मेरा ही साया

Submitted by Mukund Ingale on 25 November, 2019 - 10:48

मेरा ही साया
आयुष्यभर माणूस एकच सावली नकळत जपत असतो ..उन्हातली ..पण आयुष्य जगताना मात्र अनेक सावल्यांच्या गर्दीत असतो आणी काही सावल्यांच्या शोधात असतो. काहीना मिळतात तर काहीना ! ....
जन्मल्यानंतर मात्यापित्यांची सावली...संस्कार,प्रेम,पोषण ..तरुण वयात प्रेमाची आणी उतारवयात मृत्यूची...अनेक सावल्या सतत सांभाळत जगायचं ..एखाद्या पालकाचे..प्रियेचे तर सावलीपण आहेच आहे....पण तितकेच ते काळाचे पण आहे.
नेमकें जगण्यासाठी काय हव असतं माणसाला ...एक सावली,साथ, सोबत, संगत ....त्या सावलीला त्या वर्तमानाचे रंग असतात, ती ती त्या त्या वेळेला सोबत येते आणी त्या क्षणापुरते आयुष्य जगणे म्हणजेच....
तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा
मेरा साया, मेरा साया, मेरा साया, मेरा साया

आठवणींवर माणूस जगू शकत नाही पण आठवणींशिवाय पण जगू शकत नाही. आठवण ही भूतकाळात जगलेल्या चांगल्या वाईट क्षणांची सावलीच जणू. तेच क्षण पुन्हा जगता आले तर.....ही हुरहुरच तेवढी वास्तव....पण भरून आलेल्या मनात कोसळणाऱ्या आठवणींचा पाऊस या सावलीला डोळ्यातल्या अश्रुनी ओले करतो. कुणाचा तरी आधार ..दाखवलेली दिशा नवे वळण देऊन गेलेली असते. आपल्या आयुष्याला.सावलीच्या ऋणानुबंधातून मुक्त होताच येत नाही.
कभी मुझ को याद कर के जो बहेंगे तेरे आँसू
तो वही पे रोक लेंगे उन्हे आ के मेरे आँसू
तू जिधर का रुख़ करेगा, मेरा साया साथ होगा

सावली मनातल्या भावनांचे प्रतिबिंब असतं का..नक्कीच. कुणाच्या तरी आठवणींने घायाळ होऊन वर्तमानाचा एक तुकडा अलगद भूतकाळाशी जोडता येतो. आणी त्याच भूतकाळाचे प्रतिबिंब वर्तमानात पाहता येते..हे ईश्वराने दिलेले सर्वात सुंदर वरदान ..मनामनांचा जोडलेल्या काळाचे कालातीत असंख्य पदर तरलतेने ज्याचे त्यालाच उलगडतात आणी तिकडे छेडलेल्या तारेचा झंकार इकडे ऐकू येतो. कुणी असतं का प्रत्येकासोबत.. अस कुणी.. आत खोल असणारे .. ..
तू अगर उदास होगा, तो उदास रहूंगी मैं भी
नज़र आऊँ या ना आऊँ तेरे पास रहूंगी मैं भी
तू कही भी जा रहेगा, मेरा साया साथ होगा

चालू असतं ना आयुष्य त्याच्या गतीने...गती... काय शब्द आहे..वेग म्हणजे पण गती आणी शेवट म्हणजे पण गती ..पण नात्याला कधी ‘तशी’ गती मिळत नाही. म्हणून मन शिल्लक राहत ...आठवणी बनून...
पण काळालाही जे बदलता येत नाही ते नात असत ..कायम..नित्य कालातीत. सावलीसारख सोबत ..प्रवासात अन प्रवास संपल्यावर देखील.
मैं अगर बिछड़ भी जाऊँ, कभी मेरा ग़म न करना
मेरा प्यार याद कर के, कभी आँख नम न करना
तू जो मूड के देख लेगा, मेरा साया साथ होगा

एका शब्दाने न बोलता ..संपूर्ण अर्पण ...स्वत:च्या अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यात लुप्त होणे.विलीन होणे ..Truly Complete Submission. द्वैताकडून अद्वैताकडे ...
एकदा कुणाचे तरी झाले की आपले आपण वेगळे राहू कसे?..पण सावलीचे काय... ती वेगळी असते म्हणूनच दिसते. म्हणजे ‘प्रत्यक्षमय’ होऊनही ‘प्रतिमा’ होऊन उरणे.... यात दोन्हीत फक्त परत काळाचा दुवा आहे. सुखदू:खाच्या पलीकडे जाणारी साथ ....नेणारी साथ. आणी एक अलिप्त लुप्तता. काळाच्या क्षितिजाची रेघ आकाश आणी धरतीला जोडणारी ....नव्या सावलीचा जन्म होईपर्यंत ...
कभी मुझ को याद कर के जो बहेंगे तेरे आँसू
तो वही पे रोक लेंगे उन्हे आ के मेरे आँसू
तू जिधर का रुख़ करेगा, मेरा साया साथ होगा

लिहिलेल्या शब्दांच्या पलीकडचे खूप काही सांगणारे गाणे ...फक्त मनाने ऐकावे आणी सावली सारखे सोबत सतत फक्त जाणवत राहावे ..
...लता मदनमोहन आणी पडद्यावर साधना ...यांच्याविना अर्थ नाही जगण्याला .. खर ना
मुकुंद इंगळे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users