मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - "जुने ते सोने"
माणसाला जितके नाविन्याचे आकर्षण असते तितकीच पुरातनाची ओढ असते. घरात कितीही आधुनिक आणि स्मार्ट टीव्ही आला तरी घराच्या एका कोपऱ्यात का होईना आजोबांचा व्हॉल्वचा रेडिओ सांभाळलेला असतो. आज्जी पणजीची सुती साडी पिढ्यानपिढ्या गोधडीच्या रुपाने ऊब देत असते. कितीही महागड्या आणि चकाचक गाड्या घेउन फिरा पण एखाद्या जुनाट फाटकामागे उभी असलेली जुनीपुराणी व्हिंटेज कार आपल्याला अकारण खुणावून जाते. एखाद्या जुन्या कृष्णधवल चित्रपटात मोकळी ढाकळी मुंबई बघितली की आत कुठेतरी काहीतरी नकळत हलते.
थोडक्यात काय आपल्यात आणि या जुन्या (पण मनामनात चिरतरुण होवून राहिलेल्या) वस्तुंमध्ये एक गूढ अनामिक असे काहीतरी बंध असतात.
या प्रकाश चित्रांच्या खेळातून अश्याच काही आठवणी जागवुया!
आपल्या संग्रही असलेल्या किंवा संग्रहालयातून पाहिलेल्या, देशोदेशीच्या प्रवासात आढळलेल्या अश्या जुन्या आणि जतन करून ठेवलेल्या वस्तूंची मेजवानी लुटुया प्रकाश चित्रांच्या रुपाने.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
किती सुंदर कपाट आहे हे
किती सुंदर कपाट आहे हे अनिंद्य, त्यामागची कहाणी ऐकल्यावर अजूनच देखणे भासतंय >>> अगदी अगदी.
आधीचे फोटोपण मस्तच.
सुबक दिसतंय कपाट.. आधीचे
सुबक दिसतंय कपाट.. आधीचे फोटोजपण सुंदर..
मला ते 'Fuss Free' असल्यामुळे
मला ते 'Fuss Free' असल्यामुळे आवडते.
सात दशकात दोनदा पॉलिश आणि एकदा हँडलची दुरुस्ती यापलीकडे काही मागणी नाही त्याची !
किती सुंदर कपाट आहे हे
किती सुंदर कपाट आहे हे अनिंद्य, त्यामागची कहाणी ऐकल्यावर अजूनच देखणे भासतंय>>>
+ १११
आवडले !
अनिंद्य, कपाट किती देखणे आहे!
अनिंद्य, कपाट किती देखणे आहे!
कदाचीत ते दोघे जण आपण असं कपाट बनवलं होतं हे विसरूनही गेले असतील, पण तुमच्या कुटंबात मात्र ते दोघे अमर झालेत. अनेकांनी त्यांना पहिलेही नसेल तरीही.
हर्पेन
हर्पेन
अन्जू
मन्या ऽ
कुमार१
माधव
आभार !
@ माधव,
कपाटाचे वय ६९. त्यावेळी ते १८-२० वर्षांचे तरी असावेत. म्हणजे आज हयात असले तरी ते नव्वदीत असणार.
अनोळखी लोकांना सहज मदत करणे, त्यांना केलेल्या मदतीची जाणीव असणे हेही कपाटाइतकेच जुने झालेय आता
आता हा बघा एक पंखा : इस्ट
आता हा बघा एक पंखा : इस्ट इंडिया कंपनीच्या जमान्यातील ! सन १८४५ .
याला बिलकूल वीज लागत नाही. ज्योत पेटवून आत सारायची , अन होतो की तो चालू !!
भारीच की!
भारीच की!
उन्हाळ्यात गावाकडे लाईट्स गेल्यावर वापरता येतील असे पंखे..
पण ज्योत पेटवुन सारायची कुठे?
त्याच्या मधल्या उभ्या भागात.
त्याच्या मधल्या उभ्या भागात.
याला बिलकूल वीज लागत नाही.
याला बिलकूल वीज लागत नाही. ज्योत पेटवून आत सारायची , अन होतो की तो चालू !! >>> मस्त आयडीया होती ही. खरंतर घरोघरी त्याकाळी असे हवे होते, जिथे वीज नव्हती तिथे. कदाचित महाग असेल, कमी लोकांना परवडत असेल त्याकाळी. सुपर्ब आहे मात्र.
हायला मस्तच आहे!! पंखा पण
हायला मस्तच आहे!! पंखा पण मस्त आणि बाजूची पितळी घंटी पण छान
जुनी जावा मोटरसायकल...
जुनी जावा मोटरसायकल...
जावा मस्तच !
जावा मस्तच !
त्याची गिअर टाकायची आणि किक मारायची यंत्रणा एकाच दांड्यात (डावीकडे) असायची .
Pages