http://surajponkshe.blogspot.com/2019/10/blog-post_28.html
छायाचित्रण ... मला उमजलेले...
तसा मी छायाचित्रणात नवखा आहे आणि नवखाच राहणारे.. पण काही विचार आणि छायाचित्रण यांचा मेळ बसतो आणि तो आविष्कार मला भावतो.
तस छायाचित्रणात मी अनेक दिवस छोटया मोठ्या गोष्टी करतोय, पण आज हा छोटा विचार मांडावासा वाटला.
आज अंगणात उभे राहून नारळाच्या झाडाचा minimalistic फोटो काढला. आणि विचारचक्र चालू झाले.
आम्ही जेव्हा आत्ताच्या घरी राहायला आलो, त्यावेळी आसपास गर्द झाडी होती. घरासमोरच अशोकाची बारा तेरा झाडे, एक जांभूळ, बाजूचे दोन आंबे, समोर ऐनाचे एक झाड... एवढी झाडे आहेत असे लक्षात पण नाही यायचे त्या वेळी..
आणि आज अंगणातून हा फोटो सहज निघतोय,
या माडाशिवाय दुसरे काही उरले नाही आकाशात...
आणि अंगणात सुद्धा पातेऱ्याचे पानोनिशाण नाही उरले...
गच्चीत घालावी लागणारी वाळवणे अंगणात आली ..
मोठा बदल छोटया पावलांनी अनेक वर्ष येत राहिला आणि मोठा होऊन बसला..
फोटो
फोटो तुमच्या ब्लॉगवरून

फोटोग्राफरने मूळ विषयाशी
चांगला प्रयत्न.
फोटोग्राफरने विषयाशी अलिप्त राहिले पाहिजे आणि मूळ विषयावर इतरांना विचार करायला लावला पाहिजे.
हा जगप्रसिद्ध फोटो बघा, ताण असह्य झाल्याने त्या फोटोग्राफरने नंतर आत्महत्या केली.