Submitted by jayshree deshku... on 14 September, 2019 - 06:14
मला नाही लग्न करायचं ममा”
“का ग बेटा? नचिकेत सारखा संमजस, सालस मुलगा शोधून सापडणार नाही. माझ मन सांगतय तू त्याला हो म्हणाव.”
“ममा तुझाही प्रेमविवाह, पण पपा तुला अजूनही घटस्फोटाच्या धमक्या देतात. तेही लग्नाला तीस वर्ष झाल्यानंतर! तू संसारात कष्ट उपसले. आजीच मोठ दुखण काढलं, आता आजोबा महिना झाले अंथरुणाला खिळून आहेत. लवकर सुटकाही होत नाही. सार सहन करून तुझ्यात दोष?”
“गतजन्मीची देणी चुकती करत आहे मी, होईल त्यातूनही सुटका. माझा आशीर्वाद आहे, चांगला होईल तुझा संसार.”
ममाने देवाची मनोभावे पूजा केली. आरती झाली. देवाला नमस्कार करताना ‘श्रीराम’ तिच्या तोंडून अखेरचा शब्द निघाला. देवाने तिची सुटका केली होती तर!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
.
.
च्चं....
च्चं....
बापरे!
बापरे!
Ohhhhh
Ohhhhh
:(. परिणामकारक.
:(. परिणामकारक.
(No subject)
उत्तम शोकांतिका
उत्तम शोकांतिका