सोळा आण्याच्या गोष्टी - परी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 8 September, 2019 - 01:16

त्या चिमुरड्याने शेजारी नवीन रहायला आलेल्या चिमुरडीला घरी बोलावलं . खेळायला .
पोरगी भलतीच गोड होती. एखादी परी ? ...
त्याच्या घरात काचेच्या हंडीमध्ये मासे होते. रंगीबेरंगी ,चमकणारे, गप्पी मासे. तिला गम्मत वाटली .
गालावर हात ठेऊन ती आश्चर्याने म्हणाली ,” अय्या !फिश!”
मग तिने मोजायची सुरुवात केली.” एक दोन तीन चाल .ए, चाल माशे आहेत .”
“नाही गं ! पाच माशे आहेत.”
“नाही ले, चालच आहेत.”
“तुला माइती का मला माइती? माजे माशे आहेत ! तू मोजायला चुकतीये.”
त्यावरून दोघे भांडले .ती परी गेली घरी.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला .सवयीप्रमाणे माशांकडे गेला .हंडीत चार मासे मजेत फिरत होते. पाचवा- तळाशी पांढरं पोट वर करून निपचित पडला होता.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय समजायचं?
परीला आधीच दिसलेलं का?

>>>>> एकंदरीत तसच दिसतय

इथे वाचकांनी हवा तो निष्कर्ष काढायचा आहे

१. ती बोलते अन योगायोगाने ते खरं होतं
२. ती परी दिसते पण अंतरंग तसं नाही
३. ती काळतोंडी आहे

छान Happy

कथा आवडली. तुमची परी माझ्यासारखी काळ्या जिभेची असावी. लोणचं कितीही फ्रेश असलं, घरादाराने त्याच्या चविष्ट आणि ताजेपणाची खात्री दिली तरी मला त्याला खराब झाल्याचा वास / चव लागायची. मी आजीला संगायचे की लोणचं खराब झालं आहे की 8-15 दिवसात बुरशी येऊन टाकून द्यावं लागायचं.
(यात जिभेपेक्षा माझ्या नाकाची तीव्र वासाची क्षमता कारणीभूत आहे)