भाग ११
https://www.maayboli.com/node/71092
"तुला सगळे रूट माहीत होते. तुला संपूर्ण भारत माहीत होता."
"इस्माईलभाई."
"सांगायला हवं होतं अनिरुद्ध."
"भाई..."
"अजूनही अलीला माहीत नाही, तू महेश साळगावकरचा मुलगा आहेस."
"आणि माहीत पडायलाही नको इस्माईलभाई... मला आज कळलंय, महेश साळगावकर हा माणूस किती मोठा होता ते."
"तुला बदला नाही घ्यावासा वाटत का अनिरुद्ध?"
"भाई, जळतोय मी कधीचाच त्या आगीत, पण मी शांत आहे. मला दाखवायचंच नाहीये की त्या जखमेचा आघात दिवसेंदिवस वाढत चाललाय, पण एक सांगतो भाई, ज्यांनी माझ्या वडिलांना मारलं, त्यांना प्रत्येकाला मी अशा पद्धतीने मारेल, की इतिहासात नोंद होईल."
इस्माईल बऱ्याच वेळा शांत बसला. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं.
"उद्या चांदणीला घ्यायला जायचंय. सकाळी. तिला उशीर झालेला आवडत नाही."
"जी भाई."
◆◆◆◆◆
'हर मर्ज का इलाज मिलता था उस बाजार में....
मोहब्बत का नाम क्या लिया तमाम दवाखाने बन्द हो गये.'
अनिरुद्ध त्याच्याकडे बघून हसला. खिशातून दोन रुपयाची नोट काढून त्याच्या पुढ्यात ठेवली.
"शुक्रिया."
स्टेशनवर सकाळी तुरळक गर्दी होती. सकाळी चहा न घेताच तो बाहेर पडला होता. एका चहावाल्याला त्याने आवाज देऊन बोलावले आणि एक कप चहा घेतला.
"एक कप चहा माझ्यासाठीही घे..."
...अनिरुद्धने मागे वळून बघितले, व जागच्या जागी खिळून राहिला.
...गोरी गोरी पान, गुलाबी गोबरे गाल, गोल चेहरा, सरळ नाक, सोनेरी केस आणि धष्टपुष्ट शरीर...
तिने केव्हा चहा घेतला, आणि पर्समधून दोघांचे पैसे काढून चहावाल्याला दिले, कळलंही नाही.
"चलायचं?" तिने विचारलं.
यंत्रवतपणे तो पुढे निघाला, आणि तीही त्याच्या मागे निघाली.
तो गाडी चालवत राहिला. ती मागे काहीतरी गाणं गुणगुणत होती.
"...तू नवीन आहेस ना बाबांकडे?"
तो काहीच बोलला नाही.
थोड्यावेळाने धक्का लागल्यासारखा तो म्हणाला.
"हो..."
ती हसली.
'देवा... किती सुंदर मुलगी आहे ही...' अनिरुद्ध पूर्णपणे खिळून राहिला.
"गाडी मी चालवू का? लक्ष नाहीये तुझं..." ती हसत म्हणाली.
अनिरुद्धने सरळ मान केली, आणि गाडी चालवू लागला.
"थांब..."
"काय झालं?" आता तो थोडाफार भानावर आला होता.
"उतर खाली."
"काय झालं?"
"उतर ना..."
तो खाली उतरला. ती ड्रायवरच्या सीटवर बसली.
"बस."
तो तिच्या शेजारी बसला...
आणि गाडी सुसाट निघाली...
◆◆◆◆◆
इस्माईल गोडावूनच्या बाहेर उभा होता.
सुसाट वेगाने गाडी त्याच्या समोर येऊन उभी राहिली.
''अब्बू...'' चांदणी गाडीतून उतरत त्याला बिलगली.
"मेरा चांद का तुकडा..." इस्माईलने तिला घट्ट कवटाळले.
नंतर काहीतरी आठवल्यासारखा तो म्हणाला.
"गाडी तुने चलाई?"
"अब इस गरीबको मत डाटना, प्लिज." ती कान पकडून म्हणाली.
"तुझे नहीं, उसको डातुंगा!"
"उसी गरीबकी में बात कर रही थी!" ती खळखळून हसली.
दोघेही मध्ये गेले.
"अभी आज पुरा दिन क्या गाडीमे बैठना है? ऑफिस बनवा दू?" याकूब हसत म्हणाला.
अनिरुद्ध गाडीतून उतरला, आणि चालू लागला.
◆◆◆◆◆
गोडावूनच्या वरच्या खोलीत इस्माईल आणि चांदणी बसले होते.
"सहा महिन्यानंतर येणं जरुरी आहे? इथेच मुंबईला ऍडमिशन का घेत नाहीस. कुठलंही कॉलेज तुला प्रवेश देईल. काळजाचा तुकडा सहा सहा महिने न दिसणं याच दुःख काय असतं हे तुला नाही कळणार."
"अब्बू सगळं कळतंय मला, पण जे चालुये तेच चांगलंय."
"शेवटचं वर्ष."
"पुढेही शिकेन अब्बू."
"शिक बेटा, खूप शिक. पण आता पुढचं शिक्षण मुंबईला."
"ठिक आहे अब्बू."
बराच वेळ दोघे एकमेकांशी गप्पा मारत बसले. थोड्यावेळाने इस्माईलने अनिरुद्धला आवाज दिला.
अनिरुद्ध आत आला, आणि चोरट्या नजरेने चांदणीकडे बघत उभा राहिला.
"इसे घरपर छोड के आ, और याद रहे, गाडीका स्टीरिंग तेरे हात से किसी और के हातमें नही जाना चाहीये!"
◆◆◆◆◆
'रंग भरे बादल से, तेरे नैनो के काजल से,
मैने इस दिलपे लिख दिया तेरा नाम...
चांदणी...'
अनिरुद्धच्या डोक्यात हेच गाणं गुणगुणत होतं.
त्याने घरासमोर गाडी थांबवली.
ती उतरली, आणि घराकडे निघाली.
अनिरुद्ध तिच्याकडे खुळ्यासारखा बघत राहिला...
तो तिच्याकडे बघतोय, हे तिच्या लक्षात आलं.
"जाओ," ती मागे वळून बघत हसत म्हणाली.
आणि तो गडबडून निघाला.
चांदणी, ओ मेरी चांदणी!!!!
वेग मस्त आहे कथेचा.
वेग मस्त आहे कथेचा.
छान झालाय हा भाग.. आता पुढचा
जबरदस्त ट्विस्ट.. आता पुढचा भाग कधी??
पुढील भाग लवकर टाकायचा
पुढील भाग लवकर टाकायचा प्रयत्न कराल...
छान कथा
भारी
भारी
वाह वाह नविन भाग आला तर.
वाह वाह नविन भाग आला तर.
'हर मर्ज का इलाज मिलता था उस बाजार में....
मोहब्बत का नाम क्या लिया तमाम दवाखाने बन्द हो गये.' - क्या बात है !
नेहमी प्रमाणे छान.
जे हिन्दी संवाद आहेत ते
जे हिन्दी संवाद आहेत ते जबरदस्ती मराठी नाही केलेत याबद्धल अभिनन्दन.
मस्त फ्लो मधे आहे कथा- पटापटा पुढचे भाग टाका.
आला........ मस्तच ....येऊद्या
आला........ मस्तच ....येऊद्या पुढील पटकन
झकास.. पुभाप्र.
झकास.. पुभाप्र.
अप्रतिम जमलाय! वर्थ वेटिंग!
अप्रतिम जमलाय!
वर्थ वेटिंग!
बरेच दिवसांनी आला भाग ....
बरेच दिवसांनी आला भाग .....लवकर टाका पुढचा भाग... जबरदस्त वळण मिळालंय कथेला ...
हे असं लिखाण मराठीत
हे असं लिखाण मराठीत पहिल्यांदा वाचतेय, सणसणीत, वेगवान आणि प्रचंड वेगळं.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्लिज लवकर आणि मोठे भाग टाका. हवं तर मी लेखनिक म्हणून काम करते (मला भाग सगळ्यात आधी कळेल.)
जबरदस्त
जबरदस्त
अर्रे यार, चांदनी आणि
अर्रे यार, चांदनी आणि अनिरुद्धचं जमायला नको. जर भांडण झालं काही बेबनाव झाला, तर ईस्माईलभाई टपकवणारच अनिरुद्ध ला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
____
हा भाग आवडला हेवेसांन
_________
कसले डावपेच आहेत या संपूर्ण कथेत, खिळवुन ठेवलय वाचकांना.
वाचतेय.
वाचतेय.
जबरदस्त आहे ही कथा. प्रत्येक भाग जमतोय. आवडला.
महाश्वेता, ग्रेट वर्क!
नारायण धारप यांचा धागा बघा रे
नारायण धारप यांचा धागा बघा रे सगळ्यांनी,मी एक डुआयडी ची पोलखोल केले.
Mast zalay ha bhag
Mast zalay ha bhag
पुढील भाग लवकर टाका.
पुढील भाग लवकर टाका.
महाश्वेता, ग्रेट वर्क!
पुढचा भाग कधी?
पुढचा भाग कधी?
पुढील भाग कधी ?
पुढील भाग कधी ?
संपली का?
संपली का?
मास्टर माईंड डायरेक्ट ?
मास्टर माईंड डायरेक्ट ?
बोला आर्यन
बोला आर्यन
पुढचा भाग कधी ताई?
पुढचा भाग कधी ताई?
भारीच पुभाप्र.
भारीच पुभाप्र.
पुभाप्र??
पुभाप्र??
पुभाप्र??
पुभाप्र??
पुढील भाग पाठवा कि
पुढील भाग पाठवा कि
पुढील भाग ?
पुढील भाग ?
पुढे काय ???????
पुढे काय ???????
पुढे काय ?
पुढे काय ?