इंग्रजी गाण्यांची आवड

Submitted by सामो on 29 October, 2019 - 13:54

* ज्योतिषाचे काही उल्लेख आलेले आहेत. ज्यांना त्या विषयात, रस नसेल, त्यांनी ते उल्लेख टाळून बाकी वाचावे व मुख्य म्हणजे धाग्याची गाडी फक्त त्या तीळभर ज्योतिषावरती डिरेल करु नये.
________________________________________________________________
परदेशी स्थाईक होण्याची संधी मिळाल्यामुळे, जशा खूप नातेवाईक, सण,देवळे,पदार्थ, मराठी/हिंदी गाणी अशा आयुष्यातील नानाविध उत्तमोत्तम गोष्टींना मुकले, तश्याच अनेक गोष्टी साध्यही करू शकले. क्षितिजे कशी किती विस्तारली याचा आढावा घेते तेव्हा सर्वात मानाचे स्थान मिळते ते गाण्यांना. भारत सोडला नसता तर इंग्रजी गाण्यांकडे ढुंकुनही पाहिले नसते. कारण कम्फ़र्ट झोन (आश्वस्त परीघ) सोडावासा वाटलाच नसता. मोटिव्हेशनच मिळाले नसते. अमेरिकेत आले तेच अचानक आले. १० दिवसात गाशा गुंडाळला व भारतातून इकडे प्रयाण केले.सीडी /कॅसेट्स घ्यायला ना वेळ मिळाला ना आठवण झाली इतकी घाईगर्दीत आले. एका महिन्याने नवरा व मुलगी आले. पण नव्या नोकरीच्या धामधुमीत त्यांना सांगायलाच वेळ मिळाला नाही की सीडी आणा.
.
नव्यानव्या नोकरीला, रहाणीला, नवलाईला हळूहळू सरावत होतो. घरात अतिशय तुटपुंजे सामान होते .टीव्ही सोडाच पलंग ही नव्हता पण नव्या देशाची, नवलाईची जाम मजा वाटायची. कशाची कमी वाटत नव्हती. आता आठवलं की फार मजा वाटते - आम्ही रात्री Candle light मध्ये रमी खेळायचो. भोवती ३-४ सुगंधी मेणबत्त्या लावून आणि दिवे घालवून. का तर भारतात सुगंधी मेणबत्त्या मी तरी तेव्हा पाहील्या नव्हत्या. सुगंधी मेणबत्त्या ही अपूर्वाई होती. संध्याकाळी मी घरी आले की, फिरायला जायचो, खूप चालायचो कारण टीव्ही नव्हता की कार नव्हती. चिनो/आँटॅरिओ (कॅलिफोर्निया) प्रदुषणही नव्हते. हळूहळू २ दरवाज्याची कार घेतली. पहिल्यांदा तर GPS माहीतच नव्हता. हातात कागदी नकाशा घेउन चक्कर मारायचो. त्या स्वस्तातील स्वस्त्/सेकंडहॅन्ड कारमध्येही बिल्ट इन रेडिओ आला. ज्यावर अर्थात स्थानिक स्टेशन्स / इंग्रजी गाणी लागायची. मग मात्र हिंदी/मराठी गाण्यांची कमतरता भासू लागली. विशेषतः मला. कारण इंग्रजी गाणी फार कर्कश्य वाटत.
.
काही दिवस असेच गाण्यांच्या विरहात /कमतरतेत गेले, मग लवकरच माझ्या लक्षात आले की कमतरता आहे म्हणून हातावर हात धरून बसण्यात point नाही. गाण्यांशिवाय भकासपणा येईल. मग विचार केला इंग्रजी गाणी नाही आवडत हे चोचले ठेवायचेच नाहीत. मुद्दाम त्या गाण्यांची taste Develop करायची. इंग्रजी गाण्यांनी डोकं उठतं म्हणुन नावं ठेवत बसलो तर आपल्यालाच त्रास होणार. त्यापेक्षा इथे जी गाणी मिळतात ती ऐकायची, आवडून घ्यायची. When in Rome... वगैरे वगैरे. पॉप संगीत ऐकता ऐकता आणि बळजबरीने आवडून घेता घेता, कल्पना सुचली की इथेही मृदू (mellow) प्रेमगीते/लोकगीते असतील की. ती का ऐकू नयेत? मग आठवले की आपणही किंचित प्रमाणात का होईना इंग्रजी गाण्यांना expose झालेलो आहोत -
.
हॉस्टेलवरती ऐकलेले brian hyland यांचे Itsy Bitsy Teeny Weeny Yellow Polkadot Bikini आपण हॉस्टेलवरती तासंतास, तबकडी परत परत लावुन ऐकले आहे. या गाण्यातील मिष्किलपणाने आपल्याला अतिशय भुरळ घातलेली आहे. हॉस्टेलवरती एका रात्री खोलीत जागुन, रेडीओवरती Clif Richard यांचे Summer Holiday ऐकले आहे. या गाण्याच्या फ्रेशनेस मुळे आपल्याला फार आवडले होते. परत कधीच ऐकायला मिळालेले. हां नाही म्हणायला शेजारचा टीन एज मुलगा सकाळ संध्याकाळ लावायचा ते Walk Like An Egyptian गाणं सारखं कानावरती आदळत असे. पण यापलिकडे इंग्रजी गाण्याची दुनिया आपण पाहीलीच नाहीये. आणि आपल्याला या दुनियेत initiate करेल असं कोणीही नाही. नवर्‍याला मात्र इंग्रजी गाणी आवडायची/आवडतात. पण त्याची आवड किंचित वेगळी आहे. त्याला दे दणादण /ढाणढाण संगीत आवडते तर आपल्याला एकदम mellow तरी किंवा अर्थपूर्ण तरी, निदान एक गुणावशेष गाण्यात लागतो.
मग एक काम केले - UK/USA चार्टसवरती दशकातली/ त्या त्या वर्षातली अशी टॉप टॉप गाणी शोधू लागले. ऐकल्यावर श्ब्द समजले नाहीत तर (९९% वेळा) लिरिक्स शोधून शोधून ऐकू लागले. कवितांची आवड होतीच तिचाही किंचित उपयोग झाला. पक्क्या कर्क राशीच्या स्वभावानुसार जमविण्याचा छंद लागला. म्हणजे, गाणे ऐकले/विसरले असे नाही. ते टिपून ठेवा. मग मात्र गाणी एकामागोमाग सापडतच गेली. नेटची, याहू, गुगलची कृपा.
.
गाण्यांचा क्रम तर आठवत नाही. पण जशी सुचेल तशी देते. मुलगी ३ वर्षाची होती , तिने एकदा शाळेतून स्काऊटचे एक कविता/गाणे आणले - Kumbaya. त्यातील तत्त्वज्ञान पटकन आवडून गेले. आणि मग हे गाणे शोधले असता काही क्लिप्स मिळाल्या. सगळ्या ऐकल्या. बर्‍याच हौशी गायकांच्या होत्या व फार सुरील्या नव्हत्या. पण एक क्लिप सापडली carole alston या गायिकेने गायलेली. Kumbaya गाणे. या गायिकेच्या साईटवर तिच्या आवाजाचे वर्णन केलेल आहे - "....a voice as dark and sweet as molasses". तंतोतंत खरे आहे. वाढत जाणार्‍या ड्रम्बीटस चा ठेका देखील एकदम आवडून गेला. गायिकेचा चढत जाणारा आवाज व वेगवान होत जाणारे ड्रम्बीटस, चुटक्या/टाळ्या. मग तिची अनेक गाणी ऐकली, एकेका लिंकवरुन ऊडी मारत अन्य आफ्रिकन गायिकांची गाणी Gospel Music ऐकले. तेव्हा Gospel music ची ओळख झाली. आजही सीडी च्या दुकानात या सेक्शनपाशी पावले रेंगाळतात. पुढे Elvis Presley ची या जॉनरमधली गाणी ऐकली. पैकी माझे सर्वात आवडते - Who Am I अतिशय शांतीचा अनुभव येतो हे गाणं ऐकताना. एल्व्हिस यांचेच In my father's house अतिशय सुमधुर गाणे आहे. अर्थही इतका सुंदर आहे. पण हेच गाणं अन्य एका गायकाने गायलेले In my father's house तितकेच सुंदर आहे. हे गाणे कितीदा ऐकले तरी मन भरत नाही. बाकी Elvis Presley यांचा जवाब नाहीच. ते कदाचित Rock and roll करता प्रसिद्ध असतीलही पण मला त्यांचे Gospel Music च सर्वाधिक आवडते - शांत, उन्माद नसलेले.
Mormon लोकांचे Latter_Day_Saint संगीत ऐकताना, I Heard Him Come-Afterglow हे गाणे ऐकले, नंतर झोपायच्या आधी खूप दिवस तेच गाणे ऐकायचे. एका कुष्ठ रोग्याने पहील्यांदा जिजझ क्राइस्ट यांना पाहीले व त्याला काय वाटले ते वर्णन करणारे खूप उत्कट गाणे आहे.
.
नंतर केव्हातरी Country music ची ओळख झाली. निदान मी पहील्यांदा ओढले गेले ते Johnny Cash यांच्या पत्नी June Carter Cash यांनी लिहीलेल्या आणि Johnny Cash यांनी गायलेल्या Ring of Fire या गाण्याने.

Love is a burning thing
And it makes a fiery ring.
Bound by wild desire
I fell into a ring of fire.
.
I fell into a burning ring of fire,
I went down, down, down and the flames went higher
And it burns, burns, burns,
The ring of fire, the ring of fire.

अशा प्रकारे सुरुवात आहे या गाण्याची आणि मग अधिकाधिक रंगत जाते.

The taste of love is sweet
When hearts like ours meet.
I fell for you like a child,
Oh, but the fire went wild.

ओह माय गॉड!! या गाण्यात मला जे प्रेमाबद्दल वाटतं ते शब्दात सापडले, शब्द मिळाले. येस्स हीच प्रेमाची व्याख्या. त्यातला स्ट्रेट फॉर्वर्डपणा तशीच लहान मुलांच्या प्रकृतीतील निष्कपटता. वृश्चिक आणि धनुच्या कुंपणावर बसून तळ्यात की मळ्यात करणार्‍या माझ्या शुक्राला हे फायरी, स्ट्रेट्फॉर्वर्ड, पॅशनेट गाणे न आवडते तरच नवल होते. नंतर हृदयातील सर्वोच्च गायकाचा मान कोणीच घेऊ शकलं नाही. हे गाणं, जॉनी कॅश हे गायक - हेच्च! मग अनेक आले गेले. Frank Sinatra यांना कमी अज्जिबात लेखायचे नाही. त्यांच्या रसिकांच्या मनावर त्यांनी एक काळ अधिराज्य केलच पण "रिंग ऑफ फायर" ची सर कशालाच ना आली ना येणार. जॉनी कॅश यांची अन्य २ सुंदर गाणी ऐकण्यात आली - I walk the line आणि When I first saw your face. पैकी पहीले गाणे अवीट आहेच पण दुसरेही तितकेच मंत्रमुग्ध करणार आहे. स्पेशली दुसर्‍या क्लिपमधील कॅश आनि जून यांचे फोटो. जॉनी कॅश यांची कुंडली शोधून काढली - जॉनी कॅश - मीन सूर्य्/वृश्चिक चंद्र, जुन - सूर्य कर्क. नो वंडर! नो वंडर! ते एक असोच. : )
................. मिपावरील लेख
.
फ्रॅन्क सिनात्रा यांच्या आवाजातील तारुण्य, उत्साह जर कोणी टिपले नाही तरच नवल. त्यांची खूप खूप गाणी ऐकली. You make me feel so young मधील उत्साह्/तारुण्याचा unmistakable वसंत. वा!
Rupert Holmes यांचे Pinacolada हे माझे व नवर्‍याचे अतोनात आवडते गाणे. हे लागलं की आम्ही एकमेकांना कोपर मारतो कारण शोधायला गाणे जरुर ऐका. घासून वापरुन जुने झालेले लग्न आणि त्यातून दोघांनी आपल्यापुरता शोधलेली escape (सुटका) याबद्दलचे अतिशय मिष्किल गाणे. चिरतरुण! ज्या गाण्यांबद्दल मला काही एक जिव्हाळा वाटतो ते गाणे. ; )
नंतर एक गाणे खूप शोधून सापडलेले - Moonstruck या सिनेमातील, Dean Martin या गायकाने गायलेले - That's amore किती गोड, रोमॅन्टिक. अंगावर काटा आणणारे. अजुन एक आवाज अत्यंत मादक्/नशीला असणारी गायिका - Julie London. या गायिकेची गाणीही अशीच अपघाताने सापडली व मनात जाऊन बसली. You go to my head

You go to my head
And you linger like a haunting refrain
And I find you spinning round in my brain
Like the bubbles in a glass of champagne

खरच मद्य पितोय असे वाटावे असा आवाज.
.
अजुन एक गायक आवडतात ते Tony Bennett त्यांचे Fly me to the moon हे गाणे श्रेष्ठच. "Fly" शब्दावर घेतलेली लकेर. या गाण्यात २ चित्रे आहेत एक कवि काय म्हणतो ते अतिशय उपमा व काव्याने ओतप्रोत आणि दुसरे त्याच्या व्यवहारी प्रेयसीसाठी कविने केलेल भाषांतर. दोन्ही मूडस इतके सुंदर पकडले आहेत.
.
अजुनही नवी गाणी सापडत आहेत. थ्रिल वाटते, काळजाचा ठोका चुकतो. प्रवास चालूच आहे.

- तूर्तास समाप्त -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रुनो मार्सचं लेझी साँग मुलामुळे ऐकलं आणि आवडलं! इंग्लिश गाणी ऐकायची आवडंही त्याच्याचमुळे लागली.
ही माझी काही आवडती गाणी;:
Fallulah's Perfect tense : https://youtu.be/3dZXxw86Eeo बॅकपॅक घ्यावी आणि निघावं असं वाटतं हे ऐकल्यावर. Happy

Taylor swift चं हे एक खट्याळ गाणं : https://youtu.be/ErsqgI5Aavk

Ed Sheeran चं हे एक मस्त गाणं: https://youtu.be/eUSlaQi5Xhs

फेमस singers ची गाणी नेहमीच ऐकली जातात पण मी इथे ऑफ़बीट गायकांची गाजलेली, व्यवसायिक रित्या फेमस नसलेली तरी खूप आवडलेली गाणी देईन एकेक.

मला ते hallelujah खूप आवडते. गाणं तसं फेमस आहे अनेकानेक गायकांनी गायले आहे, Shrek मध्ये सुद्धा होते. पण मला फक्त आणि फक्त Rufus Wainwright ने गायलेलेच version आवडते.

Video खालच्या कमेंट्स पण एकदा जरूर डोळ्याखालून घाला.

क्या बात है!!! माझ्याकडे हालेलुइया ची सगळी व्हर्शन्स आहेत बॉन जोव्ही तर आहेच. व्याकुळ करतं ते गाणं.

Hallelujah - Alexandra Burke - https://www.youtube.com/watch?v=qSgsW9GLerA&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

K.D. Lang sings Leonard Cohen's Hallelujah - https://www.youtube.com/watch?v=P_NpxTWbovE&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

Hannah Trigwell - Hallelujah - Legendado - https://www.youtube.com/watch?v=-qVPu6Xm9Ic&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

Bon Jovi - Hallelujah - https://www.youtube.com/watch?v=RSJbYWPEaxw&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

Jeff Buckley - Hallelujah (Official Video) - https://www.youtube.com/watch?v=y8AWFf7EAc4&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...

Leonard Cohen - Hallelujah (Live In London) - https://www.youtube.com/watch?v=YrLk4vdY28Q

8 yr old Rhema sings Hallelujah..heart stopping - https://www.youtube.com/watch?v=VoBW57t1Mvs ......................................... नॅह!!!! लहान मुलांच्या तोंडात नाही शोभत.

Hallelujah Rufus Wainwright - चे ऐकते आहे.
पण मला सगळी व्हर्शन्स आवडतात. लिओनार्डो चा प्लूटो कर्केचा होता का चवथ्या घरात होता. मी ते गाणं ऐकल्यावर आधी त्याचा प्लूटो शोधला.
____________
हाना ट्रिगवेल अन जेफ बक्ले यांचे व्हर्शन मला फारसे आवडले नाही पण के डी लँग चे आवडते. बॉन जोव्ही चे सर्वात आवडते. अलेक्झान्ड्रा बुर्के चे ओके ओके.
__________
त्या गाण्याच्या वाटेला मी क्वचितच जाते कारण माझा मूड फार डार्क करतं ते गाणं.

Pages