उपवास

Submitted by Ravi Shenolikar on 11 October, 2019 - 10:50

रविवारी नवरात्रीतली अष्टमी होती. ठरवून उपवास केला. मी केला म्हणून सौ. ने ही केला. माझा तिला काही आग्रह नव्हता. पण तिनेही केला. अर्थात निर्जळी किंवा तत्सम भीषण उपवास नव्हे. नेहमी करतो तसा. सकाळी बटाट्याचा कीस व दूध, दुपारी दोन केळी, संध्याकाळी साबुदाणा वडे. रात्री ९ ला उपवास सोडून जेवण. संध्याकाळी देवीच्या देवळात जाऊन आलो. एकूण छान वाटले. मनात आलं, आपण आपली पचनसंस्था किती राब राब राबवतो. तिलासुद्धा विश्रांतीची गरज आहे. कदाचित आपल्या पूर्वजांनी म्हणूनच एकादशी, संकष्टी वगैरे निमित्तानी उपवासाची योजना करून ठेवली असेल. त्यामागचे शहाणपण कळायला बराच काळ गेला. आता मी ठरवले आहे की दर महिन्यात एक दिवस उपवास करायचा. अमूकच दिवस असे नाही. शक्यतो सुटीचा दिवस. शनिवार किंवा रविवार. पण बहुधा शनिवारच. बघुया कसे जमतेय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठवड्यातून एकदा म्हणजे सहसा मंगळवारी किंवा गुरुवारी माझेही दोन्ही वेळा शाकाहारी खाणे होते. साधासाच डाळ भात भाजी चपाती लोणचे पापड उकडलेले अंडे वगैरे... हलका आहार सात्विक आहार बरे वाटते Happy

सकाळी बटाट्याचा कीस व दूध, दुपारी दोन केळी, संध्याकाळी साबुदाणा वडे. रात्री ९ ला उपवास सोडून जेवण. संध्याकाळी देवीच्या देवळात जाऊन आलो. एकूण छान वाटले. मनात आलं, आपण आपली पचनसंस्था किती राब राब राबवतो. तिलासुद्धा विश्रांतीची गरज आहे.
>>> अहो पण तुम्ही कुठे दिली विश्रांती??? एकादशी दुप्पट खाशी उगाच म्हणतात का Happy

आठवड्यातुन 1 दिवस केला तरी पुरे..
माझा सोमवार असतो. खिचडी/बटाटा खाणं शक्यतो टाळते..त्याऐवजी गलासभर दुध/ फळ खाते. (केळी खात नाही). रात्री डिरेक्टली जेवण घेते.. पण हे योग्य कि अयोग्य अजुन ठरवता आलेलं नाही. कुणी जाणकार असेल तर नक्की सांगा. Happy

रवी...उपवास शरीरापेक्षा मनाला जास्त आवडलेला दिसतोय लिखाणावरून.... चांगलं आहे पण उपवास केल्याने पित्त वाढतं त्यामुळे फळं, दूध ठीक आहे पण तेलकट खाऊ नये... सूर्यास्तापूर्वी जेवणं चांगलं.. असं मोठी माणसं सांगायची.