Submitted by स्पर्शा on 7 September, 2019 - 02:32
ज्जा ... तुझ्याशी आता बोलणारच नाही... दादाशी भांडून रडत अबोली गार्डनमधे गेली... रडल्यामुळे तिच्या नाकाचा शेंडा लाल झालेला.. डोळ्यातल पाणी काही थांबायच नाव घेत नव्हत... गॅलरीतन दादा तिची मजा बघत होता... हळूहळू संध्याकाळ सरत गेली आणि सगळीकडे काळोख पसरला... अबोलीही घरी आली.. दादावरचा राग काही थंड झाला नवता...झोपताना तिने पुन्हा मनापासून त्याला बोलावल ... तिला झोप लागली... थोड्यावेळाने तिला ऊशीजवळ हालचाल जाणवली...हळूच एक हात आला आणि बाॅक्स ठेऊन गेला.. तिने पटकन उठून तो उघडला.. बघते तर तिचा आवडता टेडी बाॅक्समधे होता... आनंदाने नाचत ती सॅन्टाक्लाॅजला थॅन्कस म्हणत होती.. पलीकडच्या रूममधून दादा आपली दाढी काढून ठेवत तिला बघून खूष झाला होता ...
-- स्पर्शा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच हळूवार
खूपच हळूवार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानेय
छानेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली!
आवडली!
भावनाप्रधान !
भावनाप्रधान !
किती गोड
किती गोड