प्रकाशचित्रांचा झब्बू १ - जुने ते सोने

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - "जुने ते सोने"

माणसाला जितके नाविन्याचे आकर्षण असते तितकीच पुरातनाची ओढ असते. घरात कितीही आधुनिक आणि स्मार्ट टीव्ही आला तरी घराच्या एका कोपऱ्यात का होईना आजोबांचा व्हॉल्वचा रेडिओ सांभाळलेला असतो. आज्जी पणजीची सुती साडी पिढ्यानपिढ्या गोधडीच्या रुपाने ऊब देत असते. कितीही महागड्या आणि चकाचक गाड्या घेउन फिरा पण एखाद्या जुनाट फाटकामागे उभी असलेली जुनीपुराणी व्हिंटेज कार आपल्याला अकारण खुणावून जाते. एखाद्या जुन्या कृष्णधवल चित्रपटात मोकळी ढाकळी मुंबई बघितली की आत कुठेतरी काहीतरी नकळत हलते.
थोडक्यात काय आपल्यात आणि या जुन्या (पण मनामनात चिरतरुण होवून राहिलेल्या) वस्तुंमध्ये एक गूढ अनामिक असे काहीतरी बंध असतात.

या प्रकाश चित्रांच्या खेळातून अश्याच काही आठवणी जागवुया!
आपल्या संग्रही असलेल्या किंवा संग्रहालयातून पाहिलेल्या, देशोदेशीच्या प्रवासात आढळलेल्या अश्या जुन्या आणि जतन करून ठेवलेल्या वस्तूंची मेजवानी लुटुया प्रकाश चित्रांच्या रुपाने.

2015-09-19 15.25.19-1024x700_0.jpg

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

IMG_20190903_101042_HDR.jpg

१०-१५ वर्षापूर्वी चा जुना ice pot - दिवसभर आइस न वितळता तसाच राहतो....
चिन दौऱ्यावर असताना, तेथील एका मैत्रिणीकडे होता.
मी घेऊन आले ईकडे त्याला एक वर्ष झाल आहे.

१९८३ मधले माझे मनगटी घड्याळ : hmt quartz.

0_IMG_20190903_142033330.jpg

तेव्हा hmt ने नुकताच Citizen शी सहयोगी करार केला होता. तेव्हा भारतात आपल्याला अशी जी पहिल्या वाट्यातील घड्याळे मिळतात ती ९९% जपान मध्येच तयार झालेली असतात. इथे hmt फक्त आपले नाव लावते.
या घड्याळाचा विशेष अनुभव असा:

मी वापरू लागल्यावर जवळपास ५०० जणांनी पहिल्याच वर्षी त्याच्या तबकडीचे खूप कौतुक केले होते. जो त्याला पाहिल तो अगदी हटकून विचारेच की हे कुठले आहे. हे घड्याळ २००३ पर्यंत छान चालू होते.
असे ते दिन hmt चे ....!

२५० वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी विकत घेतलेल्या घरातील दिवाणखान्यातून दिसणारा देव्हार्‍यातील गणपती बाप्पा. गणपती सुमारे १५० वर्षांपूर्वीचा आहे. घरातील बरेचसे सामान जुने तर काही नविन आहे.
गणपती बाप्पा मोरया.
FB_IMG_1537255377530.jpg

संयोजक ,
फोटो फक्त वस्तूचाच पाहिजे की एखादे कात्रण /जुने चित्र याचाही चालेल ?

फोटो फक्त वस्तूचाच पाहिजे की एखादे कात्रण /जुने चित्र याचाही चालेल ?>>> चालेल! असा फोटो, ज्याने जुन्या आठवणी ताज्या होतील... मग चित्र आणि कात्रणही चालेल...

म्हटले जरा आता अजून मुशाफिरी करावी. वाचकांना १९४०-५० मधल्या दोन वस्तू दाखवाव्यात. माझ्या एका कोकणवासीय मित्रांच्या घरातून हे आणतोय तुमच्या भेटीस:

1940 kand.jpg1950 kand.jpg

सगळेच फोटो भारी आहेत.
या वस्तू जपून ठेवल्या आहेत हे बघून मस्त वाटलं.

कुमार जी, पप्पा बोलले की आधी लाडू ठेवायला वगैरे म्हणून असे डबे वापरायचे.

सॅन फ्रॅन्सिस्को म्युनी मध्ये फार पूर्वी वापरतात असणार्‍या स्ट्रीट कार्स, केबल कार्स, ट्रेलर बसेस, बसेस.
दरवर्षी म्युनी हेरिटेज वीक मध्ये ह्या जुन्या गाड्या रस्त्यावर आणते आणि आपल्याला त्यात बसायची संधी मिळते.
फोटो फार चांगले नाहीत.
१. छप्पर नसलेली बोट ट्राम : IMG_20180908_145028519.jpg

२. जुनी बस IMG_20180908_145434811.jpg
३. ६२ नंबरची जुनी केबल कार. IMG_20180908_145534494.jpg
४. IMG_20180908_145838751.jpg

५. १ नंबरची स्ट्रीट कार IMG_20180908_150150942.jpg
६. IMG_20180908_160949099.jpg

७. जुन्या बसेस IMG_20180908_150346414.jpg

८. IMG_20180908_152225069.jpg

९. IMG_20180908_160146020.jpg

१०. स्ट्रीट कार नं ५७८ IMG_20180908_160423054_BURST000_COVER_TOP.jpg

११. IMG_20180908_160513944_BURST000_COVER_TOP.jpg

१२. झुरीचने दिलेली स्ट्रीट कार IMG_20180908_161537002.jpg

पुढचा वीकांत (७-८ सप्टेंबर) म्युनी हेरिटेज वीकांत आहे. शक्य असेल तर नक्की जा. एक दिवस कसा जातो कळत नाही. तेव्हा रेल्वे म्युझियमला फ्री एंट्रीही असते मला वाटतं.
https://www.sfmta.com/calendar/muni-heritage-weekend

मित्रहो,
सांगा पाहू कोणाकोणाकडे शिल्लक आहेत या नोटा !!

1 Rs (2).jpg

आणि हा देखिल! १०१ वर्षे वयाचा पंचम जॉर्जवाला १ रुपया!

One Re.jpgOne Re1.jpg

मी हल्लीच संपवली, दोन आणि एक रुपयांची पाकिटे. एक भाजीवाला अजून असेल तर द्या म्हणत होता, पण नव्हती.

नाणी मस्तच कृष्णा.

उर्मिला मस्तच.

सर्वांचेच फोटो आणि टाकसाळी मस्त !

५ रुपयांची नोट आणि अलीकडचे १० रुपयांचे नाणे हे मात्र काही रस्त्यावरच्या विक्रेत्यांना अजिबात "चालत नाही"; त्यांच्या मते ते अवैध चलन असते !!

१ रुपयाची नोट ही 'सरकारची" असते ( रिझर्व बँक नाही), त्यामुळे ती कधीच रद्द होत नाही असे पूर्वी ऐकले होते. जाणकारांनी खुलासा करावा.

Pages