Submitted by 'सिद्धि' on 8 September, 2019 - 11:51
अगं !
मी आणि माझा नवरा म्हणजे ना, अगदी मेतकूट.....
एकमेकांना न सांगताच, डोळ्यांची भाषा ओळखणारे. एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीला, आमचा खंबीर सपोर्ट असतो.
आमचे नाते म्हणजे एक अतुट बंधन आहे हो. आणि माझे पती दिपक म्हणजे तर प्रेमाचा सागर.
आमच्या आई तर म्हणतात, "आम्ही दोघे म्हणजे, लक्ष्मी नारायणाचा जोडाच."
खरंतर तुला सांगते, 'एकमेकांचा मान-सन्मान ठेवला, की नातं आपोआप फुलत जात बघ.'
चल उद्या बोलू . आता आम्ही दोघे मुव्ही पाहण्यासाठी थोड बाहेर निघालो आहे.
बा...बाय डियर.
सेंड !
" हुश्श्य ! झाला एकदाचा रिप्लाय करून."
हातातील मोबाईल टेबलवर ठेवून प्रीती उठली.
" दिपूsssss ! काय करतोस एवढा वेळ ???
आज तरी, तुझा चहा वेळेवर मिळेल का " ?
(whatsapp ?)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वाह! जबरदस्त!
अरे वाह! जबरदस्त!
(No subject)
कथा ठिकेय पण संयोजकांना
कथा ठिकेय पण संयोजक म्हणून काम करणाऱ्या आयडींना स्पर्धेत भाग घेताना याआधी कधी बघितल्याचं आठवत नाही.
हाडळीचा आशिक -
हाडळीचा आशिक -
सांगितल्या बद्दल धन्यवाद.
धागा बदलाला आहे.
विनोदी! मस्त
विनोदी! मस्त
जमलंय सिद्धी!
जमलंय सिद्धी!
अनुभव की काय
जस्ट अ जोक!
आज तरी तुझा माझा चहा वेळेवर
छान गोष्ट. मस्तच जमली आहे.
आज तरी
तुझामाझा चहा वेळेवर मिळेल का " ? >>>> असे हवे ना?नवऱ्याने बायकोला चहा दिला तर
नवऱ्याने बायकोला चहा दिला तर त्यांच्यात मानसन्मान वगैरे वगैरे नसते का
एक प्रामाणिक शंका
मानसन्मान वगैरे नवरा बायको (
मानसन्मान वगैरे नवरा बायको ( पक्षी पुरुष स्त्री) ह्यांच्यात नसते हो काही ....... तो सर्व नुसता भ्रम आहे आणि सर्वजण एकसमान हीच खरी ट्रेडिशन (!) आहे
कथा ज्यांना समजली त्यांचे
अज्ञातवासी , ॲमी, मधुरा, महाश्वेता, उपाशी बोका - कथा ज्यांना समजली त्यांचे आभार.
उपाशी बोका- आज तरी तुझा माझा चहा वेळेवर मिळेल का " ? >>>> असे हवे ना?
- लिहिण्याची पद्धत आहे ती, प्रत्येकाची लेखण शैली वेगळी असते ना.
काही अती उत्साही मंडळी, प्रत्येक धाग्यावर
शंका प्रकटीकरणासाठी नेहमी हजर असतात.
pintee पण तुमची प्रामाणिक शंका आहे. म्हणून प्रामाणिक शंकेवर प्रामाणिक उत्तर-
- मानसन्मान वगैरे असा काहीही मुद्दा मी या कथेत मध्ये मांडलेला नाही.
- व्हाट्सएप वरील तिचा कोणालातरी केलेला रिप्लाय, आणि तिचं खरं आयुष्य, यांतील तफावत, हा मुळ मुद्दा आहे.
- आणि हे सगळं स्पष्टीकरण मी या कथेत मध्ये मांडले असते, तर शशक ची दोषक ( दोनशे शब्द कथा) सुद्धा होऊ शकली असती....
अस्लम - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
(No subject)