प्रथमः भाग :
https://www.maayboli.com/node/71790
द्वितीय:
दुर थोडसं फिक्कटं असलेलं क्षितिज पांढर्या-केशरी रंगाने हळूहळू माखत होत.सूर्याचा तो लाल - केशरी गोळा हळूच वर वर सरकत होता.पहाटेच्या पांढर्या धुकांत तो लाल-गोळा खुपच नयनरम्य वाटत होता.मध्येच पक्षांचे उडणारे काळे ठिपके त्या निसर्ग सुंदरतेत अजून भर घालत होते..हातभर अंतर असलेल्या तलावातलं पाणी शांत आणि निश्चलं वाटतं होतं जणू काही सूर्यांचं हे प्रतिबिबं साठवण्यात तो तलाव मश्गूल असावा म्हणूनच तो संयत आहे..शांत आहे..मंद खळखळाट त्याचं हास्य आहे आणि उठणारे अलवार तरंग त्याच्या हास्यरेषा..किनार्यावरची वाळू सोनेरी भासत होती जणू काही ती वाळू नसून सोन्याचे अंश असावेत किंवा सोन्याचा मुलामा दिलेले हे नाजूकसे कण.
अशाच नाजूकशा कणांवर एक सुंदर लहान मूर्ती उभी होती..
मेघसावळ्या रंगावर शोभणारे काळे कुरळे केस, पाणीदार डोळे, धारदार नाक आणि धनुष्याकृती ओठ, थोडाश्या तिरकी असलेल्या त्याच्या आकृतीतून त्याचं धवल उत्तरीय पहाटेच्या वार्याने फडफडत होतं पण त्याला सावरायचं भान नव्हतं तो तसाच स्तब्ध,निश्चलं. एकटक पाण्यात आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत होता
हलकेच स्तनाग्र नसलेल्या आपल्या छातीवर त्याने त्याचे आकर्षक हात फिरवले. तो असा एकटाच असा नर होता ज्याला फक्त एकच स्तनाग्र होतं आणि ह्याचचं त्याला राहून राहून खुप आश्चर्य वाटत होतं..तो इतका गुंग होता की, तलावात दुसरं प्रतिबिंब प्रकटलेलं दिसलचं नाही. वकः पक्षाने मस्त्य पकडताना थोडासा खळखळाट झाला तेव्हा कुठे तो भानावर आला.
"अर्जुनऽऽऽ...अर्जुनऽऽ...अर्जुनाऽऽ.." भानावर येताच माद्रीचा आवाज त्याच्या कानावर आला. तो सावकाश तशाच निश्चलं भावाने आवाजाच्या रोखाने चालत राहीला.
"माताश्री प्रणाम! क्षमा असावी,आपली साद मला प्रथमतः ऐकू आली नाही"
अर्जुन अगदी विनम्राने उत्तरला.
"कुठे होतास रे? कुठं कुठं शोधायचं तुला? असल्या रानात कुठेही एकटा जात जाऊ नकोस..चार बंधु आहेत तुला".
माद्रीला चांगलीच धाप लागली होती..कपाळावरचे हलके उमटलेले घर्मबिंदू पदराने पुसत माद्री कशीबशी बोलली.
"क्षमा असावी माते,पुन्हा असं नाही करणार"
असं म्हणताना तो इतका निरागसं आणि सालसं वाटत होता की, क्षणभर माद्रीला त्याचा हेवाच वाटला..त्याच्या कपाळावर हलकसं चुंबन घेऊन माद्रीने त्याचा हात पकडला व ती चालू लागली..
माद्री आणि अर्जुन कुटीजवळ पोहचले तेव्हा सहदेव ताटकळत थांबलेला दिसला त्याच्या कपाळावर नाराजीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.
त्याच्याकडे पाहून अर्जुन गोड हसला आणि हातानेच नंतर सांगतो असा इशारा केला.
सहदेवाने पुष्पकरंडक उचललं आणि तो आणि अर्जुन मागच्या अंगणात पुजेसाठी फुले वेचायला निघाली..
फुले वेचणे हे खरंतरं आळीपाळीने करायचं काम होतं..कधी सहदेव-युद्धीष्टर, कधी भीम -नकुल, तर कधी भीम -अर्जुन अशा आळीपाळीच्या जोडीने करायचं काम पंडूने त्यांना सोपावलं होतं..
अशाने एकमेकांत स्नेह निर्माण होऊन प्रेम वाढतं अशी त्याची धारणा होती..
आज खुप दिवसांनी त्यांची जोडगळी जाणार होती..खरंतरं ते दोघेही ह्या क्षणांची खुप आतुरतेने वाट पाहत कारण त्यांना एकमेकांचा सहवास जरा जास्तच प्रिय होता आणि दुसरं कारण असं की, युद्धीष्टर आणि भीम दोघेही सहदेव आणि अर्जुनापेक्षा मोठे होते त्यामुळे त्यांच्याशी केवळ आज्ञाधारक बालकाप्रमाणे वागावे लागे आणि नकुल तर काही बोलायचाच नाही. एकतर तो इतका सुंदर होता की,आजू बाजूचे लोकच काय तर पक्षी आणि प्राणीदेखिल भावविभोर होऊन त्याच्याकडे पाहत राहायचे आणि
तो पण पक्षी आणि प्राण्यांशी बोलायचा..त्यांच्यातच रमायचा..
म्हणूनच सहदेव आणि अर्जुनाचं खुप जमायचं...अर्जून सांगायचा त्याला मनातलं सारं ..सहदेव ऐकायचा..आजही त्यांच्या फुले वेचता वेचता छान गप्पा चालू होत्या..अचानक सहदेवला अर्जुन सकाळी कुठेतरी गेलेला आणि तो हे सांगणार होता हे आठवलं म्हणून सहदेवाने विचारलं..
"भ्राताश्री आज पहाटे कुठे गेला होतात? "
"काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे शोधायला"
अर्जुन धीरगंभीर होत उत्तरला.
"कसले प्रश्न भ्राताश्री??"
सहदेवाच्या स्वरात आश्चर्य आणि कुतुहूल दोन्ही होतं..
"सांगेन वेळ आली की,नक्की सांगेन"
क्रमशः
छान! पुढील भागाच्या
छान! पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
बादवे तुमची लिखाणाची रेंज प्रचंड मोठी आणि विविधतापूर्ण आहे. हे नमूद करावेसे वाटते.
खुप छान!
खुप छान!
निसर्गवर्णन आणि वातावरण
निसर्गवर्णन आणि वातावरण निर्मिती! उत्तम!
येऊ द्या पुढचा भाग लवकर!
एकदम डोळ्यासमोर तो काळच उभा
एकदम डोळ्यासमोर तो काळच उभा केला,
अजयजी खरंच सगळं larger than life.
अजयदा.. तु पहाटेचं वर्णन काय
अजयदा.. तु पहाटेचं वर्णन काय सुरेख शब्दांत केलंय.. खुप आवडलं..

पुभाप्र!
बादवे तुमची लिखाणाची रेंज
बादवे तुमची लिखाणाची रेंज प्रचंड मोठी आणि विविधतापूर्ण आहे. हे नमूद करावेसे वाटते. Happy
नवीन Submitted by अज्ञातवासी on 4 October, 2019 - 08:46>>> +1
छान
छान
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद...
>>>>बादवे तुमची लिखाणाची रेंज प्रचंड मोठी आणि विविधतापूर्ण आहे. हे नमूद करावेसे वाटते. <<<<<
अज्ञातवासीजी तुमचही लिखाण मला असंच वाटतं...गूढकथा, विनोदीलेखन आणि चित्रपट परिक्षण अशा वेगवेगळ्या विषयावर किती सहज लिहता तुम्ही..
तुम्ही आणि जव्हेरगंज......
तुम्ही आणि जव्हेरगंज......
किती प्रतिक्षा करायला लावता पुढच्या भागासाठी!
कुठे फेडाल ही दिरंगाई? ('कुठे फेडाल हे पाप?' च्या सुरावटीत)
हलके घ्या आणि लवकर पुढचा भाग टाका.
मधुरा! हे तु बोलतीये!! बघा!!
मधुरा! हे तु बोलतीये!! बघा!!

मन्या,
मन्या,
अब मैने कौनसी कथा अधुरी छोड दी???
युगांतर कोण गं पुर्ण करणार??
मधुरा,युगांतर कोण गं पुर्ण करणार?? वाट बघतीये मी..
निसर्गवर्णन आणि वातावरण
निसर्गवर्णन आणि वातावरण निर्मिती! उत्तम!
येऊ द्या पुढचा भाग लवकर! >>>>+1111
जैसे आपकी इच्छा मन्या! आजच
जैसे आपकी इच्छा मन्या! आजच पोस्ट करते. (पण युगांतर दिर्घकथा आहे.)
अजय तुम्हीही लवकरच टाकालं भाग
अजय तुम्हीही लवकरच टाकालं भाग पुढचा अशी अपेक्षा!
Thanks...
Thanks मधुरा..नक्की पोस्ट कर.

साॅरी जरा कामात अडकलोय.
साॅरी जरा कामात अडकलोय..लवकरचं पुढचा भाग टाकायचा प्रयत्न करेन...
पुढचा भाग लवकर टाका
पुढचा भाग लवकर टाका