आठ आण्याच्या गोष्टी – उपरा - सायकलस्वार

Submitted by सा. on 13 September, 2019 - 12:41

"सोहम!... हे बघ तुझ्यासाठी झुरळ आणलंय!"
"काव काव! Happy "
"यु आर वेलकम! वेदांग, हा घे तुला टोळ! काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतंय म्हणत होतास ना?"
"काव काव!"
"सानिका... तुझं पोट बिघडलंय म्हणत होतीस म्हणून तुझ्यासाठी मऊमऊ पिंडाचा भात."
"काव काव!"
"आर्य, हा घे तुला गांडूळ. बघ कसा ताजा ताजा आहे!"
"कुहु कुहु...आपलं...काव काव!"
"??!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्य Lol

"सोहम!... हे बघ तुझ्यासाठी झुरळ आणलंय!" ->>> मी झुरळ खात नाही हो. हाहाहा
कावळ्याना माणसान्ची नावे मात्र आवडली

Lol too cute.

मस्त Lol

छान

आठाणे पण चालतील काय..?
तुमचे आठाणे नाही एकावन्न शब्द झालेत

छान!!!!

Lol मस्त.
काय हुशार आहात रे तुम्ही लोक? छोट्याशा साध्याशा कल्पनेला किती मस्त सादर करता?