला पत्ता ही पाठवला होता.

अनिकेतचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की फोटोतील मुलगी त्याची अन्विकाच आहे . ती वेगळ्याच अवतारात होती ,भडक मेकअप ,विचित्र कपडे पण ती अन्विकाच होती . तो उठला तडक अन्विकाच्या घरी गेला . त्याने बेल वाजवली; दार अव्दैतने उघडले .

अव्दैत आश्चर्याने म्हणाला , “ अनिकेत तू इथे !”

अन्विकाचे बाबा आतून म्हणाले कोण आहे अव्दैत ? पण अव्दैत काहीच बोलला नाही . बाबा दाराकडे आले आणि अनिकेतला पाहताच त्यांचा पारा चढला .

बाबा , “ तू इथे ! आला तसा परत चालता हो इथून तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची ?”

अनिकेत , “ अंकल ऐकून तर घ्याल का माझे ? अन्विकाचा पत्ता लागला "

बाबा आणि अव्दैत एकदम ओरडले , “खरंच “

अनिकेत ,” मी फेसबुकवर अन्विकाचा फोटो अपलोड केला होता चार महिन्या पूर्वी, आज एका व्यक्तीचा मेसेज आला होता की त्याने अन्विकाला पाहिले आहे त्याने तिचा फोटो आणि पत्ता पण पाठवला आहे .ती नाशिक मध्येच आहे पण ......” ( अनिके बोलायचा थांबला )

बाबा , “ पण काय ?अनिकेत बोल ना ! “

अनिकेत , “ ती रेड लाईट एरिआ मध्ये सापडलीय.”

हे ऐकून अन्विकाचे बाबा आणि अव्दैतच्या पाया खालील जमीनच सरकली . त्यांच्या डोक्यात कोणी तरी तीव्र आघात केलाय असे ते सुन्न झाले . पण अनिकेत पूर्ण भानात होता . तो म्हणाला मी उद्याच नाशिकला जातोय आणि पोलीसांना ही सूचना दिली आहे ते आपल्याला पूर्ण मदत करतील . अस बोलून अनिकेत त्यांच्या उत्तराची वाटही न पाहता निघला सुद्धा .तरी अन्विकाचे बाबा व अव्दैत त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहताच राहिली . पण अन्विका बद्दलची ही माहिती ऐकून त्यांना काही सूचत नव्हते . ते सुन्न झाले होते . अन्विकाची आई हे सगळे ऐकून हादरली होती.

अनिकेत नाशिकला जायला निघला . त्याच्या बरोबर नागपूरचे पोलीस साध्या वेषात निघले होते . अनिकेत नाशिकला पोहचला व त्याने पोलीसांना लॉजवरच थांबायला सांगीतले. तो म्हणाला की तो स्वत: त्या एरियात कस्टमर होऊन जातो आणि अन्विकाचा शोध घेतो मग आपण पुढचं ठरवू . त्याच बोलणं इन्स्पेक्टर जाधवला पटलं होत . इंस्पेक्टर जाधवने त्याच्या म्हणण्याला होकार दर्शवला .
अनिकेत त्या व्यक्तीने पाठवलेल्या पत्त्यावर म्हणजेच नाशिक मधील रेड लाईट एरिआत पोहचला . आणि इकडे तिकडे फिरू लागला . तेथे छोट्या -छोट्या गल्ल्या होत्या व दोन मजली घरे (घरे कसली दुकाने ) दिसत होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला चित्र विचित्र कपडे घातलेल्या आणि भडक मेकअप केलेल्या मुली- बायका त्याला दिसत होत्या . तो जस – जसा पुढे जाईल तस -तसा प्रत्येक बाई त्याला अडवत होती त्याच्या अंगाला झटत होती .अश्लील चाळे करून त्याला स्वतः बरोबर येण्यासाठी गळ घालत होती . पण अनिकेतचे डोळे अन्विकाला शोधत होते. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने त्याला फक्त एरिआचा पत्ता दिला होता . पण नेमके ठिकाण किंवा नेमकी कोणती बिल्डींग ,घर सांगीतले नव्हते .

अनिकेतची नजर भिरभिरत होती . आता त्याने प्रत्येक घरात जाऊन अन्विकाचा शोध घ्यायचं ठरवलं.

अन्विका खरच तेथे होती का ? पण ती तर कामानिमित्त घरातून निघाली पण मग इथे कशी पोहचली असेल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! वाचते आहे.