मी कॉलेजच्या हॉस्टेलला पॅरासाईट या जबाबदारीच्या पदावर असतानाची गोष्ट आहे. आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूला एक फटा होता. त्या फट्यातला कातोबा भयंकर तापट वेताळरूप होतं. आम्ही त्याला आठवणीने प्रत्येक अमावस्या - पौर्णिमेला आणि दर रविवारी नॉन व्हेज कोंबडं आणि बकरं दिलं होतं. आम्ही दहा बारा जण त्यासाठीचा खर्च काँट्रीब्यूशन करून भागवायचो. काही दिवसांनी दर रविवारी आणि अमावस्या पौर्णिमेला लेडीज हॉस्टेल आमच्या हॉस्टेलच्या समोर आलेलं दिसायचं. खूपच धम्माल आली. ओळखी पाळखी झाल्या.
काही दिवसांनी इतर मुलांना विचारलं तर त्यांना लेडीज हॉस्टेल बॉईज हॉस्टेलला चिकटल्याचं कधी दिसलं नाही म्हणाले. फक्त काँट्री केलेल्यांनाच दिसायचं. आम्हाला कातोबा प्रसन्न झाला होता बहुतेक.. !
Submitted by रघू आचार्य on 2 December, 2022 - 09:37
पॅरासाईट या जबाबदारीच्या पदावर
>>
हे कुणाला अमानवीय वाटेल, पण हे खरंच आहे. एका वर्षी आम्ही ज्ञानसाधनेत सतत व्यत्यय येत असल्याने वैतागून होस्टेलातून निघून एका बंगल्यात वरची रूम भाड्याने घेतली तर होस्टेलच्या मित्रांना राहवले नाही, आणि त्यांनी कारवायांचं केंद्र आमच्यात बंगल्यात हलवण्याचा निर्णय घेतला. मागच्या भिंतीवरून उड्या मारून आत येताना एकदा खवीस मालकानं बघितलं तेव्हा आमच्या मित्रांनी जबाबदारीचं भान ओळखून वेगळंच पथनाट्य उभं केलं नि आम्हाला सुरक्षित केलं, ती कथा नंतर कधीतरी.
आणि 'पॅरासाईट' हे पंथातीत धर्मातीत वगैरे पद आहे. म्हणजे उदाहरणार्थ बीजे मेडिकलचे पॅरासाईट सीओईपी होस्टेलात आणि सीओईपीचे पाहुणे बीजे होस्टेलात (बहुधा श्रमपरिहारार्थ असतं) असाही चमत्कार होतो. म्हणजे व्यवसायातीत सुद्ध्हा. इतकंच नव्हे तर उस्मानाबादचे मान्यवर राहिलेले पेपर द्यायला मुंबईत, आणि नंदुरबारचे पुण्यात असाही चमत्कार होतो. हे अमानवीय नाही तर काय.
सहिष्णुपणा आपण फार शिकतो उमेदीच्या काळात. नंतर ही उमेद कुठे जाते काय की. हेही तसं आमनवीयच.
कृष्णाजी, तेच की. पॅरासाईटचं वय जितकं जास्त तितकं जबाबदारीचं भान अधिक- असा तो मामला असतो ना. आमच्या जबाबदार बनलेल्या पॅरासायटांनी तिथं वेगळाच रोडशो केला, आणि मुळात आम्हाला या बंगल्यात यायचंच नव्हतं, तर ५-६ घरं सोडून पल्याड असलेल्या 'बिहार हाऊस' नावाच्या बंगल्यात जाऊन माजलेल्या बिहार्यांना चोप द्यायचा होता, पण रात्रीमुळे गल्ली चुकलं- असं तो मी नव्हेच वालं पथनाट्य तिथल्या तिथं उभं केलं. बिहार्यांवर आमच्या बंगलेमालकाचाही राग असल्याने तो लगेच निवळला.
पॅरासाईट नावाची ऑस्कर का काय विजेती फिल्म आम्ही मोठ्या उत्सुकतेने बघायला घेतली होती. पण छे, असलं काय नव्हतं. हे वेगळेच पॅरासाईट निघाले.
परवा मला स्वप्नात परत एक बाई दिसली. व मी घाबरुन जागी झाले. खरं तर तोंडातून शब्द फुटत नव्हता. स्वप्न असे होते की - मी बल्ब बदलत होते. शिडीवर उभी राहून व खाली भाऊ उभा होता. मदतीला. आमचं घराचं दार उघडं राहीलं होतं. एक बाई अचानक अवतीर्ण झाली. फ्रॉम थिन एअर. म्हणजे अचानक दृष्य झाली. व माझ्याकडे बघत बसली. मग मी तिला घेउन पळत दाराकडे गेले. मी तिच्या डोळ्यात पहाण्याचे टाळत होते कारण तिने भावाला व आईला डोळ्यात पाहून, हिप्नोटाईझ केले. आई म्हणु लागली "अगं बाई! नंदा ना ही?" व मला वाटत होते डोंबल्याची नंदा. हाकला या अवदसेला. मी दारापर्यंत पोचले, समोर शेजारचे आजोबा बाहेर निघालेले व त्यांची सून ते जाताना, दार ओढुन घेत होती. माझ्या तोंडुन शब्द फुटत नव्हते म्हणुन मी अं अं अं असे घशातून आवाज काढून त्या दोघांचे लक्ष वेधित होते व नवर्याने जागे केले.
हे बाई येउन माझ्याकरता वाट पहात बसते हे स्वप्न पूर्वी आजारपणात मी पाहीलेले आहे. कुणाला तरी एका दुर्दैवी व घातक क्षणी मी मृत्युपश्चात भेटण्याचे वचन दिलेले आहे व माझे मलाच कळत नाही की असा वेडेपणा मी का केला. अशी काहीशी ती थीम आहे.
हां गेले २ दिवस माझे डोके नक्की दुखत होते. तर त्यामुळे ते स्वप्न पडलेले असावे. पण फार भितीदायक आहे.
----------------------------
मला वाटतं नियमित झोप, खाणे, अॅक्टिव्हिटी आणि मेडिटेशन (ध्यान) - ही चतु:सूत्री सांभाळल्यास, परत डोके दुखायचे कमी होइल व अशी स्वप्ने पडणार नाहीत. पण ही थिम अशी का आहे ते कळत नाही मला. आपले 'श्रीराम जय राम जय जय राम' तसेच नवनाथ पोथी बरे.
अमानवीय धागा फक्त वाचण्याचं काम केलंय. एक किस्सा दर वेळी सांगायचा मोह होत असे पण राहून गेला.
माझ्या वडलांचा मामेभाऊ. त्याच्या जन्माच्या वेळचा किस्सा आहे. मामेभाऊ म्हणजे वडलांची आई, माझी आज्जी, तिच्या माहेरची नातीगोती सगळी. (वडलांसाठी शशी मामा होते अर्थातच. माझे मामेआजोबा.)
तिची थोरली चुलती होती तिला सगळे नावाने बोलवायचे . गंगा नाव होतं. मोठी आई पण म्हणत. दीर सगळे लहान असल्याने आई आणि मुलांसारखं नातं होतं. तीन नंबरच्या चुलत्याच्या मुलाचं नाव शशीकांत. त्याला शशी म्हणायचे. त्याच्यावर गंगाचा जीव होता. मोठा झाल्यावर तो मुंबईला आला. पहिल्या मुलाच्या वेळी गावी यायला सुट्टी मिळत नव्हती. गावाकडून पण कुणी लवकर येत नव्हतं. गंगाने तिच्या माहेरी जाऊन कुणाला तरी गाडी करून मुंबईला पाठवलं. तिला खूप काळजी लागून राहिली होती. शशीचं सासर गावावरून दहा बारा मैलांवर होतं.
प्रवासामुळे त्रास सुरू झाला. गावाकडे डॉक्टर नव्हता. त्यासाठी पळापळ सुरू झाली. फोन सुद्धा जास्त नसायचे. शशीला निरोप कसा द्यावा हे कळत नव्हतं. त्याच टेण्शन मधे गंगा विहीरीवर रात्री उशिरा पाणी भरायला गेली होती.
रात्रीशया शशी आजोबांच्या स्वप्नात गंगा आली. ती पूर्ण आगीच्या लोटात होती. तू आत्ताच्या आत बायकोकडे जा. मी तुझ्या पोटाला येणार आहे म्हणाली. शशीआजोबा दचकून जागे झाले. हे कसलं स्वप्न ?
तिकडे त्यांच्या आजोबांचा पण बसल्या बसल्या डोळा लागला होता. त्यांना अचानक चटका बसला. तर समोर आगीत गंगा उभी होती.
बसलास काय, चल नीघ,, शशीच्या सासरी जायचंय आपल्याला ...
आणि अंतर्धान पावली.
शशी आजोबा तडक गावी आले. पहाट झालेली. त्यांना निरोप मिळाला कि (त्यांचे वडील) सासरी गेलेत. तिकडेच तडक जा. इथे थांबू नकोस.
तिकडे गेल्यावर समजलं की मुलगा झालाय.
मग स्वप्नाची चर्चा झाली. सेम टू सेम स्वप्नं आणखी एक दोघांना पडलं होतं.
शशी आजोबांनी विचारलं पण असं कसं स्वप्न पडेल ?
तेव्हां त्यांना समजलं कि रात्री उशिरा पाणी काढताना पाय घसरून ती विहीरीत पडली त्यातच जीव गेला.
साधारण त्याच वेळी सर्वांना स्वप्न पडलं होतं आणि त्याच वेळी बाळ सुद्धा जन्माला आलं.
किस्सा विश्वास बसण्यासारखा नाही पण खरा आहे. खूप जणांकडून ऐकलंय हे.
मी कॉलेजच्या हॉस्टेलला
मी कॉलेजच्या हॉस्टेलला पॅरासाईट या जबाबदारीच्या पदावर असतानाची गोष्ट आहे. आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूला एक फटा होता. त्या फट्यातला कातोबा भयंकर तापट वेताळरूप होतं. आम्ही त्याला आठवणीने प्रत्येक अमावस्या - पौर्णिमेला आणि दर रविवारी नॉन व्हेज कोंबडं आणि बकरं दिलं होतं. आम्ही दहा बारा जण त्यासाठीचा खर्च काँट्रीब्यूशन करून भागवायचो. काही दिवसांनी दर रविवारी आणि अमावस्या पौर्णिमेला लेडीज हॉस्टेल आमच्या हॉस्टेलच्या समोर आलेलं दिसायचं. खूपच धम्माल आली. ओळखी पाळखी झाल्या.
काही दिवसांनी इतर मुलांना विचारलं तर त्यांना लेडीज हॉस्टेल बॉईज हॉस्टेलला चिकटल्याचं कधी दिसलं नाही म्हणाले. फक्त काँट्री केलेल्यांनाच दिसायचं. आम्हाला कातोबा प्रसन्न झाला होता बहुतेक.. !
पॅरासाईट या जबाबदारीच्या
पॅरासाईट या जबाबदारीच्या पदावर
>>
हे कुणाला अमानवीय वाटेल, पण हे खरंच आहे. एका वर्षी आम्ही ज्ञानसाधनेत सतत व्यत्यय येत असल्याने वैतागून होस्टेलातून निघून एका बंगल्यात वरची रूम भाड्याने घेतली तर होस्टेलच्या मित्रांना राहवले नाही, आणि त्यांनी कारवायांचं केंद्र आमच्यात बंगल्यात हलवण्याचा निर्णय घेतला. मागच्या भिंतीवरून उड्या मारून आत येताना एकदा खवीस मालकानं बघितलं तेव्हा आमच्या मित्रांनी जबाबदारीचं भान ओळखून वेगळंच पथनाट्य उभं केलं नि आम्हाला सुरक्षित केलं, ती कथा नंतर कधीतरी.
आणि 'पॅरासाईट' हे पंथातीत धर्मातीत वगैरे पद आहे. म्हणजे उदाहरणार्थ बीजे मेडिकलचे पॅरासाईट सीओईपी होस्टेलात आणि सीओईपीचे पाहुणे बीजे होस्टेलात (बहुधा श्रमपरिहारार्थ असतं) असाही चमत्कार होतो. म्हणजे व्यवसायातीत सुद्ध्हा. इतकंच नव्हे तर उस्मानाबादचे मान्यवर राहिलेले पेपर द्यायला मुंबईत, आणि नंदुरबारचे पुण्यात असाही चमत्कार होतो. हे अमानवीय नाही तर काय.
सहिष्णुपणा आपण फार शिकतो उमेदीच्या काळात. नंतर ही उमेद कुठे जाते काय की. हेही तसं आमनवीयच.
साजिरा
साजिरा
आणि 'पॅरासाईट' हे पंथातीत धर्मातीत वगैरे पद आहे.
पूर्णच पोस्ट मस्त.
साजिरा
साजिरा
साजिरा,
साजिरा,
सी ओ ई पी ला आणि बी जे एम ला राहिलोय बर्यचदा एकदम ती अनुभुती जाणवली!
त्यांनी कारवायांचं केंद्र आमच्यात बंगल्यात हलवण्याचा निर्णय घेतला. मागच्या भिंतीवरून उड्या मारून आत येताना एकदा खवीस मालकानं बघितलं तेव्हा>>>
मि. साजिरा, हा शुद्ध हलकटपणा आहे असे नाही का बोलले मग ?
कृष्णाजी, तेच की. पॅरासाईटचं
कृष्णाजी, तेच की. पॅरासाईटचं वय जितकं जास्त तितकं जबाबदारीचं भान अधिक- असा तो मामला असतो ना. आमच्या जबाबदार बनलेल्या पॅरासायटांनी तिथं वेगळाच रोडशो केला, आणि मुळात आम्हाला या बंगल्यात यायचंच नव्हतं, तर ५-६ घरं सोडून पल्याड असलेल्या 'बिहार हाऊस' नावाच्या बंगल्यात जाऊन माजलेल्या बिहार्यांना चोप द्यायचा होता, पण रात्रीमुळे गल्ली चुकलं- असं तो मी नव्हेच वालं पथनाट्य तिथल्या तिथं उभं केलं. बिहार्यांवर आमच्या बंगलेमालकाचाही राग असल्याने तो लगेच निवळला.
पॅरासाईट नावाची ऑस्कर का काय विजेती फिल्म आम्ही मोठ्या उत्सुकतेने बघायला घेतली होती. पण छे, असलं काय नव्हतं. हे वेगळेच पॅरासाईट निघाले.
'बिहार हाऊस' नावाच्या
'बिहार हाऊस' नावाच्या बंगल्यात जाऊन माजलेल्या बिहार्यांना चोप द्यायचा होता >>>
बिहार्यांचा इतका सुळसुळाट झालाय कि कुणालाही मनापासून पटावं
परवा मला स्वप्नात परत एक बाई
परवा मला स्वप्नात परत एक बाई दिसली. व मी घाबरुन जागी झाले. खरं तर तोंडातून शब्द फुटत नव्हता. स्वप्न असे होते की - मी बल्ब बदलत होते. शिडीवर उभी राहून व खाली भाऊ उभा होता. मदतीला. आमचं घराचं दार उघडं राहीलं होतं. एक बाई अचानक अवतीर्ण झाली. फ्रॉम थिन एअर. म्हणजे अचानक दृष्य झाली. व माझ्याकडे बघत बसली. मग मी तिला घेउन पळत दाराकडे गेले. मी तिच्या डोळ्यात पहाण्याचे टाळत होते कारण तिने भावाला व आईला डोळ्यात पाहून, हिप्नोटाईझ केले. आई म्हणु लागली "अगं बाई! नंदा ना ही?" व मला वाटत होते डोंबल्याची नंदा. हाकला या अवदसेला. मी दारापर्यंत पोचले, समोर शेजारचे आजोबा बाहेर निघालेले व त्यांची सून ते जाताना, दार ओढुन घेत होती. माझ्या तोंडुन शब्द फुटत नव्हते म्हणुन मी अं अं अं असे घशातून आवाज काढून त्या दोघांचे लक्ष वेधित होते व नवर्याने जागे केले.
हे बाई येउन माझ्याकरता वाट पहात बसते हे स्वप्न पूर्वी आजारपणात मी पाहीलेले आहे. कुणाला तरी एका दुर्दैवी व घातक क्षणी मी मृत्युपश्चात भेटण्याचे वचन दिलेले आहे व माझे मलाच कळत नाही की असा वेडेपणा मी का केला. अशी काहीशी ती थीम आहे.
हां गेले २ दिवस माझे डोके नक्की दुखत होते. तर त्यामुळे ते स्वप्न पडलेले असावे. पण फार भितीदायक आहे.
----------------------------
मला वाटतं नियमित झोप, खाणे, अॅक्टिव्हिटी आणि मेडिटेशन (ध्यान) - ही चतु:सूत्री सांभाळल्यास, परत डोके दुखायचे कमी होइल व अशी स्वप्ने पडणार नाहीत. पण ही थिम अशी का आहे ते कळत नाही मला. आपले 'श्रीराम जय राम जय जय राम' तसेच नवनाथ पोथी बरे.
बापरे हे भयानक आहे....
बापरे हे भयानक आहे....
अमानवीय धागा फक्त वाचण्याचं
अमानवीय धागा फक्त वाचण्याचं काम केलंय. एक किस्सा दर वेळी सांगायचा मोह होत असे पण राहून गेला.
माझ्या वडलांचा मामेभाऊ. त्याच्या जन्माच्या वेळचा किस्सा आहे. मामेभाऊ म्हणजे वडलांची आई, माझी आज्जी, तिच्या माहेरची नातीगोती सगळी. (वडलांसाठी शशी मामा होते अर्थातच. माझे मामेआजोबा.)
तिची थोरली चुलती होती तिला सगळे नावाने बोलवायचे . गंगा नाव होतं. मोठी आई पण म्हणत. दीर सगळे लहान असल्याने आई आणि मुलांसारखं नातं होतं. तीन नंबरच्या चुलत्याच्या मुलाचं नाव शशीकांत. त्याला शशी म्हणायचे. त्याच्यावर गंगाचा जीव होता. मोठा झाल्यावर तो मुंबईला आला. पहिल्या मुलाच्या वेळी गावी यायला सुट्टी मिळत नव्हती. गावाकडून पण कुणी लवकर येत नव्हतं. गंगाने तिच्या माहेरी जाऊन कुणाला तरी गाडी करून मुंबईला पाठवलं. तिला खूप काळजी लागून राहिली होती. शशीचं सासर गावावरून दहा बारा मैलांवर होतं.
प्रवासामुळे त्रास सुरू झाला. गावाकडे डॉक्टर नव्हता. त्यासाठी पळापळ सुरू झाली. फोन सुद्धा जास्त नसायचे. शशीला निरोप कसा द्यावा हे कळत नव्हतं. त्याच टेण्शन मधे गंगा विहीरीवर रात्री उशिरा पाणी भरायला गेली होती.
रात्रीशया शशी आजोबांच्या स्वप्नात गंगा आली. ती पूर्ण आगीच्या लोटात होती. तू आत्ताच्या आत बायकोकडे जा. मी तुझ्या पोटाला येणार आहे म्हणाली. शशीआजोबा दचकून जागे झाले. हे कसलं स्वप्न ?
तिकडे त्यांच्या आजोबांचा पण बसल्या बसल्या डोळा लागला होता. त्यांना अचानक चटका बसला. तर समोर आगीत गंगा उभी होती.
बसलास काय, चल नीघ,, शशीच्या सासरी जायचंय आपल्याला ...
आणि अंतर्धान पावली.
शशी आजोबा तडक गावी आले. पहाट झालेली. त्यांना निरोप मिळाला कि (त्यांचे वडील) सासरी गेलेत. तिकडेच तडक जा. इथे थांबू नकोस.
तिकडे गेल्यावर समजलं की मुलगा झालाय.
मग स्वप्नाची चर्चा झाली. सेम टू सेम स्वप्नं आणखी एक दोघांना पडलं होतं.
शशी आजोबांनी विचारलं पण असं कसं स्वप्न पडेल ?
तेव्हां त्यांना समजलं कि रात्री उशिरा पाणी काढताना पाय घसरून ती विहीरीत पडली त्यातच जीव गेला.
साधारण त्याच वेळी सर्वांना स्वप्न पडलं होतं आणि त्याच वेळी बाळ सुद्धा जन्माला आलं.
किस्सा विश्वास बसण्यासारखा नाही पण खरा आहे. खूप जणांकडून ऐकलंय हे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/84427
रिक्षा. लाभ घ्यावा.
ऍक्टिव्ह करा पुन्हा हा धागा,
ऍक्टिव्ह करा पुन्हा हा धागा, या धाग्यावरचे अनुभव थ्रिलिंग असतात
Pages