पेपरात एक बातमी वाचण्यात आली. तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाने भाऊबीजेच्या पुढच्याच दिवशी आत्महत्या केली. कारण त्याच्या बहिणींनी त्याला भाऊबीजेची भेट म्हणून बाईक घेऊन दिली आणि तो भाऊ असूनही त्याच्याकडे बहिणींना द्यायला प्रेमाव्यतिरीक्त काही नव्हते. तो एक सुशिक्षित बेरोजगार होता. त्याला हे शल्य बोचू लागले आणि ते देखील या थराला गेले की त्याने आपले जीवनच संपवले.
अत्यंत दुर्दैवी घटना. आदल्या दिवशीच्या आनंदी दिवसानंतर अचानक हे.. काय वाटले असेल त्याच्या बहिणींना आणि आईवडीलांना कल्पनाही करवत नाही.
योगायोगाने काही वर्षांपूर्वी माझ्याही ओळखीच्या एका घरात अशी भाऊबीज पाहण्यात आलेली. तिथेही नेमके तीन बहिणी एक भाऊ होता. चारेक महिने भाऊ जॉब सुटल्याने बेरोजगार होता. अश्यात बहिणींना काही द्यावे या परीस्थितीत नव्हता. बरं या आधी त्याच भावाने त्या बहिणींना आधीच्या भाऊबीजना मोबाईल वगैरे महागडी गिफ्टस देऊन झालेल्या. त्यावरून त्या बहिणी यंदा काही नाही का दादा अशी त्याची मजा घेत होत्या. मला तरी त्यात कुठेही टोचून बोललेले जाणवत नव्हतो. ओळखीची फॅमिली. तसा त्यांचा स्वभावही नाही. पण वेगळ्याच मनस्थितीत असलेल्या त्या भावाच्या ते मनाला लागले. आणि हसता हसता अचानक तो हुंदके देत धाय मोकलून रडायला लागला. त्या बहिणींनाही अपराधी वाटले आणि त्याही रडायला लागल्या. मी मग फार न थांबता तिथून निघालो. प्रसंग मात्र मनावर कोरला गेला.
मी स्वत:ही एकेकाळी या बेरोजगारीच्या लाचार काळातून गेलो आहे. एक नोकरी काही कारणांनी अचानक सोडावी लागली आणि दुसरी लगेच मिळायला तयार नव्हती. साधारण दोनतीन महिने मी जॉबलेस होतो. फार नाही. आणि त्यातही आधीची सेव्हिंग माझे खर्च चालवायला पुरेशी होती. घरखर्च चालवायला आईबाबा समर्थ होते. वर्षभर खुशाल स्वखुशीने घरी बसलो असतो तरी चालले असते. पैश्याची चिंता करावी अशी स्थिती दूरदूरपर्यंत नव्हती.
पण तरीही मन खात राहायचे. शिक्षण झालेय. कमवायला लायक झालो आहोत. पण कमावत नाही आहोत. ही भावना बोचत राहायची. दिवसभर घरी आयते लोळून खातोय असे उगाचच वाटत राहायचे. संध्याकाळी नेहमीच्या कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारायला जायचीही लाज वाटू लागलेली. कोणी काही तरी विचारेल. काय उत्तर द्यायचे. विचारले नाही तरी समोरच्याच्या डोक्यात तेच प्रश्न असणार असे उगाचच वाटायचे. एखादा आपल्यापेक्षा कमी शिकलेला आणि आपल्या निम्मा पगार घेणारा मित्रही आता आपल्याकडे बेकार म्हणून बघत असेल असे स्वत:लाच वाटायचे. बेकार. फार बेकार शब्द आहे हा. आणि तितकीच बेकार भावना. कमवायची पात्रता आहे पण न कमावणारा...
कदाचित मी चुकतही असेन, पण मला वाटते हे न कमावते असण्याचे दडपण मुलींपेक्षा मुलांवर जास्त असते. जसे काही समस्या महिलांशी निगडीत असतात तसे ही पुरुषांसमोरील एक समस्या वाटते. येत्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात ही समस्या जास्तीत जास्त मुलांना भोगावी लागणार. त्यांना सांभाळून घ्या _/\_
धाग्याचा विषय काय?
धाग्याचा विषय काय?
मधेच स्त्री बॉस/ पुरुष बॉस वर काय बोलत सुटलेत लोक?
माबोकर विषयाला(च) धरून बोलत
माबोकर विषयाला(च) धरून बोलत नाहीयेत म्हणजे सगळे आलबेल आहे.
मधेच स्त्री बॉस/ पुरुष बॉस वर
मधेच स्त्री बॉस/ पुरुष बॉस वर काय बोलत सुटलेत लोक? Uhoh
>>>>
आणि हा स्त्री पुरुष बॉस विषय मी वेगळ्या धाग्यात नेला तर तिथे लोकं बोलत आहेत की काहीही विषयावर धागा आहे
तिथे लोकं बोलत आहेत की काहीही
तिथे लोकं बोलत आहेत की काहीही विषयावर धागा आहे>>>>>>>>>>> त्यांना इथेच बोलायचं असेल. त्या धाग्यवर मी आपल्या समाजात पुरुषांवर कमवायचे आणि कमावत राहायचे दडपण असते का? ह्या विषयावर प्रतिसाद लिहिते. मग तिथे ही चर्चा सुरु होईल.
मला वाटतं हो. पुरुषांवर
मला वाटतं हो. पुरुषांवर कमावण्याचे दडपण असतेच. किंबहुना किती कमावतो ह्यावरूनच पुरुषांचे कर्तृत्व मोजले जाते. हे अतिषय अन्याय्य आहे हे मान्य करावेच लागेल.
प्रत्येकाने - स्त्री अथवा पुरुष, स्वतः ची आर्थिक जबाबदारी उचलायला हवी. परंतु तसे होत नाही. आपल्या समाजात पुरुष कमावणारे आणि स्त्रीया घर - मुले सांभाळणार्या अशी विभागणी पडून गेली आहे. ही विभागणी हल्ली थोडी शिथील होताना दिसते आहे. थोडी या साठी म्हणेन कारण स्त्रीया कमावू लागलेल्या आहेत. परंतु त्यांच्यामागचे घर - मुले हे व्याप अजूनही तसेच आहेत. त्यामुळेच जरी स्त्रीया कमवत असल्या, तरी त्यांच्याकडून कमावण्याची सरसकट अपेक्षा नसते. स्त्रीयांची कमाई ही अजूनही बहुतेक घरांमध्यी 'पुरुषाला आधार' अशीच बघीतली जाते. जोवर पुरुष स्त्रीयांच्या बरोबरीने घरचे व्याप सांभाळत नाहीत, तोवर हे असेच राहील असे दिसते.
त्यामुळेच जसं स्त्रीयांकडून घरकामाची अपेक्षा करणे अन्याय्य आहे, तसंच पुरुषांकडून कमावण्याची अपेक्षा अन्याय्यच म्हणावी लागेल.
जोवर पुरुष स्त्रीयांच्या
जोवर पुरुष स्त्रीयांच्या बरोबरीने घरचे व्याप सांभाळत नाहीत, तोवर हे असेच राहील असे दिसते.
>>>>
हा मुद्दा योग्य आहे.
पण या समानतेला समाजमान्यताही हवी. तरच हे सामाजिक दडपण नाहीसे होईल्.
मला अजून एका पैलूवर प्रकाश
मला अजून एका पैलूवर प्रकाश टाकावासा वाटतो.पुरुष असो वा स्त्री,लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कमावण्याचे दडपणसुद्धा जास्त आहे.याला कारणे शिक्षणाचा भरमसाठ खर्च,पालकांची मानसिकता, दृष्टिकोन, स्वतःकडून अपेक्षा,प्रतिष्ठेच्या कल्पना, चंगळवाद,महागाई, गरजेच्या वस्तूंमध्ये वाढ इ. इ.आणि अनेक आर्थिक, सामाजिक कारणे असू शकतात.मी स्वतः अशा दडपणातून गेले आहे, जाते आहे. काही जणांना आपल्या श्रीमंतीचे आपल्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील लोकांसमोर प्रदर्शन करण्याची खूप सवय असते.त्यामुळे मीही लवकरात लवकर जास्त कमावले पाहिजे. म्हणजे मी अमुक वस्तू घेईन, तमुक वस्तू घेईन असे स्वतः ला वाटून खूप दडपण येते(अर्थात हा वैयक्तिक अनुभव आहे)
मी किमान स्वतःच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीच्या बरोबरीने असावे ही अपेक्षा असतेच स्वतः कडून. आणि हल्ली सेटल झाल्याशिवाय लग्न करत नाहीत. हेही एक कारण आहे या दडपणामागे.
हा धागा, ह्या प्रतिक्रिया...
हा धागा, ह्या प्रतिक्रिया... एक वर्ष झालं तरी मेमरेबल आहेत काही काही प्रतिक्रिया...
(No subject)
काही जणांना आपल्या श्रीमंतीचे
काही जणांना आपल्या श्रीमंतीचे आपल्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील लोकांसमोर प्रदर्शन करण्याची खूप सवय असते.त्यामुळे मीही लवकरात लवकर जास्त कमावले पाहिजे. म्हणजे मी अमुक वस्तू घेईन, तमुक वस्तू घेईन असे स्वतः ला वाटून खूप दडपण येते>>>+१
हा धागा चक्क सेंसीबल आहे. कमावण्याचे दडपण पुरूषांवर जास्त असते असे माझे निरीक्षण आहे.. काही मैत्रिणी, कझीन बहीणी शिकून सवरून घरची अडचण नसून ही होम मेकर असणे पसंत करतात, तसे भावा, मित्रांचे नाही. १ ही केस माहितीत नाही.
या उलट ऑफिस मधे फिलिपिनो स्त्री आहे ती कर्तुत्ववान आहे, पती होम मेकर आहे आणि ती म्हणते की हे फार कॉमन चित्र आहे त्यांच्या देशात. असे असून ही पती बाजारहाट, स्वैपाक ह्यात म्हणावा तसा हातभार लावत नाही. बाजारात गेला की सिगारेट वर जास्त खर्च करतो, त्यामुळे तिला दोन्ही जबाबदार्या पार पाडाव्या लागतात
Pages