सोळा आण्याच्या गोष्टी – बिननावाची गोष्ट - सायकलस्वार

Submitted by सा. on 8 September, 2019 - 15:40

मरताना माणसाचं अख्खं आयुष्य डोळ्यांसमोरून चमकून जातं म्हणतात.
शरीरावरचे आघात सहन होत नव्हते. त्यात कसलंसं हत्यार वर्मी बसलं आणि डोक्यातून जबरदस्त कळ गेली.
बंद डोळ्यांपुढून पट सरकला.
*
के.जी.तला पहिला दिवस.
पेंडसेबाईंच्या छड्या.
छत्री तिरकी करून सारिकाने दिलेला पहिला किस.
आयआयटीचा ग्रॅज्युएशन सेरेमनी.
अयानाची चिमुकली मूठ.
सीईओ म्हणून नियुक्त झाल्यावर बोर्डमेंबर्सनी केलेलं अभिनंदन.
बाईक क्रॅशनंतर सहाव्या दिवशी अथर्व शुद्धीवर आला तो क्षण….
*
पाठ खाडकन ट्रेवर आदळली. जोरदार किंचाळावसं वाटलं पण जमलं नाही.
"नर्स, क्लिनप करून घ्या…” थंड आवाज.
जाणीवा मिटत होत्या. आईचा हुंदका कानांवर आला.
"सुटलात ताई. रडू नका." एक पोक्त स्त्रीस्वर. "पाऊल चुकलं, झालं ते झालं… आता हितनं सांभाळून र्‍हावा."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीटसं कळलं नाही. शेवटच्या पॅरावरुन अ‍ॅबॉर्शन केलं असावं असं वाटतंय आणि सुरुवातीचा पॅरा जर मूल जन्माला आलं असतं तर हे लाईफ असतं असं आहे का?

सोळा आण्याच्या गोष्टी - दुरुस्ती - अमितव धाग्यावरचा माझा प्रतिसाद

किंवा यातील कोणत्यातरी एका घटनेत गोळी लागून मरताना एका व्यक्तीच्या डोळ्यापुढून गेलेल्या आठवणी (किंवा भविष्याविषयी पाहिलेली स्वप्न).

त्यावरून सुचली का ही कल्पना Wink Proud
===

कॅनडासारख्या गर्भपात कायद्याच्या बाजूने असल्याने गोष्ट आवडली म्हणणार नाही.

गर्भपातच वाटतोय. कुमारी माता असणार. ( पाऊल चुकलं वगैरे) मग या आठवणी पूर्वजन्मातील आहेत का?
माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, पण कथा आवडली.

> मग या आठवणी पूर्वजन्मातील आहेत का? > नाही. भविष्याविषयी पाहिलेली स्वप्न आहेत. कळी असतानाच उखडून टाकलं, फुलू दिलंच नाही वगैरे...

गर्भाला 'जीव' मानणे आणि गर्भपात म्हणजे खूनच सारखा पण थोडा माईल्ड प्रोपोगंडा...

ॲमी, आधी मलाही हेच वाटले होते, पण मग

<<<बाईक क्रॅशनंतर सहाव्या दिवशी अथर्व शुद्धीवर आला तो क्षण>>> ह्याचे काय?

आयन आणि अथर्व दोन्ही भविष्यातली मुलं आहेत, निवेदक आणि सारीकाची.
+
ट्विस्ट येण्यापूर्वीचं रेड हेरिंग आहे ते वाक्य.

<<< कॅनडासारख्या गर्भपात कायद्याच्या बाजूने असल्याने गोष्ट आवडली म्हणणार नाही. >>>
कॅनडा तरी कुठे आहे कथेत?

ज्यांनी 'कथा कळली नाही' म्हटले त्यांच्यासाठीः
पहिल्या वाक्यातच कथेचा संदर्भ आहे. मरताना आपलं अक्खं आयुष्य डोळ्यासमोर चमकून जातं, ही खाली दिल्याप्रमाणे एक widely reported fact आहे.
A life review is a phenomenon widely reported as occurring during near-death experiences, in which a person rapidly sees much or the totality of their life history. It is often referred to by people having experienced this phenomenon as having their life "flash before their eyes".
गर्भपात होत असताना कथेतल्या निवेदकासमोर, म्हणजे गर्भासमोर आपलं आयुष्य असंच चमकून जातं. फक्त ते भूतकाळातलं नसून भविष्यातलं, जे घडणार होतं पण घडलं नाही, ते असतं. इथे फक्त एका गर्भपाताचा बटरफ्लाय इफेक्ट आहे. निवेदकापुरता. त्यात प्रपोगांडा वगैरे पाहण्याची आवश्यकता नाही. एक कथा म्हणूनच तिच्याकडे पाहू शकता.
(ॲमी, तुम्ही दिलेली कथा आणि तुमचा प्रतिसाद मी वाचला नव्हता. ही कल्पना त्यावरून सुचली नाही)