सोळा आण्याच्या गोष्टी- साखरझोप - कोहंसोहं१०

Submitted by कोहंसोहं१० on 5 September, 2019 - 14:23

"आत्ताशी ५:३० वाजलेत...आज लवकर जाग आली.... सुपू उठायला अजून तासभर आहे.... परत झोपावं का? जाऊदे उठतेच.
आज एकदम फ्रेश वाटतंय... अंगही हलकं झालय....गुडघ्याचं दुखणंही खूप कमी झालंय..देशपांडे डॉक्टरचं तेल उपयुक्त आहे म्हणजे….आता उठलेच आहे तर मस्त फिरून येऊ...
अरेरे बाळू जरा जपून चालवावी सायकल.... पडले असते ना मी....ओरडून सुद्धा न ऐकता गेला...काय हल्लीची मुले...
हुश्श... थोडक्यात वाचले....नाहीतर छोटूचा पेपर बाल्कनीत पडण्याआधी मला पाडून गेला असता... बरंय लगेच खाली वाकले....
अहाहाहा...मस्त गार हवा...मनमोहक निसर्गसौंदर्य....अप्रतिम सूर्योदय…
रोज यायला हवं इथे....पण आता निघुयात...उशीर झालाय...मी नाही हे पाहून सुपू काळजीत असेल...."
झरझर पावलं टाकीत घरात शिरणार तेवढ्यात सुपू रडत बाहेर आली...."बाबा, आई झोपेतच गेली..."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
असं जर कधी एखादं मशीन निघालं की माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा मशीनमधून बोलेल. तर खरंच किती चमत्कारिक गोष्टी घडतील.

सर्वांना धन्यवाद.
Supu kaay aahe? --> ती मरण पावलेल्या स्त्रीची मुलगी - सुपर्णा