Submitted by प्रकाशसाळवी on 27 September, 2019 - 02:41
रात्र थोडी वाटून घेतली मी
दू:खे थोडी दाटून घेतली मी
**
भावभावनांशी दचकून वागलो
वेदना थोडी थाटून घेतली मी
**
हास हासलो दू:खाना मजेने
आसवे थोडी आटून घेतली मी
**
मिळाले नाहीत हक्क मागूनही
शिदोरी थोडी लाटून घेतली मी
**
नात्यास मी ना लाथाडले कधिही
प्रेमात थोडी काटून घेतली मी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सर्व शेर चांगले आहेत
सर्व शेर चांगले आहेत