सोळा आण्याच्या गोष्टी - लॉटरी - जव्हेरगंज

Submitted by जव्हेरगंज on 4 September, 2019 - 13:59

केबिनमध्ये काचेच्या टेबलवर बॉसने लॅपटॉप ठेवला तेव्हा ती समोरच बसली होती.
"न्यू जॉइनिंग?"
"येस सर.." आहा किती मधाळ आवाज.

दोन दिवसांनी पुन्हा आली सर्व्हर डाऊन झालाय म्हणून. व्हाट ए परफ्युम यार..!
"दिनू प्लीज हेल्प हर"
मग दिनूने तिला एक डेस्क उपलब्ध करून दिला.

मग कँटींगमध्ये ढोकळा देत म्हणाली, " मी स्वतः केलाय.."
बॉसने मंद हसत एक पीस खाल्ला.

"मी इथेच राहते. अपर्णा हाईट्समध्ये. एकटीला फार बोअर होतं." तिच्या गप्पाटप्पा बॉसशी.

शनिवारी सकाळी म्हणाली, "वीकेंडचा काय प्लान सर.."
"गावी चाललोय. महत्त्वाचं काम" एसी वाढवत बॉस म्हणाला.
"आणि तू?"
"सिंहगडावर. छान वाटतं" टंच छाती.

सोमवारी ती दिसली पण बोललीच नाही. मंगळवारी पण नाही. गुरुवारी मात्र आली. चार दिवस लीव्ह पाहिजे म्हणाली. बॉसने अप्रूव्हलची सही मारली.

आणि संध्याकाळी दिनूचा फोन आला.
"बॉस, गोव्याला चाललोय. चार दिवसाची लीव्ह द्या."
"का रे?"
"लॉटरी लागलीये रविवारी. सिंहगडावर.."

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मॅनेजरच्या प्रेमात पडणार्या फ्रेशर/न्यू जॉइनीबद्दलचा बायकी रोमान्स वाचूनवाचून कंटाळा आला होता. त्याऐवजी ऑफिस रोमान्स बद्दलचा हा पुरुषी दृष्टिकोन, हा बदल चांगला आहे. एसी वाढवणे, टंच छाती वगैरे छोटे डिटेल्स खासच!

आवडली. POSH आणि MeToo मागची कारणं कळतील काहीजणांना?...

सिंहगडावर लाॅटरी लागली म्हणून एकदम गोवा?! आमच्या बाॅससारखा एखादा बाॅस समजून - उमजून कबाबमें हड्डी बनेल आणि दोघांना एकाच वेळी रजा घेता येणार नाही म्हणून कामांची जंत्री वाचत दिनूला रजा अप्रूव करणार नाही. Biggrin

बाॅस आणि दिनू वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ना? >>> Lol असा प्रश्न का बरे पडला!!

आणि समजा बॉसने रजा अप्रूव नाही केली तरी बाण ऑलरेडी सुटलेला आहे. अब उन्हे दुनिया की कोई ताकद रोक नही सकती Proud

अरे हो. बाण ऑलरेडी सुटलेला आहे, हा मुद्दा लक्षातच नाही आला. स्पष्टीकरणासाठी धन्यवाद, जव्हेरगंज Happy

बॉस, दिनू आणि कथालेखक अशी थ्री-वे स्प्लिट पर्सनॅलिटी/ मानसिकता/रोल प्ले थिअरी आहे का? पण ह्यात फोन कॉल कसा बसवायचा? (कार्तिक कॉलिंग कार्तिक लॉजिक ने का?)
असे नसेल तर कथा अजून कळली नाही असे म्हणतो. कोणी (किंवा जव्हेरगंज) मदत केल्यास बरे होईल.

बॉस आणि दिनू वेगवेगळे आहेत. आणि कथालेखकाचा यात काहीच संबंध नाही.

तर गोष्ट अशी की, बॉसपुढे एक संधी आयतीच चालून येते. पण वेळीच दखल न घेतल्याने (किंवा प्रकरण पुढे कसे न्यायचे हे न समजल्याने) दुसराच कोणीतरी (दिनू) ती संधी हिरकावून घेतो. असं काहिसं मांडायचं होतं. Happy

अच्छा! मस्त होती.

समहाऊ मला बॉस (एटिकेट्सच्या चौकटीत वागणारा), दिनू ( बॉसचे नाव आणि त्याचा अ‍ॅक्शन घेणारा परवर्ट सेल्फ) आणि ह्या दोघांना त्रयस्थ नजरेनं न्याहाळणारा कथालेखक (बॉस आणि दिनूच्या मधले फक्त मनात मांडे खाणारे बॅलन्स्ड व्यक्तीमत्व ) असे तीन पुरुष कथेत असल्याचे फिलिंग येत आहे.
गावाकडे जातो म्हणणारा बॉसमधला परवर्ट दिनू बॉसला सिंहगडावर घेऊन गेला.. हे असे झाल्याने पहिले चार दिवस तिने बॉसशी अबोला धरला पण नंतर गोव्यासाठी होकार दिला.
असे वाटले.

> बॉस, दिनू आणि कथालेखक अशी थ्री-वे स्प्लिट पर्सनॅलिटी/ मानसिकता/रोल प्ले थिअरी आहे का? > कल्पना चांगली आहे. डेव्हलप करा.

मस्तच!