Leading From the Front

Submitted by सतीश कुमार on 16 October, 2019 - 01:04

Leading From the Front

मी, पक्या, म्हेश आन सदू नऊचा पिक्चर सुरु जाल्यावर पंदरा मिंट संपली तशी म्होरल्या नानाच्या टपरीत घुसलो आन चा मागवला. नानाच्या टपरीत आत मंदी आमची पेशल जागा व्हती.

" लई न्यारं रे बाबा " पक्या बोलला, " शंबरचं दोन्श्याला इकला आपून अाख्खं बंडल….पूर्ण बुकिंग खल्लास.. आपला हीरो देवानंद…काला बाजार…. सकाळीच चौकीत हप्ता देऊन आल्तो म्हून वाघमाऱ्या फिराकलाच न्हाई".

"कसं फिरकल अक्खा सात दिसाचा मलिदा भेटल्यावर," सदू म्हणला, " नवी बुलट घितली वाघानं.. डागss डागss डागss डाग आवाज काढीत सुसाट फिरतुया आन ते बी आपुन म्हात्मा गांदीचं बंडल देतो म्हूंन…"

" नेते हो," म्हेश भाशन देत्यात तसल्या आवाजात बोलाय लागला, " माज्या मालकांस्नी समजलं की मी आरधी बुकिंग तुमास्नी देतो आंन हौसफुल्लचा बोर्ड लावतो तर माजी नोक्री बी जाईल आनी बा बी गावाकड चल म्हणल."

" खरं हाय राव," पक्या बोलला, " म्हेश टीकाट देतूय म्हनूनश्यान आपलं धंदा तेजीत हाय..नायतर लै कुटाना व्हता… हाफ टिकिट जालं असतं किशोरकुमारचं …काय लीडर..?" माज्याकडं नजर करून त्यानं इचारलं.

" साची वात छे " मी जवाब दिला, " पन येक गोस्ट तुझ्या टक्कुऱ्यात घुसली न्हाई अजून…."

" माज्या टक्कुऱ्यात? आरारा काय बोलतो लीडर, " पक्या बोलला," कालच्याला हेर कटिंगच्या टप्रीत डोस्क भादरून अालुया आन तू बोलतो डोस्क्यात येंट्री व्हत न्हाई? माज्या डोस्क्या वर नो येन्ट्री चा बोरड दिस्ला का काय तुला?"

सदू आन म्हेश माज्याकडं बगु लागली.

" व्हय, डोक्यात मेंदू म्हणत्यात ते हाय काय आत मंदी तुज्या," मी सवाल केला, " बोल आपल्या गँगमदी किती टाळकी हायत?"

" मी, तू, सदुभाऊ, म्हेश मनजी महेश, नाना आन हऱ्या मंजी हरीश".

" हां, इसका मतलब हम सब छे लोग है, और…."

" हम सब उस्ताद है " …मला मदीच तोडत पक्या बोलला. सदू आन म्हेश हसाय लागले.

" वो छोड़, और पहले मेरी बात ध्यान से सुन. हम छे लोग है और समझ के हम सबको मिलकर जब सौ रुपए मिलते है तो हमारा सबका हिस्सा और महेशका हिस्सा कितना होता है ये बात तुझे मालूम है?"

" मंजी काय, मेरा गणित क्या कच्चा वाटलं व्हय लीडर, म्हेश ईस रुपये घेतो आन अपुन बाकि के टाळकी सोला सोला रुपए लेता…. सोलवां साल…."

" हां, हम महेश को ज्यादा हिस्सा इसलिए देते है ताकि वो हमें बिना तकलीफ टिकट दे." मी बोललो, " म्हूनश्यान तो हम लोगोंको पूर्ण बुकिंग देतो."

" आर खरं हाय कि गड्या, मै तो राज कपूर बाण गया अनाड़ी…. हम लोग. त्यो अशोककुमार बी असच म्हनतो हम लोग. मी इसरलोच. मंग काय, म्हेशला द्यायलाच पायजे ई स रुपये पन मला अजुनपन येक समजला न्हाई"..

" काय ? काय समजला न्हाई?"

" तू म्हराटी बोलती तवा गावरान… गंवार बोलती आन हिंदी बोलती तवा सुद्ध हिंदी बोलती, ते कस काय? "

" अपली रास्ट्रबाशा हाय हिंदी आन म्होरल्या मानसाला पटवुन द्यायाचं अासल तर रास्ट्रबाशेत बोललं की लगोलग पटून जातं " सदू बोलला, " काय लीडर..बराबर ना?"
" व्हय, खरं हाय ते," मी हसलो.

नानानं चा आन खारी आनली आन महेश बोलला, " आरं, हऱ्या न्है आया अबितक, बच्चोंका पेमेंट झाला असल अत्ता पातूर. इतना टेम न्हाई लागाय पायजे."

" आरं यील त्यो .. आपलं चा सपायला आन हऱ्या यायला एक गाठ पडल. बग तू." सदू बोलला.

आमी चा च्या कोपात खारी बुडवली आन कप व्हटाला लावला.
चा चा कप टेबलवर ठीवत व्हतो त्याचा टायमाला डूंगा आत मंदी शिरला, " लीडर, " तो धापा टाकत बोलला, " हऱ्याला खोटा वकीलनं गोली मारी. भेजेमे. लै खून निकला है. बच्चे त्याला घेऊन गेलेत दवापानी के वास्ते धेसपांडी के दवाखान्यात."

आमी सगल्यानी येकमेकाकड बगीतला. पक्या दाणकन हुटला " ये खोटा वकील को मै सोडनार न्हाय," पक्या लाल जाला. त्येच्या मामाचा मुलगा व्हता हऱ्या. "अता रातच्याला त्याचं जलवा करनार मी गेलार्ड मदी ."

" लीडर, वो लोग इधरीच याय लगलेत." डुंगा फुडं बोलला, " अपुन इधर बसतो त्ये तेनला ठाव हाय."

भाईर गलका जाला आन दुसऱ्या मिंटला दार ढकल जाली आन खोटा वकील, हमीद, सोराब, वासुदेव, अलबर्ट आन करीम आत मंदी घुसले. करिमच्या हातामंदी बॅट व्हती.

" महेश," खोटा वकील महेशकड बगुन बोलाय लागला, " अब ये सिक्सर मैने मारा है. अब ये इलाका मेरा है और पूरी बुकिंग कल्से मै ले रिया , समझे क्या?"

महेश माज्याकड बगाय लागला. त्याच टायमाला पक्यानं वकीलची गचांडी धरली, आन करीमनं पक्याच्या पायावर बॅट मारली. पक्या विवलाय लागला तसा सदूनं तेरी मां का….. तू बेटा असं म्हनत करिमला जोरात भिंतीवर धकाल्ला आन बॅट हिसाकली आन लगीचच हमीदच्या पोटात बॅटची हेंडल घुसावली. वासुदेवनं डुंगा ला ठोसा लगावला आन लगेच अल्बर्टनं सदूला खाली पाडला. "

" चूप रियो सब" खोटा वकील वरडला आन पाइंट आडतीस माज्या भेजावर टेकवली. " ऐं! मेको बोलते तो सरी, अपन इस लीडर को बी पीरायवेट में भरती करवा देते .. जबरन. इसके हरिया के सात सात…इसको बी हिट विकेट करवा देता रया में…

खोलितला धुमशान येक्दम बंद जालं.

" ना रेगा बांस ना बजेगी भांसरी…." वकील माज्या मागं आला, " बेठ कुर्सी पे, और हात पिचू की ओर ले," त्यो बोलला. मंग सदुला म्हनला " औे मेरी बैट टूटी तो समज की तू एलबीडबलु हो गया."

मी बसलो. वकीलनं माज्या मानंवर आडतीसची नळी टेकवली आन लै जोरात हसाय लागला. मग म्हनला, "ओ बई !! इनका मुंडा कैसा पिलापट्ट पड़ गया। ऐसी बिमारी तो कंई नी देखी. "

पक्या आन सदू गपगार व्हते. माज्याकड बगत व्हते. " छोड लीडर को," सदू बोलला," वैसे बी तू दफा तीनसौ दो मे गल्यामंदी दोरी बांदयला जानार हाईस."

" और सुनो इसकी," वकील बोलला, " भोत् बडे सूरमा की… अबे विटनेस मांगता है कोरट का जज … बाउन्सर डालता क्या? तूने देका मेरेकु गोली मारते…? तीन सौ दो क्या? उसके पैले मई तेरेकु चार सो दो लगाता…हा हा हा…मेरे से सौ ज्यादा… तेरे दो हाथोंपे दो गोली, दो टांग पे दो गोली, होगिया चार, मुंह में एक गोली, मुंह गोल है इसकी वास्ते सिफर गिंता मै, और बाकी बचे दो, वो तेरे टांगके बीचमे दो गोटियां लटक री है उसके वास्ते…. होगया ना चार्सो दो….. हाहाहाहा…."

सदू रागान लाल पीला जाला व्हता. त्येच्या कप्पाळ ची नस उडत व्हती. " मई बोलतो कोर्टात तूने गोळी मारली म्हून. वागमाऱ्याला मी बोलतो ..तू जानार…" सदू रागान बोलला.

" वैसे भी जानेवाला है तो और एक टपकाता हूं, तेरे पीयारे लीडर को, भोत दिलीप कुमार बन रेला है. बोल्ड करता मै उसकु. अच्छा… चलो टपकाएंगे न्ही पर ऐसा गोलि मारेंगे के सिटी स्किन करई पडे?? फिर हमारे इंदुरके श्रीवास्तव साब को बता लो। एक नंबर डॉक्टर हे। अपने हमीदको वंई दिखया था.. भलेई सूझ संपट नी पड़े पर गुलुप की लाइट मे एक्स रे फिलिम तो ऐसे देखते है जैसे इनके बाऊजी की वसीयत देख रे हों…है ना हमीद?" वकील हमीदला म्हनला. " बॉटल ऐसे चढ़ीई, भोत तेज चल री होती है, इत्ती इसपिड होती है की दस दिन्मे हमीद टन-टनाट हो गया… क्यों की नर्स सब केरला की रेती है… ध्यान रखना भोत चत्री रेती है.…. तू फिकर मत कर लीडर… तू बी दस दिन मे टन-टनाट हो रिगा…. काम हो तो फोन कर लेना।टिफिन पोचंउ क्या? हुआ तो शाम को आता रूंगा…. हालचाल पुचने…."

तेवढ्यात नाना चा घिऊन आला. पिलेटमदी बिस्कुट बी व्हते.

" हा करीम, " वकील बोलला, " लीडर को चाय पिनेदे गोली खानेके पेले…इसका हात छुडा…" करीमनं माजा हात ढीला केला.

" हा बोल दिलीप कुमार, क्या सोचा?"

मी हात वर अन् खाली केले. लै रग लागली व्हती. " चा बिस्कुट खा लो पहले वकील भाई ," मी बोललो, " देखो आप भी ब्लैक करते, हम भी ब्लेक करते, इस हिसाब से हम दोनोंका धंदा एक ही है। धंदेमे अपना रिश्ता भाई भाई का हो गया। फिर झगड़ा किस बात का? मै ये कहना चाहता हूं कि आप अपना विभाग संभालो मै अपना विभाग देखता हूं। आजतक तुम्हारे किसी भी बच्चे पर मैंने हाथ नहीं उठाया। सदुभाऊ को पूछो आपके बच्चे महेशको धमकाते है और यहां आकर ब्लेक करते है। फिर भी मैंने मेरे बच्चोसे कहा कि आपके बच्चों से बदसलूकी ना करे। इसके बावजूद आपने हरीश पर गोली ताक दी और बेचारा घंटे गिन रहा है। इससे दुश्मनी और बढेगी और उसका अंत उसी दिन होगा जिस दिन आप मरेंगे या मै स्वर्गवासी हो जाऊंगा। मै जाऊंगा तो मेरा इलाका आपका होगा और आप मारे जाओगे तो आपका इलाका मेरा। पुलिस को यही चाहिए कि हम आपस में लडे और मरे, और वो मलाई खाए। वाघमारे आपसे भी पैसा लेता और मेरेसे भी। मै ये प्रस्ताव रखता हूं कि हम एकसाथ मिलकर काम करें तो पुलिस का एक हफ्ता तो बच जाएगा "।

मी पानी प्यायसाठी थांबलो. वकील ऐकत व्हता मी काय सांगत व्हतो ते. मंग तो सोराबला म्हनला," केम लागे छे एनी वात? विचार करवू छे एना पर?"

" जराय ना भाई. एम तो बहु पहुचेलो माणस छे. एनो भरोसो ना कराय. बहू भणेलो छे. प्रोफेसर हतो पहेला अने डॉक्टरेट करी छे, खबर?… पीएचडी… एटले संभाळीने वात करजो…."

वकीलनं माज्याकड बगितला. मंग वासुदेवकड बगितला. " एन माड बेका वासुदेवा, नी येन अंती? व्हडीबेका येनु बीडबेका?"

" बीट्ट बिडप्पा. सोराब येन अंतान केळबेडा. इबरू कुडी केलसा माडोणू अंत हेळ." वासुदेव म्हनला.

जराभर येळ गेला. मग " व्वा दिलीपकुमार," वकील म्हनला, " अबी तेरे भेजेको पंक्चर करदू तो तू सचमुच का पीएचडी मतलब परमानेंट हेड डैमेज बन जाएगा…. हाहाहा….केने का मतलब ये पड़ रिया है कि अपन अस्पताल मे मरिजसे मिलने जाते हैं तो भोत बार बे-जबरन की बात और इत्ता ग्यान पेल देते है कि बीमार नी मरे तो मर जाये…है ना सदुभाव…." वकील सदुला बोलला आन अाडतीसची नळी बराबर मा ज्या दोनी डोल्याच्या मदी टेकवली.

अपूर्ण.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults