हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल , शंकर, ब्रह्मदेव अशा कालापरत्वे आता मुख्य असलेल्या देवता आहेतच पण पूर्वेची देवता इंद्र, पश्चिमेची वरुण, दक्षिण - यम, उत्तर - कुबेर, वगैरे दिकपालही आहेत. अनेक देवी आहेत, काही देवींचे पुत्र जसे पार्वतीचा स्कंद व गजानन वगैरे वगैरे. कुलदेवता तर निराळ्याच - एकविरा, शांतादुर्गा, जोतिबा वगैरे.
नक्की कोणाची उपासना करायची व का? त्याचेही ढोबळ नियम आहेत.
उदाहरणार्थ - लक्ष्मीची समृद्धीसाठी, नरसिंहाची ऋणमुक्तीकरता (ऋणमोचन स्तोत्र घ्या ना), गणपतीची बुद्धीसाठी वगैरे.
.
परवाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, नवर्याच्या त्वचेवरील तीळाची बायॉप्सी झाली. नंतर ५-६ दिवस लागले निकाल यायला. पण तेवढ्या काळात जी घालमेल झाली ती (वाईट रीतीने) अवर्णनियच, न विसरता येणारी होती पण या काळात मी कुलदेवतेला शरण गेले कारण एकच माझ्या सासूबाई तिचं नेहमी करायच्या व त्यांचे आयुष्य बरेचसे खडतर गेलेले असले तरी त्यांना दैवाची साथ होती. म्हणजे आमच्या एकविरा आईचा वरदहस्त असावा, देवीची कृपा असावी अशी त्यांची मनःशांती व धैर्य होते
मला मात्र या ६ दिवसात अचानक एकविरा देवीची आठवण आली व मी रोज स्तोत्र म्हणू लागले, तिच्या तस्बिरीपुढे उपरती झाल्याप्रमाणे, हात जोडू लागले. ६ दिवसांनी, निकाल चांगला आला, benign आला वगैरे ठीक आहे.
पण मला काही प्रश्न पडले.
(१) आपल्या जीवनात कुलदेवतेचे महत्त्व काय असते व का असते? खरच ही देवता आपल्या पाठीशी उभी रहाते का? त्या म्हणण्यात काही तथ्य आहे का?
(२) जीवनात गुरुचे महत्व काय असते व का असते?
(३) अन्य देवांचे आपल्या आयुष्यात नक्की काय स्थान असते?
उदाहरणार्थ, गेल्या काही दिवसात, मला असे आतूनच वाटले की आपल्याला यातून ना राम, ना शंकर , ना गणपती, कोणी जर बाहेर काढू शकेल तर फक्त देवी काढू शकेल. हा आडाखा कितपत अचूक आहे? मी भारतात असतेवेळी बरेचदा एकविरेला गेलेले आहे परंतु दर वेळी डोकं दुखणे किंवा काहीतरी तत्सम घडत असे. एकदा तर पायथ्याशी पोचल्यानंतर पित्त झाल्याने अन्नही उलटलेले होते.
अजुन एक ज्यादिवशी नवर्याचि बायॉप्सी झाली त्याच दिवशी नेमके माझ्या हातून, मराठी सप्तशती वाचणे घडले. म्हणजे मी पहील्यांदा ओढीने पूर्ण मराठी सप्तशती आयुष्यात पहील्यांदा त्या दिवशी वाचली होती सकाळी व नंतर त्याच दिवशी रुटीन चेक अपमध्ये तो तीळ सापडला व डॉक्टरांनी ताबडतोब बायॉप्सी केली. हाही योगायोगच की.
अर्थात हे सर्व श्रद्धेचे, मनाचे खेळ आहेत असेही एक म्हणता येइल पण 'कुलदेवता' याविषयी अधिकारी किंवा जाणकार लोकांचे अनुभव ऐकायला आवडतील.
______________________
दुर्गा सप्तशतीच्या शेवटच्या एका अध्यायात 'एकविरा' देवीचा उल्लेख येतो. तामसी गुणप्रधान देवी आहे असे वाचल्याचे स्मरते. म्हणजे रागीट, संतापी असावी. तसेच तिचे जे मंत्र मला सापडले त्यात तिचे नाव, महामारी, कालरात्री, क्षुधा, तृषा आदि तामसी शक्तींशी निगडीत सापडले. वरती माझा डोके दुखणे, उलटी होणे हे माझे अनुभव सांगीतले आहेतच.
______________
बायॉप्सीच्या निकालानंतर मात्र तिच्याविषयी सर्व माहीती नेट विंचरुन शोधून काढली. विष्णूदासांनी लिहीलेली स्तोत्रे, परशुरामकृत रेणुका स्तव व अनेक मंत्र. आता रोज सकाळ संध्याकाळ , तिचे स्तोत्र म्हणण्याचा नियमच स्वतःला घालून घेतलेला आहे.
कुलदेवतेचे आयुष्यातील, मनातील स्थान, भूमिका
Submitted by सामो on 8 November, 2019 - 14:18
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुद्दे एकदम बरोबर मांडले आहेत
मुद्दे एकदम बरोबर मांडले आहेत. कोणतीही उपासना सकाम असेल तर हे सगळे लागू होते. पण निष्काम उपासनेला कोणतेच नियम नाहीत असाच अनुभव आहे/येतो.
सर्वांना नमस्कार. माझ्या
सर्वांना नमस्कार. माझ्या सासरचे स्त्री कुलदैवत माहूरची रेणुका माता आहे. परंतु पुरुष कुलदैवत माहित नाही.
त्याची उपासना होत नसल्याने प्रत्येक कामांमध्ये अपयश येत आहे असे ज्योतिषांनी सांगितले. तसेच घरातील पुरुषांना
याचा विशेष करून त्रास होत आहे.
पुरुष कुलदैवत समजण्यासाठी गुरुजींच्या सांगण्यावरून मी ९ शुक्रवार देवीची उपवास करून ओटी भरली. परंतु त्याबाबत काही दृष्टांत मिळाला नाही.
पुरुष कुलदैवत समजण्यासाठी काही उपाय असतील तर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
पुरुषदेवता माहित नाही म्हणून
पुरुषदेवता माहित नाही म्हणून असा त्रास होतो हे पटत नाही कारण तसं असेल तर देवता स्वतःच काहीतरी दृष्टांत देऊन आठवण करून देते. असल्या केस मध्ये हा एक तोडगा माझे मार्गदर्शक लोकांना बऱ्याचदा सांगायचे . पण ते प्रश्नकुंडली मांडून तो दोष बरोबर हेरायचे आणि बऱ्याच लोकांना कॉमन होता तो उपाय म्हणून देतोय. तुमच्या मुळगावातील जी तुमची शेती आहे तिथे क्षेत्रपाल असतो (एखादा म्हसोबा, वेतोबा यांचा दगड असतोच) त्यांना एका पौर्णिमेला जाऊन व्यवस्थित पुजून विषम संख्येत बाळगोपाळांना( मुलगे) गोडधोडाचं जेवण घाला आणि त्या गावच्या ग्रामदैवतांनाही जो काय मानपान असतो तो करा. बरेच लोकं कामधंद्यानिमित्त इतरत्र गेली तर हे मुळचे स्थानिक उपदैवते( demigods) दुर्लक्षित राहिल्याने नाराज होतात.
बाकी माझ्याकडे हे एक कात्रण आहे ज्याचा मला काही अनुभव नाही पण पहा कोणाला थोडाफार फायदा झाला तर -
upload picture for free
उपाय आणि प्रतिसाद दिल्याबद्दल
उपाय आणि प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप आभार.
तुम्ही सांगितलेलं वरील उपाय मी नक्की करेन.
कात्रण बद्दल खूपच धन्यवाद.
तुम्ही सुचवलेला ग्रामदेवतेच्या पूजनाचा उपाय मला अगदीच पटला आहे. मला इतके दिवस सुचला कसा नाही असं वाटत आहे.
पुरुषदेवता माहित नाही म्हणून असा त्रास होतो हे पटत नाही कारण तसं असेल तर देवता स्वतःच काहीतरी दृष्टांत देऊन आठवण करून देते>>>> हो बरोबर आहे. परंतु माझ्या नवऱ्याच्या पत्रिकेवरून गुरुजींनी असं सांगितलं आहे.
पुरुष कुलदैवते लोप पावली आहे म्हणून हे सगळे त्रास होत आहेत.
सर्वच माहीती उत्तम. भागवत,
सर्वच माहीती उत्तम. भागवत, जिद्दू आपले आभार.
तुम्हाला कुणी मदत करणारा
तुम्हाला कुणी मदत करणारा करणारी असेल ती व्यक्ती जवळच असते. दूर कुठे मूळगावात नसते.
>>>> तर देवता स्वतःच काहीतरी
>>>> तर देवता स्वतःच काहीतरी दृष्टांत देऊन आठवण करून देते. >>>> हे खरे आहे.
This is uncanny. This is is
This is uncanny. This is is unbelievable.
काल रात्री स्वप्नात मी देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढत होते. माझ्याकडे देवीला भेट म्हणुन तोरलं होतं (चांदीची माळ). देवीने (एका स्त्रीने) येउन ते माझ्याकडून घेतलं. बाप रे मला आजपर्यंत तोरलं हा शब्दच माहीत नव्हता. मग कसं काय स्वप्नात ते आलं?
आणि मग 'तोरलं दागिना' अशी सर्च दिली तर काही सापडलं नाही. पण मग सुचलं डोरलं. तर खरच डोरलं म्हणुन दागिना दिसतोय की. मंगळसूत्राचे काळे मणी व मध्यभागी शिंपल्याचे पदक असे वर्णन माबोवरच्या एका धाग्यात वाचले - https://www.maayboli.com/node/1293
_______________
हे असे काही झाले की विश्वास दॄढ होतो. मी डिसेंबरात कार्ल्याला देवीदर्शनासाठी जाणार आहे. तेव्हा हा दागिना, घेउन जाइन.
पण हे असे अनुभव विलक्षण वाटतात. असो!
https://www.loksatta.com/lekh
https://www.loksatta.com/lekh-news/speech-in-durgabai-bhagwat-smruti-vya...
या लेखातही रेणुका देवीचा उल्लेख आहे. रेणुकेस कालीचेच रुप मानले जाते असे माझ्या वाचनात आले होते. या लेखात डॉ अरुणा ढेरे म्हणतात की आपल्याकडे रेणुकेस कालिकेची बहीण मानले जाते.
अतिशय सुंदर लेख आहे.
पण हे असे अनुभव विलक्षण
पण हे असे अनुभव विलक्षण वाटतात. >>> मस्त अनुभव सामो.
धन्यवाद अन्जू
धन्यवाद अन्जू
मला माहिती नाही का पण आमच्या
मला माहिती नाही का पण आमच्या कुलदैवतेशी कनेक्ट नाही होता येत...तिरुपति बालाजी आहे.. सासरी माहेरी ...पण सासरी नेम आहे नवरा बायकोने एकत्र न जाण्याचा... अगदी घरातून दर्शनाला पण नाही निघायचे..एकजण वेडे होते किंवा आजारी पडते ते पण गंभीर...कधीच जाणे झाले नाही... मुलगी muscular dystrophy मधून चमत्काराने बरी झाली तर जाणार आहे ..नवस बोलला आहे... शक्यता कमी आहे.... Unreachable वाटतो बालाजी ..त्यापेक्षा राम,कृष्ण आणि महादेव आपले वाटतात.. मला वरवरची भक्ति पण पटत नाहीं..... आठवण येत नाही...प्रयत्न सुद्धा करत नाही फारसा... पण स्वप्नात दर्शन झाले. बालाजी पद्मावती आणि लक्ष्मी ...त्यांनी गोड हसुन आशीर्वाद दिला आणि अंतर्धान पावले... Almost felt like a lucid dream...पण परिस्थिती जैसे थे.....असे बरेच वेळा होते.. मनी नसलेले पण स्वप्नी येत.. लहान असताना एकदा स्वप्नात श्री राधा आमच्या दरवाजा पाशी आली आहे आणि मी पळत गेले तिला नमस्कार केला... आणि तिला विनंती केली की तू आली आहेस तर माझ्या आई पपाना पण दर्शन दे . ती म्हणाली की त्यांंची एवढी पुण्याई नाही.. ती अदृश्य झाली....it made sense after I realized karma...मी अजिबात धार्मिक नाही.. अध्यात्मिक आहे...... Sometimes this confuses me...
सामो खूप प्रसन्न वाटते अशा
सामो खूप प्रसन्न वाटते अशा स्वप्नानंतर..।
आपला अनुभव इथे मांडल्याबद्दल
आपला अनुभव इथे मांडल्याबद्दल आभार आदिश्री.
>>> Unreachable वाटतो बालाजी>>> परफेक्ट मला स्वतःला विष्णू, कृष्ण व राम हे भयंकर अनरीचेबल असण्याचा अनुभव आहे. काहीही थांग लागत नाही, काहीही कणभरही प्रचीति येत नाही.
त्यामानाने देवीची लगेच येते.
दत्ताचीही येते पण विपरित प्रचीती येते मला. म्हणजे दत्तभक्ती करु नये (तेरे बसकी बात नही) असे संकेत येउ लागतात.
मला साईबाबा मी 10 वीत असताना
मला साईबाबा मी 10 वीत असताना स्वप्नात आलेले, तेव्हापासून मी त्यांचं करायला लागले, कधी मला कोणी दुसरा गुरुमार्ग सांगितला, तर साईबाबा मला काहीतरी प्रचिती दाखवतात की मी आहे पण तरीही मला खूप म्हणजे खूप त्रास आहे , तो का हे मला समजत नाही. मी धार्मिक आहे, सर्व देवांचे करते, माहेरच्या सासरच्या कुलस्वामिनीचं पण करते पण मी नाम:स्मरण, वाचन, मला जमेल तसं करते, खूप कर्मकांडे करत नाही. आलटून पालटून मनात येईल तशा पोथ्या वाचते, त्यात श्रीपाद श्रीवल्लभ, स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा सर्वच आले. अर्थात रोज पाच दहा, पंधरा वीस वगैरे करत अनेक महिने लावते पूर्ण करायला, बरं एक झाली तर लगेच दुसरी घेतली वाचायला असं करत नाही, मला आतून जेव्हा वाटेल तेव्हाच दुसरी घेते वाचायला. त्यात बराच काळ पण मधे जातो. प्रत्येक वेळी वाचताना मला नवीन अर्थ उमगतात, आत्मिक समाधान मिळतं.
दर बुधवारी मात्र अनेक वर्षे विष्णुसहस्त्रनाम वाचते कोणीही न सांगता, दर गुरुवारी गुजराथी दत्तबावनी म्हणते, नवरात्रात देवी त्रिशती वाचते. रोज हनुमान चालीसा वाचते. बाकी छोटी तोंडपाठ स्तोत्र बाप्पा, देवी, स्वामी रोज म्हणते.
अध्यात्म मात्र मला नाही जमत.
>>>अध्यात्म मात्र मला नाही
>>>अध्यात्म मात्र मला नाही जमत.>>> अन्जू ,म्हणजे? मग तुम्ही करता त्याला काय म्हणतात? (अचंबीत बाहुली)
मला विष्णू सहस्रनाम सुरु करायचे आहे
आळशी आहे मी.
मला भक्तीमार्ग जमतो
मला भक्तीमार्ग जमतो अध्यात्मातला, किंवा भावतो. अर्थात मी खूप करु शकत नाही कारण माझ्या मुलाचं करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे, तो माझा कर्मयोग आहे.
ध्यानधारणा अजिबात जमत नाही असं म्हणायचं आहे मला. योगमार्ग जमत नाही. माझा नवरा आणि भाऊ ह्या मार्गांवर जास्त आहेत.
मला विष्णू सहस्रनाम सुरु करायचे आहे >>> ह्यात दोन प्रकार आहेत, स्तोत्र आणि नामावली. मी नामावली वाचते, तो सोपी आहे, वीस मिनिटं लागतात सलग वेळ मिळाला तर. मला मुलामुळे उठायला लागतं बरेचदा मधेच त्यामुळे वेळही लागतो.
हां बरोबर.योगमार्ग भयानक अवघड
हां बरोबर.योगमार्ग भयानक अवघड असावा.
भक्तीमार्ग सांसारिक/ गृहस्थाश्रमी लोकांकरताच आहे. सोपा आहे असे ऐकले आहे.
मलाही विष्णु सहस्रनामाला २० मिनिटे लागतात.
बरेचदा संकेत न मिळाल्याने वाटते, हे जे काही म्हणजे विष्णु सहस्रनाम करतो आहोत ते पोचते तरी आहे का?
कधी कधी वाटतं की आपलं काहीच
कधी कधी वाटतं की आपलं काहीच पोचत नाही. देव आहे की नाही असंही वाटतं. आपण soft टार्गेट आहोत नियतीचे असंही मनात येतं पण कुठेतरी त्याच्यावरची श्रद्धाच बळ देते सर्व सोसायचं असंही वाटतं. माझे बाबा कायम सांगतात आपण आपलं कर्म प्रामाणिकपणे करायचं, फळाची अपेक्षा करायची नाही, गीतेतला श्लोक पण तरी त्रास होतोच की का असं, इतकं करूनही. असो
.
साईबाबांचे स्वप्न हा १००% शुभ
साईबाबांचे स्वप्न हा १००% शुभ संकेत आहे.
तुम्हाला इथेच एक लिंक पाठवते (सापडली तर). ज्या लिंकमध्ये अमृता प्रितमाला मिळाप्रि, साईबाबांच्या स्वप्नाचा संकेत आहे.
__________________
ही लिंक - https://achintya.wordpress.com/visions-of-divinity/
बघते लिंक पण साईबाबा आले
बघते लिंक पण साईबाबा आले स्वप्नात तेव्हा मी दहावीत होते, खूप खूप वर्ष झाली. नंतर हा सर्व त्रास भोगतेय तो मला मुलगा झाल्यानंतर.
सासरच्या कुलस्वामिनीचं दर्शन करा, मुलाला घेऊन, असं सांगितलं त्याच्या पत्रिकेवरून तिथेही जाऊन आलो. कुलदेवालाही जाऊन आलो. सर्व रत्नागिरीजवळ आहे. कोणी शंकराचं करा सांगितलं. गुरुचरित्र नवऱ्याला वाचायला कोणी सांगितलं, नवनाथ सांगितलं. सर्व केलं. त्याने काय किंवा मी काय सगळे उपाय केले धार्मिक. बाकी बुवाबाजी, बंगाली बाबा वगैरे ह्या मार्गाला गेलो नाही फक्त देवाचे कोणी सांगेल ते. अर्थात असं वेगळं सांगणारे काहीजण रस्त्यात वगैरे भेटले पण क्वचित अर्थात तिथे लक्ष दिलं नाही.
दुसर्याला सांगणं सोप्प आहे
दुसर्याला सांगणं सोप्प आहे हे माहीत आहे तरीही परवा जे वाचलं त्याबद्दल सांगते -
नॅरेटिव्ह थेरपी नावाची एक थेरपी आहे. जिचे पायाभूत गृहीतक हे आहे की आपण प्रत्येकजण स्वतःला एक कथा/कहाणी सांगत असतो जिच्यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत आपण असतो. या थिअरीच्या अनुसार, बहुसंख्य लोक स्वतःला व्हिक्टीम समजून ही कथा सांगत असतात. लोक आपल्या समस्येवरती भर देउन ही कथा स्वतःला सांगत रहातत.
सकारात्मक गोष्ट म्हणजे - ही कथा बदलता येते. वी कॅन रि-टेल धिस स्टोरी.
________
अर्थात हे सर्व मी थिअरॉटिकलच वाचलेले आहे.
किती करतेस अन्जु.....मी फार
किती करतेस अन्जु.....मी फार क्वचित करते......निरपेक्ष भक्ति आहे तुझी..
मला प्रामाणिकपणे वाटते की स्वतः चे खरे रूप काय /कोहं याची प्रचंड ऊत्सुकता.. जीवनमुक्तिची अनिवार ओढ..सर्व जीवांशी वाटणारे कनेक्शन.. निसर्गात जानवणारी दैवी अनुभूति.. एकांतवासात आपल्या आत होणारी परमात्मारूपाची जाणीव......हे थोडे फार अध्यात्म.. मग
मंदिरात जायची ,मूर्ति समोर बसायची गरज संपते...मग आपल्या लक्षात येते की आपण किती मर्यादित करत होतो सच्चिदानन्द रूपाला.... मग फक्त आपण झाडाला बघत नाहीं ते पण आपल्या कडे बघते...खूप uncomfortable वाटते सुरुवातीला पण मग सवय होते......आपोआप नामस्मरण होते.. आपोआप साधना होते...बाधाच आहे ही पण देवाची..तोच प्रयत्न करतो आपल्यातल त्याचे अस्तित्व वाढवायची.....पण प्रत्येकाची अध्यात्माची व्याख्या आणि प्रवास वेगळा असु शकतो...
Sorry सामो वहावत गेले....ऊडवू का☺️
उडवु नका आदिश्री तुम्ही दोघी
उडवु नका आदिश्री तुम्ही दोघी खूप सकारात्मक सांगता अहात. शिवाय आपण आपले विचार लिहीले की ते पक्के होतात.
आपोआप साधना होते >>> हेच जमत
आपोआप साधना होते >>> हेच जमत नाही मला. तो मार्गच माझा नाही असं वाटतं.
निरपेक्ष भक्ति आहे तुझी.. >>> नाही नाही, निरपेक्ष नाही. अपेक्षा आहेत देवाकडून. मागते मी बरंच काही पण तरी आता विरक्त होत चाललेय एकीकडे. फार आसक्ती राहीली नाही.
खूप नाही करत पण desktop समोर बसलेली असताना अधूनमधून गणपती आरती, रामरक्षा, मारुतीस्तोत्र, अथर्वशीर्ष वगैरे लावते, मुलगा खेळत असतो आजूबाजूला त्याच्या कानावर पडावे ह्या उद्देशाने.
कधी कधी मी स्वत: जाम घाबरट आहे असं मला वाटतं, पुढे अजून काय होईल, म्हणून परमेश्वराचा आधार घेते की काय असंही मनात येतं.
आदिश्री तुम्ही छान लिहिलंय. मीच जास्त पाल्हाळ लावलय असं मला वाटतंय. सामो मी एडीट करू का माझ्या पोस्ट्स.
अन्जू सुंदर लिहीले आहेत की,
अन्जू सुंदर लिहीले आहेत की, नका करु एडिट.
__________
देवाला घाबरावेच, पापापासून दूर रहातो आपोआप. देवाला घाबरणे अत्यंत चांगले असे माझे तरी पूर्वीपासूनचे मत आहे.
काय होतंय, परिस्थिती अजून
काय होतंय, परिस्थिती अजून वाईट झालीय, कालचा गोंधळ बरा होता म्हणण्याइतपत, आजचा दिवस पार पडला असं म्हणत पुढे जातोय पण ह्याहीपेक्षा काही वाईट होऊ नये अशी घाबरत राहते मी. फक्त आम्ही तिघेच नाही तर आमच्या जवळच्या माणसाना पण काही त्रास होऊ नये, सर्व सुखी राहावेत असं वाटतं. तसं त्याही पलीकडे जाऊन मी जगात सर्वांना सुखी ठेव ही प्रार्थना करत असते कारण तेवढंच माझ्या हातात आहे, प्रार्थना करत राहणं.
>>>> फक्त आम्ही तिघेच नाही तर
>>>> फक्त आम्ही तिघेच नाही तर आमच्या जवळच्या माणसाना पण काही त्रास होऊ नये, सर्व सुखी राहावेत असं वाटतं. तसं त्याही पलीकडे जाऊन मी जगात सर्वांना सुखी ठेव ही प्रार्थना करत असते कारण तेवढंच माझ्या हातात आहे, प्रार्थना करत रहाणे.>>>>
खूप सुंदर!!!
>>>>>>>सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग्भवेत्।
ॐ शांतिः शांतिः शांतिः>>>>>
.
अतिशय उदात्त विचार आहे. तुमच्याकडे हाच विचार हीच शांती कैकपटिंनी परत येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
काही उद्दात्त नाहीत फार,
काही उद्दात्त नाहीत फार, स्वत: ला त्रास असला की दुसऱ्याचा जाणवतो, किंवा रिलेट होतो तसं आहे. त्रास नसता स्वत:ला आयुष्यात तर परदु:ख शीतल वाटलं असते कदाचित. काय माहिती कसं असते ते. पण इमोशनल आहे पहिल्यापासून, परिस्थितीने कणखर झाले असले तरी त्यामुळे नसते बघवलं दुसऱ्याचे दु:खही असंही वाटतं एकीकडे.
अन्जू ..मलाही माझ्या हाका
अन्जू ..मलाही माझ्या हाका देवाला ऐकू येत नाहीत असेच वाटायचे.. ऐवढ्या मोठ्या ब्रह्मांडात मी किती क्षूद्र म्हणून येत नसतील असे मी समजावले स्वतः ला .....मी अंधारया गुहेत साखळी ने बांधलेल्या अवस्थेत सरपटत आहे ..हाताला पायातून खडे टोचून रक्त येत आहे...आणि एक किरण दिसत आहे... पण देवाला काही ऐकू येत नाही... कित्येक वर्ष हे जाणवले.....तुझ्या प्रत्येक त्रासाला मम...
आपण special डब्याचे प्रवासी आहोत...General rules don't apply. ..परमेश्वराला यातच आपले हित दिसत असेल... ..मी तर देवालाही समजून घेतले...असेल तुझी काही हतबलता...नाहीतर तू ऐकलच असतेस ना माझे....
सामो खूप आभार... व्यक्त होता आले..
Pages