Submitted by वाट्टेल ते on 4 October, 2019 - 13:24
बंडोपंत देवल, या देवल सर्कसच्या मालकांनी लिहिलेले पुस्तक लहानपणी वाचले होते आणि अतिशय आवडले होते. कालौघात ते घरातून गहाळ झाले आहे. नेटवर कुठेही सापडले नाही, फक्त ते १९८२ साली प्रकाशित झाल्याचा एक संदर्भ मिळाला.
तर हे पुस्तक कोठे मिळेल , प्रकाशक कोण याबद्दल कोणाला काही माहित आहे का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बंडोपंत देवलांची नातवंडे,
बंडोपंत देवलांची नातवंडे, पणतवंडे माझ्या माहितीत आहेत. त्यांच्यापैकी काहिंना विचारून पाहतो आहे का पुस्तक
धन्यवाद. बंडोपंत देवलांची एक
धन्यवाद. बंडोपंत देवलांची एक नात माझी मैत्रीण आहे तिच्यासाठीच ( आणि माझ्यासाठीही) शोधत आहे पुस्तक, अर्थात मैत्रिणीला वाचन वगैरे आवड नाही. तिच्या आजोबांचे पुस्तक म्हणून मीच जास्त उत्साहात आहे.
तरी तुम्हाला काही कळले तर कृपया सांगा.
मी पण वाचलं आहे हे लहानपणी.
मी पण वाचलं आहे हे लहानपणी.
त्यात त्यांना उडी मारताना दुखापत झालेली असते आणि खुरडत चालत असत असा संदर्भ आठवतो
याच बरोबर दामू धोत्रे यांचे वाघ सिंह माझे सखे सोबती हेही पुस्तक आवडायचे, ते नंतर घेतले विकत
पुणे आणि मुंबईच्या नगर
पुणे आणि मुंबईच्या नगर वाचनालयात विचारा.
तुमच्या प्रोफाइलमधे यू एस ए
तुमच्या प्रोफाइलमधे यू एस ए लिहिलंय म्हणून
https://www.worldcat.org/title/sarkasabarobara-caisa-varshe/oclc/9993532...
इथे पाहिलं तर लायब्ररी ऑफ काँग्रेस आणि काही विद्यापीठांमधे हे पुस्तक आहे असे दिसते.
माझ्या इथली स्थानिक फ्री लायब्ररी लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेस मधली पुस्तके किंवा बर्याच विद्यापीठांमधली पुस्तके मागवून देते. तुम्ही तुमच्याइथे चौकशी करा.
मेधा, खूप आभार
मेधा, खूप आभार. मॅजेस्टिक चे प्रकाशन आहे हे हि कळले.
दामू धोत्रे यांचे वाघ सिंह
दामू धोत्रे यांचे वाघ सिंह माझे सखे सोबती
हे फार आवडले होते. देवलांचे पुस्तक वाचले नव्हते.
दामू धोत्रे हे रिंगमास्टर
दामू धोत्रे हे रिंगमास्टर होते. त्यांचा धडा आम्हाला होता. वाघ सिंह खेळ करण्यासाठी पिंजऱ्यात घेतल्यानंतर वीज गेल्यावरचा थरार वर्णन केला होता त्यात.
"पुणे नगर वाचन मंदिर" च्या
"पुणे नगर वाचन मंदिर" च्या बिबवेवाडी शाखेत हे पुस्तक उपलब्ध आहे असे इथे दिसून येते:
http://www.punenagarvachan.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=...
या पुस्तकासंबंधी वाचायला मिळालेला उतारा ह्या ब्लॉग पोस्ट वरून साभार:
"बंडोपंत देवल यांच्या १९८२ मधील पुस्तकात त्यांचे स्वतःच्या सर्कस व्यवसायातील अनुभव कथन आहे. त्यांच्या काकांकडून(म्हणजे सर्कससम्राट बाबासाहेब देवल) त्यांना सर्कस मिळाली, आणि अकरा वर्षांपासून ते त्यात काम करायला लागले. सर्कशीतील राजकारण, सिंगापूर, अफगाणीस्तान, त्यावेळचे मद्रास येथे दौरे, मैसूर आणि निजामातील दरबारात सादरीकरण हे सर्व रोमांचित करणारे आहेत. मिरजेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची झालेली भेटीचे अनुभव, नंतर दुसऱ्या महायुद्धाची झळ सोसत रेटलेली सर्कस, जी अक्षरशः तारेवरची कसरतच झाली. गांधीवधाच्यावेळेस झालेल्या जाळपोळीत, लुटालूटीमध्ये सर्कस देखील लुटली गेली. त्यानंतर देवल सर्कसची अखेर हे सर्व आपल्याला त्या काळात घेऊन जाते. सर्कसच्या जगात नावाचे एक प्रकरण पुस्तकात आहे, ज्यात लेखकाने सर्कस मध्ये काम कसे चालत असे त्याबद्दल त्यांनी लिहून ठेवले आहे. प्राण्यांना कसे कसरतीचे प्रशिक्षण कसे दिले जाई, याबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ते मराठी माणसाच्या योगदानाबद्दल लिहितात की जसं संगीत नाटक, सांगली मिरज भागात सुरु झाले, त्याच प्रमाणे भारतीय सर्कस विष्णुपंत छत्रे यांनी सांगली मिरज भागात १८८३ मध्ये Grand Indian Circus नावाने सुरु केली. पूर्वी कश्या मराठी संगीत नाटक मंडळ्या असत, त्याच प्रमाणे मराठी सर्कस मालकांच्या सर्कस मंडळ्या असत. तो एक संगीत नाटकांप्रमाणे एक सुवर्णकाळच होता. या संगीत नाटक मंडळ्याप्रमाणे, मराठी सर्काशीची भरभराट झाली. आणि नंतर हळू हळू केरळी सर्कसवाले आले आणि त्यांनी मराठी सर्कसवाल्यांची पीछेहाट झाली. त्याचबरोबर मराठी मनोवृत्तीवर देखील बोट ठेवतात."
छत्रे यांची बोट समुद्रात
छत्रे यांची बोट समुद्रात फुटली तेव्हा सर्कशीतील हत्तीनं त्यांचे प्राण वाचवले असे वाचल्याचे आठवते. नगर जिल्ह्यातील वडगाव पान या गावी सर्कसचे तंबू शिवले जात आणि तेथील मोरे यांचीही प्रसिद्ध सर्कस होती हे वाचल्याचं स्मरते.