बुध -नेपच्युन‌ जोडी

Submitted by सामो on 17 September, 2019 - 12:39

नेपच्यून आणि बुधाने एकत्र यायचे कारण काही नव्हते,
दोघात‌ असे सामायिक काहीच‌ क‌धीच न‌व्ह‌ते,
.
मात्र‌ दोघे प्रेमात‌ आप‌ट‌ले.
.
बरं नेपच्यूनला तरी अंत:प्रेणा व्हायला हवी होती, की नाही, प्रेम आंधळे असते यात संशयच नाही.
बुधाचीही अक्कल कुठे चरायला गेली होती?,नेपच्यून बुधाची विजोड‌ जोडी जमली होती..
बुधाला वर्तमानपत्र जितके आवडीचे , नेपच्यूनला वास्तवाचे चटके तितके नकोसे.
बुधाने घेतलेला वैचारिकतेचा बसा, ,तिथे नेपच्यूनचा पाडाव लागावा तरी कसा?
मग व्हायचे काय दोघानचा मेळ बसेना,कुठे काय चुकतंय कोणाला कळेना.
बुध बोलू पाहायचा राजकारणावरती,मात्र नेपच्यूनला मेडीटेश‌न‌मधून फुरसत कोठे मिळायची?
फ्रस्ट्रेट व्हायचे दोघे, मुळी जमायची नाही गट्टी., अगदी उघडउघड नाही पण मनात व्हायची कट्टी.
प्रेमातसुद्धा तुझा हिशेब नेपच्यूनची नेहमीची तक्रार. बुध‌ मात्र काटेकोर त्याने केलेला कागदावर करार
नेपच्युन जायचा वाहावत फसण्यात त्याचा हातखंडा, बुध‌ मात्र पारखी भारी, तो ओळखून होता प्रत्येकाला
.
सामायिक काहीच मिळेना,
अरेरे :माझिया प्रियाला प्रीत कळेना."
.
पण ठरविले दोघानी राहायचे नाही असे miserable,आपापली बलस्थाने ओळखून करू त्यावर अंम‌ल
बुद्धाने विचार केला बराच तार्किक,शेव‌टी बुधच‌ तो पडला naturaly मार्मिक.
जरी नेपच्यून थोडा मठ्ठ वाटतो, बरेचदा वास्तव सोडून "spaced out" च‌ अस‌तो
जेव्हा प्रेम करतो करतो पुरासारखे , अलोट, असीम, अनावर अगदी वेड्यासारखे
का नाही सांभाळून घेऊ मी त्याला, शिवाय lossचा आहे जरा काडीमोड घेतला.
.
पाहील‌त‌ वाच‌क‌हो इथेही हिशेबीप‌णा Sad
.
नेपच्युन म्हणे बुधाला विश्लेषणातून वेळ मिळेल तर ना,किती romantic स्वप्ने पाहिलेली मी escape करताना .
पण हातून चुका होता नाही अजिबात त्याच्या , वागण्यातही perfect तो सांभाळतो मर्यादा
तसेही प्रेम उतरायचे लक्ष‌ण‌ दिसत नाही, मला मुळीच असे त्याला तोडाय‌चे नाही.
प्रयत्न तर करू यात ज‌ड‌व्याग‌ळ् लेख वाचायची भीती काढून टाकू डोक्यावरून ते जाण्याची
.
ऐक‌ताय‌ ना?
.
कन्या सोडून बुधाने मारला मीनेत फेरफटका, मीन सोडून नेपच्यूनही कन्येत जाऊन पडला.
सांगा त‌शा जातकांनो येते का तुम्हाला मज्जा
क्वचित जरी उडत असेल व्यवहारात फज्जा
परफेक्ट नसते काहीच तडजोड महत्वाची,
त्यानेच वाढते खुमारी गोड स्वप्ने पाहावयाची.
.
प‌ट‌त‌य‌ का ज्योतिषांचे म‌ग‌?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा हा धागा दिसलाच नव्हता. कवितेतून /पद्यातून मांडलंय ते फारच छान केलं.
निरीक्षणं आवडलीत.
वर्षभरात एक महिनाभर बुध नेपच्यूनला भेटू शकतो कारण नेपच्यून लवकर हालत नाही. त्या वेळी परत ही जोडी पंचमात / सप्तमात/ भाग्यात असताना जन्म झाला तर फले मिळतील.( माझे मत)

नेपच्युन हा हळवा, तरल संवेदनशील तर बुध हा मार्मिक, विनोदी, व्यवहारी, खट्याळ. नेपच्युनला मीन, कर्क, वृश्चीकच बर्‍या. तर बुधाला मिथुन , वृषभ, कन्या, मकर बर्‍या. मीनेत तो नीचीचा झाल्याने सगळे आडातच रहाते, पोहर्‍यात काय येतच नाय.

पंचमातला नेपच्युन ज्योतिष्य विद्या, संवेदनशील वाद्ये वाजवता येणे ( जसे गिटार, जलतरंग, सतार वगैरे ) गुढ विद्या याचा अभ्यास देतो. तर याच ठिकाणचा बुध मात्र कॉमर्स, सांख्यिकी यात आवड दर्शवतो.

बरेच आहे.

वर काढते आहे. परंतु ज्योतिष जाणणार्‍यांनाच कळेल असा लेख/कविता आहे.>>>मला गुरु neptune नवं पंचम yogabaddal सांगाल का थोडं?
त्यांनी काय साधना करावी?

मस्त माहीती सांगीतलीत रश्मी. srd धन्यवाद.
सेव्हेरेस स्नॅप माझ्या मते बुध-नेपच्युन योग मनुष्याला उत्तम कल्पनारंजन करणारा, कल्पनाविलासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणारा लेखक बनवु शकतो. पण लग्नस्थानी असल्यास काय ते माहीत नाही.
@डोडो१४ - नाही माहीत. क्षमस्व. पंचम स्थान उपासनेकरता पहातात असे वाचलेले आहे. या स्थानावरुन ईष्ट्दैवत कळते .

बुध म्हणजे मर्क्युरी ना? की व्हीनस?
आणि बुध आणि नेपच्यून युती कशी होते... नेपचून शेवटचा प्लॅनेट आहे.. सर्वात लांब...
कोणी समजावून सांगेल का ..

बुध म्हणजे मर्क्युरी. युती म्हणजे प्रत्यक्ष कोणत्याच ग्रहाची अ‍ॅक्च्युअल टक्कर, किंवा हातमिळवणी वगैरे होत नाही. पृथ्वीवरुन पहाताना, २ ग्रहांचे लंबगोलाकार भ्रमणपट्टे छेदत असावे म्हणजे तसे भासत असावे. त्या छेदनबिंदूवरती ते ग्रहं आले की युती समजली जात असेल.

पूर्ण युती असेल तर? ती सुद्धा लग्नात.. !!

Submitted by सेव्हेरस स्नेप

नेपच्यूनची चांगली फले मिळणार नाहीत. गुरुची दृष्टी असणे चांगले पण जागेवर बसला तर चेंदामेंदा. दबाव. गुरु वजनदार आहे. म्हणजे असं की " नेपच्यून उत्तम कल्पनारंजन करणारा, कल्पनाविलासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणारा लेखक बनवु शकतो" या फलामध्ये स्वत: अशा कलेच्या भ्रमात किंवा त्याला तसे वाटले तरी लोकांना वाटणार नाही असा काही विपर्यास दिसून येऊ शकतो. थोडे न्यून येईल. (माझे मत)
शिवाय नेपच्यून थोडासा शुक्रासारखा पण दूरचा ग्रह आहे. आणि शुक्र हा गुरुचा वैरी. गुरुला शुक्र आवडत नाही.
--------
गुरु neptune नवं पंचम yogabaddal .. ...dodo14

यामध्ये नेपच्यूनची फले उजळतील. गुरु ३/४/६ व्या स्थानात नको.

(माझे मत)