खरेच सार्वजनिक गणेशोत्सव बन्द झाला पाहिजे.
>>>>>
मायबोलीवर आज हे वाक्य वाचले.
आणि असं वाटले कोणीतरी माझ्या छातीत खंजीर खुपसतेय..
क्षणभरात लहानपणीच्या शेकडो आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या.
मला आठवतेय मी चौथीत होतो. आमच्या बाळ गोपाळ मित्रमंडळाने ठरवले गणपती आणायचा. मोठ्यांनी विरोध केला. आम्ही पुन्हा ठरवले, आता तर आणायचा म्हणजे आणायचाच. वयाने सर्वात मोठा मुलगा जो सहावीत होता तो अध्यक्ष झाला. सर्वात गुणी मुलाला सेक्रेटरी केले. मी गणितात हुशार म्हणून मी हिशोब सांभाळणारा खजिनदार झालो. बाकीच्यांनीही आपापल्या जबाबदारया वाटून घेतल्या. वर्गणी जमा करण्यापासून, स्पॉन्सर शोधणे, सजावट करणे, लाईट स्पीकर, वाजतगाजत मुर्ती आणने, तिची पाचसहा दिवस पूजा अर्चा, आरती भजन, आम्हीच बसवलेले मनोरंजनाचे कार्यक्रम ते अखेर ईतर घरगुती गणपतींसोबत वाजत गाजत विसर्जन.. सगळं काही धमाल मौजमस्तीत यथासांग पार पडले.
बरंच चुकलो, बरंच शिकलो..
शिव्याही बरेच खाल्या.. सांभाळून घेणारेही बरेच भेटले..
पण सगळं काही झाल्यावर एक जबाबदारी घेऊन ती ईतक्या मोठ्या उत्साहात निभावली, खेळतानाचे आपापसातले हेवेदावे सोडत एकत्र येत एकजूट दाखवत एक कार्य पार पाडले, यातून जे समाधान मिळाले ते निव्वळ अनुभवायचीच गोष्ट.
आज काही ठिकाणी या सणाला ओंगळ स्वरूप प्राप्त झालेही असेल. पण ते आणखी कश्याला झाले नाही. सणांचेच का घेऊन बसलात. या कारणास्तव आजवर कधी दारूचे बार बंदच करा असा ओरडा मी ऐकला नाही. की तिथे तेच अपेक्षितच असते म्हणून सूट. आणि सण मात्र काटेकोरपणे संस्कृती पाळूनच झाले पाहिजे. तिथे धांगडधिंगा जराही खपवून घेतला जाणार नाही हा अट्टाहास... असे आहे का?
जिथे काही गैर घडत असेल तिथे नियम लावा, मूळावरच घाव कश्यासाठी??
मी नास्तिक आहे. पण सणांचे महत्व जाणतो. आयुष्यातल्या बालपणीच्या ज्या काही सुखद आठवणी आहेत त्यात या सणांचाच वाटा मोठा आहे. आणि हा आनंद हे सण घरच्याघरी साजरे करून खचितच मिळाला असता. मी स्वत:ला याबाबत फार नशीबवान समजतो की माझे अखंड बालपण दक्षिण मुंबईतील मोकळ्याढाकळ्या वातावरणात गेले. जिथे गणपती रंगपंचमी नवरात्र हंडी होळी दिवाळी सारेच सण एकत्र येतच साजरे झाले. त्यामुळे काही गैरप्रकारांकडे बोट दाखवत हा आनंद येत्या पिढीपासून हिराऊन घ्यावे असे वाटत नाही.
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ज्या कारणासाठी सुरू केले त्याची गरज येत्या काळात आणखी जास्त आहे. लोकं प्रत्यक्ष आयुष्यात कमी आणि सोशलसाईटवरच सोशल होऊ लागलेत. त्यांना हे सार्वजनिक गणोशोत्सवासारखे सण एकत्र आणू शकतात. अन्यथा मराठी संकेत्स्थळावर ऑनलाईन सार्वजनिक गणेश्प्त्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यातच धन्यता मानावी लागेल
चूकभूलघ्यावीद्यावी
ऋन्मेष
>> ए मलापण वाट रे' संघटना>>
>> ए मलापण वाट रे' संघटना>>
बोकलत =))
सगळे जण वर्गणी काढा नि आणा
सगळे जण वर्गणी काढा नि आणा एकादं नाटक तीन दिवस, २ शोज रोज. फ्री! एकाद्या उत्तम चित्रपटाचा शो ठेवा, पूर्ण पाच दिवस किंवा एरीयातले लोककलाकार, कालेजातली पथनाट्य पथकं, एकपात्री, कथ्थक, मणीपुरी, ओडीसी असे कलाकार. त्यांनाही व्यासपीठ! त्यांचे पोषाख वै स्पॉन्सर करा. त्यातून रोजगार सुद्धा!
>>>>>
जाईजुई
आमचा गणपती असाच होता.
आणि दरवर्षी सत्यनारायणाची पूजाही अशीच असायची.
http://epaper.thegoan.net
http://epaper.thegoan.net/2326221/Goan-Varta-TEE/TEE#page/1/1
या पुरवणीत याच विषयावर खूप लेख वाचायला मिळाले..
गणेशोत्सव बंद व्हायला नको.
गणेशोत्सव बंद व्हायला नको. सबंध देशात एकच टोलेजंग गणपती हवा आणि एकच गणपतीची आरती एकाच भाषेमधून म्हणजे हिंदी मधून हवी.
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा....
देवा हो देवा तुमसे बढकर कौन,
देवा हो देवा तुमसे बढकर कौन, हमसे बढकर कौन......
गंपती बाप्पा मोर्या - अग्ले
गंपती बाप्पा मोर्या - अग्ले बरस तु जल्दी आ !!!
भारत हा बहु धर्मीय,बहु भाषिक
भारत हा बहु धर्मीय,बहु भाषिक,बहु संस्कृती
असणारा जगातील ऐकमेव कृत्रिम देश आहे .
ह्या देशात लोकशाही आहे .
आणि बहुसंख्य लोक जे विचार करतात हेच सत्य आहे हे आपल्या लोकशाही चे ब्रीद आहे .
न्यायालय हे संसदेने जे कायदे पास केले आहेत त्या वर चालतात ..तरी सुधा न्यायालय विरूद्ध निर्णय देत असेल तर असे निर्णय कचरा म्हणून डब्ब्यात टाकायचा अधिकार बहु मतांनी निवडून येणाऱ्या सरकारला आहे ..इथे
प्रत्येक संस्कृती ,रिती रीवज ह्यांचा योग्य सन्मान राखणे गरजेचं आहे .
ट
टोकाची मते विविध समाजात द्वेष पसरवू शकतात .
हे अतिशय कमी बुध्दी असलेल्या मानव प्राण्याला समजायला अवघड नाही .
गणपती उत्सव हा बहु संख्य समाजाचा उत्सव आहे .
आणि बहु संख्य आहे ते योग्य आहे हे आपली घटना सांगते .
न्यायालय सुधा विरोधी मत व्यक्त करू शकत नाही ..असा प्रताप कोण्ही केला तर लोक सभेत बहु संख्य मतांनी तो बदला जातो.
आणि तो न्यायाधीश बरखास्त करण्यासाठी
महभियोग चालवून तो अमलात आणला जातो कायदेशीर पने
.बानो प्रकरण .
.
भारता सारख्या जगातील एकमेव देशात टोकाचा विरोध आणि आत्म हत्या ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे .
गणपती उत्सव हवाच हवा... सोबतच
गणपती उत्सव हवाच हवा... सोबतच जल्लोश, करमणूक, सांस्कृतिक कार्यक्रम , नाच, गाणे मिरवणूका हव्यात हवा.
फक्त असे करतांना इतरांना त्रास होणार नाही याचे भान ठेवायचे उदा: ध्वनी प्रदूषण. काळानुरुप थोडे बदल होणे आवश्यक आहेत तसेच पर्यावरणाची काळजी घेणे पण गरजेचे आहे. गणपतीची दहा दिवस मनोभावे प्रार्थना करतो त्याचे काही दिवसानंतर पाण्यात टाकलेले अवशेष बघणे त्रासदायक वाटते. या व अशा विसर्जन प्रक्रियेत बदल घडवणे सहज शक्य आहे.
बाप्पा बिठाया है वाले पण
बाप्पा बिठाया है वाले पण हौशेने, इतर कोणाला त्रास न देता रस्त्यावर कचरा न करता गणेशोत्सव करत असतील तर त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.आपल्याच जुन्या गोष्टींमध्ये शंकराच्या भक्तीबद्दल काहीच माहीत नसलेला कोळी झाडावर बसून टाईमपास म्हणून बेलाची पानं खाली टाकत ओम नमः शिवाय म्हणत बसला त्यालाही देवाने आशीर्वाद दिला.
परवा एका फेसबुक ग्रुप वर गौरी गॉगल घालून सजवल्याचे फोटो एकीने टाकल्यावर गोंधळ झाला.पावित्र्य भंग वगैरे.आपण अलरेडी सेल्फी क्लिक करणारा, लॅपटॉप वर काम करणारा बाप्पा प्रेमाने स्वीकारला आहे.मग गॉगल वाल्या गौरींनी काय घोडं मारलंय ☺️☺️
मनापासून, यथाशक्ती यथाभक्ती आणि दुसऱ्याला, पर्यावरणाला त्रास होऊ न देता उत्सव इतकी बेसिक अपेक्षा.
आश्चर्य म्हणजे याच ग्रुपवर गौरीला डिस्ने वाल्या परिसारखे पंख लावून सजावट वाले फोटो आले त्यावर कोणी आक्षेप घेतलेला दिसला नाही.
राजेश १८८ यांचा शेव टचा
राजेश १८८ यांचा शेव टचा प्रतिसाद चिंतनीय आहे.
<भारता सारख्या जगातील एकमेव देशात टोकाचा विरोध आणि आत्म हत्या ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे .>
बहुमताच्या विरोधात जाल तर जीव गमावायची त यारी ठेवा, असा इशारा ते देताहेत. बहुमत काय आहे ते सुद्धा हे काही लोकच ठरवणार आहेत.
येता काळ हा असाच असेल. नांदी होऊन तिचे सूर सर्वदूर पसरले आहेत.
मी माझ्या दारावर " कृपया
मी माझ्या दारावर " कृपया कोणत्याही कामासाठी वर्गणी मागू नये ही विनंती. क्षमस्व." अशी पाटी लावली आहे. वर्गणी मागणारे बरेच पाटी वाचून विनंतीचा मान ठेवतात. काही जण यांनाच वर्गणी काढून मदतीची गरज आहे असे टोमणे मारतात पण मी कधीच वर्गणी देत नाही. आमच्या भावांचा एकत्र गणपती बसवतो व गल्लीतल्या पोरांची खेळ स्पर्धा भरवून बक्षिसे वाटतो. एक दिवस सत्यनारायण पूजा करून गल्लीला जेवण देतो. सगळा खर्च आम्ही तिघे भाऊ मिळून करतो.
Submitted by अमर ९९ on 22
Submitted by अमर ९९ on 22 September, 2019 - 10:32>>>> +1111111
गणपतीच्या 20-30 दिवस आधीपासून वर्गणी मागणारे घरी येतात. गणपती सण सुरू होईपर्यंत 7 ते 8 मंडळं वर्गणी घेऊन जातात, आमच्या आसपास एकही सार्वजनिक गणपती बसत नाही. देवाचं आहे म्हणून द्यावी लागते. काही तर एव्हडे मजोरडे असतात की वर्गणी एव्हडीच का दिली अजून द्या बोलतात.
बोकलत भाऊ विनंती मागील धमकी
बोकलत भाऊ विनंती मागील धमकी माझ्या उपद्रवमूल्यामुळे गावातील वर्गणी मागणारांना ध्यानात येते. माझं गाव दोन हजार लोक वस्तीचं आहे. सत्तर टक्के लोकं शेतात घरं बांधून राहतात.
ऋ भाऊ _/\_ भरून पावलो.
ऋ भाऊ _/\_
भरून पावलो.
<<< एकच गणपतीची आरती एकाच
<<< एकच गणपतीची आरती एकाच भाषेमधून म्हणजे हिंदी मधून हवी. >>> ज्यांना हिन्दी येत नाही त्यांनी काय करायचे? कुणाची गैरसोय होईल अशा कल्पना मनात येतातच कशा?
ते अजून लोकमान्य टिळक नै,
ते अजून लोकमान्य टिळक नै, भौसायेब रंगारी यांनी गणेशोत्सव चालू केला आस म्हणणारे फिरकले नाय वाट्त!!
<< <<< एकच गणपतीची आरती एकाच
<< <<< एकच गणपतीची आरती एकाच भाषेमधून म्हणजे हिंदी मधून हवी. >>> ज्यांना हिन्दी येत नाही त्यांनी काय करायचे? कुणाची गैरसोय होईल अशा कल्पना मनात येतातच कशा? >.
---- शरद मी ते उपहासाने लिहीले आहे.... गणपतीच्या डेकोरेशन मधे नाही का ज्वलंत प्रश्नावर 'लक्ष' वेधण्यासाठी देखावे केलेले असतात. आता करतात का हे मला माहित नाही पण ३ दशके आधी करायचे.
गणपतीला कुठलिही भाषा चालते...
न्या. महादेव गोविंद रानडे
न्या. महादेव गोविंद रानडे यांनी टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सव सुरु न करण्याबाबत इशारा दिला होता असे उल्लेख वाचावयास मिळतात. ते टिळकांना म्हणाले होते म्हणे की, ‘देवघरातला गणपती तुम्ही रस्त्यावर आणू नका. भविष्यात त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.’
"आपण ज्याचा उत्सव साजरा करतोय
"आपण ज्याचा उत्सव साजरा करतोय त्याला काय वाटेल" याचा विचार सर्वांनी केला पाहिजे
सार्वजनिक गणेशोत्सव बंद करणे
सार्वजनिक गणेशोत्सव बंद करणे हे शंकरालाही जमणार नाही तेव्हा गोंगाटेश्वरांनी काळजी करु नये

Pages