जुने हितगुज नाहीसे झाले?
Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
48
मायबोली ॲडमिन यांच्या एखाद्या
मायबोली ॲडमिन यांच्या एखाद्या धाग्यावर विचारले किंवा विपु केली तर लवकर उत्तर मिळेल बहुतेक. हा धागा मागे पडलाय खूप.
मुकुंद,
मुकुंद,
कस्काय? कित्ती दिवसांनी दिसलात.
जुन्या हितगुज बद्दल काही कल्पना नाही.
मी मागे त्या अद्वितीय बिलि किंग vs बॉबी रिग्ज मॅच बद्दल
एक लेख अर्धा लिहून ठेवला होता, तुम्हाला बघून तो आठवला. बघतो पूर्ण करायला जमतो का.
जुने हितगुज तांत्रिक
जुने हितगुज तांत्रिक कारणासाठी तात्पुरते काढून टाकावे लागले आहे. ते लवकरात लवकर परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. यात कुठलाही डाटा +मजकूर गेलेला नाही. ते जाणीवपूर्वक काढावे लागले आहे. जुने हितगुज २४ वर्षे जुने असलेले काही कोड वापरत होते. ते वाचनमात्र असल्याने ज्याचा आता काहि उपयोग नाही. पण Compliance च्या कारणासाठी ते जुने कोड काढून टाकणे आवश्यक झाले आहे. येत्या ८-१० दिवसात जसे जसे भाग संपादित होतील तसे तसे ते परत यावे असे प्रयत्न चालू आहेत.
जिज्ञासा.. वेबमास्टरांच्या
जिज्ञासा.. वेबमास्टरांच्या विचारपुशीत विचारुन झाले होते.. पण उत्तर आले नाही म्हणुन नविन धागा उघडावा लागला...
हायझेनबर्ग... हो रे.. बरेच दिवसांनी आलो. अजुनही तुझ्यासारखे जुने मायबोलिकर मित्र इथे आहेत हे बघुन बरे वाटते. गेली ५-६ वर्षे माझा मुलगा जो कंपॅटिटीव्ह स्विमींग करतो.. त्याच्या ट्रेनींग मुळे व स्विमींग टुर्नामेंट्स मुळे बिझी आहे.
अरे पुर्ण कर मग तो लेख.. ती मॅच जर बिली जिन किंग जिंकली नसती तर वुमेन्स स्पोर्ट्स ५० वर्षे मागे गेले असते अस ती नंतर म्हणाली. रिग्स १९३९ .. ४० मधला विंबल्डन व यु एस चँपिअन होता. त्या १९७३ मधल्या मॅच ला व एन सी ए ए (कॉलेज अॅथलेटिक्स बॉडी) च्या १९७२ च्या टायटल ९ च्या रुल पास होण्याला ..आजच्या महिलांना जी बरोबरीची संधी अॅथलेटिक्स मधे मिळत आहे त्याचे श्रेय दिले जाते.
पुढे १९९२ मधे ४० वर्षाचा जिमी कॉनर्स व ३५ वर्षाची मार्टिना नव्हरातिलोव्हा मधे पण एक मॅच झाली होती.. कॉनर्स ७-५ , ६-२ असा जिंकला.
वेबमास्टर.. धन्यवाद.. आशा आहे की ते लिखाण पुन्हा बघायला मिळेल.
मुकुंद - नमस्कार! बर्याच
मुकुंद - नमस्कार! बर्याच दिवसांनी?
वेमा - धन्यवाद खुलाश्याबद्दल. काही जुने लेख तेथे आहेत आणि असंख्य bits and pieces पोस्ट्स आहेत. किमान त्यातले लेख पुन्हा अॅक्सेसिबल झाले तर कॉपी करून नवीन माबोवर नव्याने टाकता येतील. गेल्या अनेक वर्षांत नव्याने माबोवर आलेल्या लोकांना ते माहीत नसतील त्यामुळे कॉपी करून नव्याने टाकण्यात लिहीणार्यांचाही फायदा आहे.
माझा मुलगा जो कंपॅटिटीव्ह
माझा मुलगा जो कंपॅटिटीव्ह स्विमींग करतो.. त्याच्या ट्रेनींग मुळे व स्विमींग टुर्नामेंट्स मुळे बिझी आहे.>> भारीच. Apple didn't fall far from the tree.
मग आता Waterworld च्या नागरिकांनी dryland च्या नागरिकांना पळता भुई थोडी केली आहे वाटते.
कुठची स्टाइल फेवरिट आहे Waterworld च्या नागरिकांची?
ती मॅच जर बिली जिन किंग जिंकली नसती तर वुमेन्स स्पोर्ट्स ५० वर्षे मागे गेले असते अस ती नंतर म्हणाली. >> हो तिचं हे naive बोलणं चालूच होतं. पण when Billie met Bobby.. things happened....weird things.
अमोल.. कसा आहेस? तुझे सजेशन
अमोल.. कसा आहेस? तुझे सजेशन चांगले आहे जुन्या मायबोलिच्या लेखां बाबत. परत एकदा क्रिकेट बीबी वर येउन क्रिकेट बद्दल गप्पा माराव्यात असे वाटले तु सुद्धा अजुन मायबोलिवर आहेस हे बघुन
असामी, रार येतात की नाही हे माहीत नाही.
अरे हायझेनबर्ग.. अॅपल आणी ट्री वगैरे काही नाही बाबा.. लहानपणी क्रिकेट सोडुन कुठलाही खेळ खेळता आला नाही.. हो.. टेनीस व स्विमिंग बद्दल जबरदस्त कुतुहल , आकर्षण व प्रेम मात्र होते .. पण आर्थिक परिस्थीती जेम तेम असल्यामुळे टेनीस कधी शिकता आले नाही व स्विमींग शिकलो पण स्पर्धा वगैरे कधी नशीबी आल्या नाहीत.
पण माझ्या मुलाने लहानपणापासुन स्विमिंग मधे इंटरेस्ट दाखवला व म्हणुन त्याला प्रोत्साहन दिले एवढेच. तुला सांगायला आनंद होतो की सध्या तो स्टेट लेव्हलला टॉप ३ पर्यंत पोहोचला आहे.. व गंमत म्हणजे.. त्याचे फेव्हरेट व स्ट्राँग ईव्हेंट्स १०० व २०० मिटर्स बटरफ्लाय, १०० व २०० मिटर्स फ्रि स्टाइल व २०० मिटर्स इंडिव्हिज्युअल मेडले हे आहेत.. जे कोणाचे फेव्हरेट होते ते तुला ठाउकच असेल
"परत एकदा क्रिकेट बीबी वर
"परत एकदा क्रिकेट बीबी वर येउन क्रिकेट बद्दल गप्पा माराव्यात असे वाटले" - मुकुंद, आपली ओळख (प्रत्यक्ष अथवा मायबोली प्लॅटफॉर्म वरची) नाही. पण क्रिकेट धाग्यावर गप्पा मारायला येणार्यांचं स्वागत! 'सीजन ला' बरेच यशस्वी कलाकार तिथे असतात.
अरे सही मुकुंद! अभिनंदन!
अरे सही मुकुंद! अभिनंदन!
पण क्रिकेट धाग्यावर गप्पा मारायला येणार्यांचं स्वागत! 'सीजन ला' बरेच यशस्वी कलाकार तिथे असतात. >> एक्झॅक्टली. आणि एनीवे आता कायमच सीझन असतो, पण आपल्याला काय, जिया जब झूमे सीझन है!
फेरफटका.. धन्यवाद .. जरुर
फेरफटका.. धन्यवाद ..
जरुर येण्याचा प्रयत्न करतो.
वेबमास्टर... मायबोलिवरचे लिखाण पुन्हा दिसावे या तुमच्या चालु असलेल्या प्रयत्नाची ढोबळ टाइम फ्रेम कृपया तुम्ही सांगु शकाल का?
फेरफटका.. धन्यवाद .. जरुर
.
वेबमास्टर.. परत एकदा.. जुने
वेबमास्टर.. परत एकदा.. जुने हितगुज परत दिसावे.. यासाठी तुमचे जे प्रयत्न चालु आहेत.. त्याची ढोबळ टाइम फ्रेम सांगु शकाल का? प्लिज!
वेबमास्टर.. माझा प्रश्न अजुन
वेबमास्टर.. माझा प्रश्न अजुन अनुत्तरीतच आहे.
तुमच्या १६ ऑक्टोबरच्या उत्तरात तुम्ही येत्या आठ दहा दिवसात जुने हितगुज सुरु होईल असे म्हटले होते.. त्याला आता आठ आठवडे होत आलेत.
नेमस्तक... माझ्या प्रश्नाचे
नेमस्तक... माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याची तसदी घ्याल का? का जुन्या हितगुज वरचे लेखन कायमस्वरुपी नष्ट केले? मला जर माझ्या लिखाणाची कॉपी हवी असेल तर ते शक्य होउ शकेल का?
कोकणी (मालवणी )म्हणींचा धागा
कोकणी (मालवणी )म्हणींचा धागा मिळेल का जुना ?
जुने हितगुज तांत्रिक
जुने हितगुज तांत्रिक कारणासाठी तात्पुरते काढून टाकावे लागले आहे. ते लवकरात लवकर परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत>>>>>
परत आणा लवकरात लवकर.
जुन्या मायबोलिला कायमचे टाळे
जुन्या मायबोलिला कायमचे टाळे लावले आहे का? ..प्लिज कोणीतरी यावर प्रकाश टाकेल काय?
जुन्या हितगुजवरचे सगळे लिखाण
जुन्या हितगुजवरचे सगळे लिखाण चोरीला गेले असेच समजायचे का? अनेकदा विचारुन सुद्धा नेमस्तक यावर् चुप आहेत त्यामुळे असा दाट संशय येउ लागला आहे. मायबोलिची अशी अधोगती होइल असे वाटले नव्हते.
जुन्या मायबोलिवरचे लिखाण परत
जुन्या मायबोलिवरचे लिखाण परत मिळवायचे प्रयत्न अजुन चालु आहेत का? माझे जुने लिखाण हवे आहे. धन्यवाद.
प्रयत्न चालु आहेत.
प्रयत्न चालु आहेत.
मनापासुन धन्यवाद.. तुमच्या
मनापासुन धन्यवाद.. तुमच्या प्रयत्नाला यश येण्यासाठी शुभेच्छा! मी त्या फिल्डमधला नाही नाहीतर मी मदत केली असती.
असे कसे झाले?
असे कसे झाले?
मायबोलीवरचे जुन्या हितगुजमधले
मायबोलीवरचे जुन्या हितगुजमधले लेखन आपोआप नाहीसे झाले नसून , तांत्रिक कारणासाठी (compliance) तात्पुरते अप्रकाशीत केले आहे. त्यातला मजकूर सुरक्षित आहे आणि backup ही केला आहे. ते ज्या software मधून तयार झाले होते ते software आता बदलता येत नाही, ते करणारी company केंव्हाच बंद झाली . सुदैवाने मजकुराची पाने आणि ते बदलण्यासाठी लागणारे software हे वेगवेगळे असल्यामुळे आता ते software नसले तरी जतन केलेल्या पानांवर काही परिणाम नाही. ती वाचनमात्र परिस्थितीत कितीही काळ राहू शकतील. परंतू त्यामुळे जर त्या पानांवर बदल करायचे असतील तर ते पूर्वीसारखे एका झटक्यात सगळ्या पानांवर करणे शक्य नाही. आणि ती पाने तशीच ठेवली असती तर मायबोलीच्या सुरक्षेला बाधा होऊ शकते त्यामुळे त्या पानांवर बदल करणे आवश्यक झाले आहे.
हे बदल खरोखरच सुरु आहेत. आणि त्यात प्रगतीही होत आहे. पण आम्ही सुरवातीला जो कालावधी दिला होता त्यात पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल दिलगीर आहोत.
वेबमास्टर... सव्विस्तर
वेबमास्टर... सव्विस्तर खुलाश्याबद्दल धन्यवाद!
लवकरच जुने हितगुज लिखाण वाचनमात्र परिस्थितीत येउ शकेल हे ऐकुन बरे वाटले. माझ्यासारखे जे अनेक वर्षे जुन्या मायबोलितही वावरलेले आहेत ते याची साक्ष देतील की देअर इज टु मच ऑफ अ गुड कंटेंट देअर... अँड इट विल बी अ ग्रेट लॉस इफ इट इज लॉस्ट! ...
देअर इज टु मच ऑफ अ गुड कंटेंट
देअर इज टु मच ऑफ अ गुड कंटेंट देअर... अँड इट विल बी अ ग्रेट लॉस इफ इट इज लॉस्ट! >>> खरंय. मी पण जुने हितगुज परतायची वाट पाहत आहे.
वेबमास्टर... सव्विस्तर
वेबमास्टर... सव्विस्तर खुलाश्याबद्दल धन्यवाद!>>>++११११
जुने हितगुज पुन्हा प्रकाशीत
जुने हितगुज पुन्हा प्रकाशीत केले आहे. ते वाचनमात्र अवस्थेत आहे आणि तसेच राहील.
धन्यवाद वेमा!
धन्यवाद वेमा!
वेबमास्टर.... मनापासुन
वेबमास्टर.... मनापासुन धन्यवाद!
मायबोलीचा एक जुना सभासद म्हणुन मला जुन्या मायबोलिचे खुप अप्रुप आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे तिथे खुप सुंदर व दर्जेदार लिखाण आहे. ते जर आपण गमावले असते तर ते खुप वाइट झाले असते.
मला माहीत आहे की मायबोली एक दर्जेदार मराठी साइट आहे. मी जो जुन्या मायबोलिवरचे लिखाण चोरीला गेले का असा आरोप केला तसा करायला नको होता. त्याबद्दल क्षमा असावी. पण वाचकांना पुर्ण अंधारात ठेवले गेल्यामुळे मी तसे अनुमान काढले.
वेबमास्टर... पुन्हा एकदा मनापासुन आभार!
मुकुंद, तु सातत्याने केलेला
मुकुंद, तु सातत्याने केलेला पाठपुरावा बघुन माझं कुतुहुल चाळवलं गेलं आहे. जमल्यास तुझ्या लेखनाच्या लिंक्स देशील का? मी काल एक नजर टाकली पण काहि विशेष सापडलं नाहि...
Pages